Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • शहरात आचार्य सूर्यदेव यांचे प्रवचन चालू होते. त्यांच्या वाणीमध्ये अद्भुत संमोहन होते. हजारो लोक त्यांचे प्रशंसक होते. सेठ मेवाराम यांना माहिती होताच तेसुद्धा प्रवचन ऐकण्यास पोहोचले. तेथे मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. या वेळी आचार्य क्षमेचे महत्त्व सांगत होते, जीवनात क्षमेला अत्यंत महत्त्व आहे. क्षमा हा महापुरुषांचा श्रेष्ठ दागिना आहे. मानवाने आपल्या रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे. ज्याने रागावर विजय मिळवला तोच खरा संन्यासी आणि योगी आहे. दुस-यांच्या गुन्ह्यांबद्दल...
  January 1, 07:38 AM
 • संकल्प तडीस नेण्यासाठी आत्मशक्तीची गरज असते. जे संकल्प तडीस नेतात तेच जीवनात यशस्वी होतात. आपापल्या जीवनध्येयानुसार संकल्पांमध्ये विविधता असू शकते. असे असले तरी साधारणपणे आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरतील असे नवीन वर्षासाठीचे संकल्प पुढीलप्रमाणे... १. धुम्रपान आणि मद्यपान सोडून देणार.२. रोज वेळेवर उठणार.३. नियमित व्यायाम आणि वॉक करणार.४. काही नवीन शिकणार.५. वेळेवर ऑफिसला जाणार.६. पूर्वनियोजनानुसार काम करणार.७. बजेटनुसार खर्च करणार.८. कुटुंबाला अधिक वेळ देणार.९. वजन कमी करणार.१०. इतरांना मदत...
  December 31, 05:23 PM
 • नुकसान झाल्याचे दु:ख होतच असते. एखादी वस्तू हरवली की दु:ख होत असते. जसे गमावण्याचे दु:ख होते तसेच मिळवल्याचेही दु:ख होते. विज्ञानाने आपल्याला जे जे दिले आहे त्यात आणखी एक भावना आहे, ती म्हणजे जे काही मिळते ते जलदगतीने मिळावे. त्यामुळे आजकालची जीवनशैली हौशी बनली आहे. कुणीच थांबायला तयार नाही. याच अधीरतेचे विक्षिप्तेत रूपांतर होऊन माणसाला उच्चश्रेणी हौशी बनवत आहे. माणसाच्या डोक्यात एक हवा शिरते. मला हे मिळालेच पाहिजे आणि ते लवकर मिळाले नाही तर त्यासाठी मी काहीही करू शकतो. त्यातूनच काही लोक...
  December 29, 04:09 PM
 • लोकांपर्यंत आपला मूळ विचार पोहोचवणे हीसुद्धा एक कला आहे. साधारणत: अनेकांना असे करणे कठीण जाते. जाणकारांच्या मते यामागे मोठे कारण आहे. त्यांना जेवढी गरज असते त्यापेक्षा जास्त शब्दांचा ते वापर करतात. हे दुरुस्त करण्यासाठी आपण किती बोलतो? याकडे सर्वप्रथम आपल्याला लक्ष द्यावे लागेल. काहीही बोलण्यापूर्वी तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? याचा विचार करावा. वास्तविक तुम्हाला काय बोलायचे आहे यावरच तुमच्या विचारांना केंद्रित करा. अशा प्रकारे केंद्रित असल्याने नैराश्य आणि बोबडे बोलण्याची...
  December 26, 04:43 PM
 • कुटुंबातील एखादा सदस्य किंवा कार्यालयात बॉसशी वाद झाला असेल तर अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करावे. चांगल्या वातावरणातही सद्भावनापूर्वक चर्चा करणे योग्य राहील. साधारणत: धर्म, राजकीय नेत्यांची भूमिका किंवा व्यक्तिगत प्रतिमांसारख्या विषयांवरही चर्चा करू नये. यामुळेही नाहक कडवटपणा निर्माण होतो. जर इतर लोक तुम्हाला बळजबरीने चर्चेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मला या विषयाची कोणतीच माहिती नाही, असे सांगून तुम्ही चर्चेतून बाहेर पडू शकता. या लोकांपासून किंवा अशा प्रकारच्या...
  December 23, 02:50 PM
 • चीनमध्ये कन्फ्युशियस यांना ऋषितुल्य मानले जाते. समाजकल्याणासाठी त्यांनी काही सूत्रे सांगितली आहेत. व्यक्तिमत्त्व विकास गुरू पवन चौधरी यांनी आपल्या सफलता की त्रिवेणी या पुस्तकात या सूत्रांचे विश्लेषण केले आहे. त्यातील एका सूत्राचे विश्लेषण देत आहोत.श्रेष्ठ मानवाला मितभाषी तथा आपल्या वागुणकीत गांभीर्य असावे असे वाटते. गुण म्हणजे एखाद्या कोपर्यात पडलेला दागिना नाही. जो हा दागिना धारण करतो त्यालाच मित्र भेटतात. र्शेष्ठ व्यक्तीला का मितभाषी व्हावेसे वाटते? र्शेष्ठ व्यक्ती कधीही...
  December 22, 09:15 AM
 • गौतम बुद्धांच्या रसाळ प्रवचनांमुळे र्शावस्ती बुद्धमय झाली होती. एके दिवशी काही लोकांनी बुद्धांना सांगितले की, जंगलातील मार्गावर एक दरोडेखोर वाटसरूंना लुटून त्यांना ठार मारतो. त्याच्या भीतीमुळे त्या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्या सर्वांना ही समस्या सोडवण्याचे वचन देत बुद्ध जंगलाकडे मार्गस्थ झाले. जंगलाच्या मधोमध पोहोचताच त्यांना आवाज ऐकू आला, थांब. बुद्ध थांबताच लगतच्या झाडीतून दरोडेखोर बाहेर येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. बुद्धांनी सौम्य स्वरात त्याला विचारले, मी तर...
  December 17, 01:54 PM
 • पुराणात असा उल्लेख आहे की कोणत्याही गोष्टीला किंवा कार्याला लहान समजू नका आणि त्याकडे समदृष्टीने पहा. या विषयाला अनुसरून अमेरिकेतील एक प्रसंग आहे. रुझवेल्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी व्हाइट हाऊसमध्ये त्यांच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती. संबंधित अधिकार्यांनी रुझवेल्ट यांच्या रुचीविषयी श्रीमती रुझवेल्ट यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अत्यंत नम्रपणे व्हाइट हाऊसला सजवण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर आपल्या...
  December 8, 05:36 PM
 • आपल्या जीवनाचे मालक आपण स्वत: आहोत. मात्र अधिकाधिक आपण दुसर्यांकडून संचालित होत असतो. आपल्याविषयी लोक काय म्हणत असतील याबाबत अधिक चिंता करू नका. परंतु कुटुंब आणि समाजाचे जे सामान्य नियम आहेत, त्याचेही उल्लंघन करू नका. दुसर्याची पर्वा करू नका याचा अर्थ असा नाही की आपण स्वच्छंद आणि स्वैराचारी बना. ज्या वेळी आपण भान राखून असतो, त्या वेळी आपण जाणून असतो की हे भान दुसर्याकडून प्रभावित होऊ देऊ नये. दुसर्यामुळे आपली शांतता भंग करू नका. समजून घ्या की असे का होत आहे? माणूस तीन गोष्टींवर टिकून आहे....
  December 8, 04:02 PM
 • सध्याच्या काळात कुटुंबांमध्ये अनेक बदल झालेले दिसून येत आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे चर्चा करण्याचे केंद्रही बदलले आहे. जवळचा, अतिजवळचा माणूसही कामापुरतीच गोष्ट करीत असतो. चर्चा थोडी दीर्घ स्वरूपाची झाल्यावर भांडणात रूपांतर होते. सर्वांना आपलेच खरे आहे हे पटवून देण्याची घाई असते. कोणीच दुसर्याचे ऐकायला तयार नसतो. आपल्या परंपरा मात्र सर्वांशी आदराने, प्रेमाने वागावे अशी शिकवण देतात. त्यामुळेच छोट्या छोट्या गोष्टीतून गोडवा निर्माण करण्याची शिकवण दिली जाते. मकरसंक्रांतीला...
  December 7, 03:18 PM
 • सध्याचा काळ मेल-मुलाखत, पीआरशिप आणि जनसंपर्काचा आहे. कारण यातूनच संबंध वाढवण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हाही कुणाला भेटाल तेव्हा व्यावहारिक दृष्टिकोनाव्यतिरिक्त आध्यात्मिक भानही ठेवा. शिष्टाचाराच्या आडून षड्यंत्र रचू नका. अंगी नम्रता असू द्या. अभिवादनात अधिक स्वार्थ बाळगू नका. प्रत्येक भेटीत वेळेचे भान ठेवून काळाचे स्वागत करा. आपलाही वेळ आणि दुस-याचाही वेळ व्यर्थ घालवू नका. आपल्या ऋषी-मुनींनी एक -दुस-याबाबत कल्याणकारी भावना ठेवण्याची शिकवण दिली आहे. आपण दुस-याला भेटून केवळ खुश...
  December 3, 02:50 AM
 • शिक्षणाला सध्याच्या काळात सत्संगाची जोड द्यायला हवी. आधुनिक शिक्षण आणि परंपरागत सत्संगाचा मेळ घालणे असंतुष्ट, अशांत, असंयमित व्यक्तीसाठी गरजेचे झाले आहे. या काळात मुले इंटरनेटवर टिकून आहेत.सारे शिक्षण ओरबाडून घेण्यात येत आहे. लॅपटॉप आणि कॉम्प्युटर किती शिक्षण देत आहे हे ठाऊक नाही. मात्र मुले त्यात किती डुंबली आहेत हे आपण माहीत करून घेतले पाहिजे. एक चांगला मार्ग वाईट परिणाम देत आहे. त्यामुळे मुलांनी थोडासा सत्संगही करायला पाहिजे. सत्संग या शब्दात सुरक्षा आहे. सत्संगामुळे आत्मविश्वास...
  December 1, 12:45 AM
 • रस्त्यावर वाहनांचा जणू मेळाच भरला होता. एकामागे एक अशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बंटूला रस्ता ओलांडून मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचायचे होते. त्याने काही काळ वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहिली. मग धोका पत्करून तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढय़ात एका दुचाकीचा धक्का लागून तो दूर फेकला गेला. दुचाकीस्वार मात्र तेथेच गाडी सोडून पसार झाला. पाठीमागूनही एक दुचाकीस्वार येत होता. हे पाहिल्यावर तो थांबला आणि आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावले. बंटूच्या एका गुडघ्याला जखम झाली होती...
  November 29, 09:01 AM
 • एका सेठजवळ अपार धन-संपत्ती होती. मात्र, त्याचे मन अशांत होते. कुठली ना कुठली चिंता त्याला लागलेली असायची. त्याची अशी दशा पाहून त्याच्या एका मित्राने शहरापासून दूर एका आश्रमात असलेल्या साधूची भेट घेण्याचा सल्ला दिला. मित्राचे म्हणणे होते की, कोणतीही समस्या सोडवण्यासाठी साधू सक्षम आहे. सेठ मित्राचा सल्ला ऐकून साधूकडे आला आणि आपली समस्या सांगितली, महाराज मी जीवनात त्रस्त झालो आहे, मी काय करू, ज्याने मला शांतता लाभेल. साधू म्हणाला, घाबरू नकोस, तू प्रभूच्या चरणी ध्यान लाव. तुझी अशांतता दूर...
  November 29, 12:53 AM
 • आध्यात्मिक कसोटीवर माणूस असंतुलित होत असतो. तो भोगाच्या त्यागाला सर्वस्व मानून सर्वत्र विरक्त होत जातो अथवा भोगात डुंबून विलासी होत जातो. गुरू नानक यांच्या मते हे अज्ञानातून घडते आणि हेच अज्ञान जीवनाला खंडित करण्यासाठी उत्पन्न झालेले असते. गुरू नानक एकदा आपल्या यात्रेदरम्यान पाकपाटनमध्ये शेख फरीद दुसरा यांना भेटण्यास गेले. शेख फरीद जंगलात कठोर तपस्या करीत होते. जेव्हा गुरू नानक त्यांना भेटले तेव्हा शेख यांनी विचारले, आपला पोषाख फकिराचा आहे, परंतु आपले शरीर सुंदर आहे. त्यागी कृशकाय...
  November 28, 02:15 AM
 • इंदूर ते दिल्ली या रेल्वे प्रवासादरम्यान रमेश नुकताच जेवण करून खिडकीजवळ बसला होता. तेवढय़ात गरमागरम शेंगदाणे घ्या असे म्हणत एक मुलगा त्या कंपार्टमेंटमध्ये आला. रमेशच्या पत्नीने जेवणाच्या डब्यात गोड पदार्थही आणले होते. हे गोड पदार्थ खाण्यासाठी रमेशने डब्बा उघडताच त्याची नजर शेंगदाणे विकणार्या मुलावर पडली. त्याच्या हडकुळ्या शरीराकडे पाहून रमेशला दया आली आणि त्याने एक लाडू काढून त्याला देत म्हणाला, घे बाळ, हा लाडू खा. मात्र त्याने लाडू घेण्यास नकार दिला. रमेश पुन्हा म्हणाला, अरे घे ना....
  November 26, 04:19 PM
 • वशीकरण किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवायचे असेल तर तसे करणे हे खूप कठीण काम आहे. सर्वांनाच वाटत असते की लोकांनी आपले ऐकावे. आपल्या नियंत्रणात राहावे. परंतु असे होणे शक्य नसते. कोणत्याही व्यक्तीला कसे नियंत्रणात आणायचे या संबंधात आचार्य चाणक्य म्हणतात...लुब्धमर्थेन गृह्णीयात् स्तब्धमंजलिकर्मणा।मूर्खं छन्दानुवृत्त्या च यथार्थत्वेन पण्डितम्।।जो माणूस संपत्तीचा लोभी आहे त्याला पैसे देऊन, घमंडी किंवा अभिमानी असेल तर त्याच्यासमोर हात जोडून, मूर्खाला त्याचे म्हणणे मान्य...
  November 19, 06:00 PM
 • स्त्रियांविषयी असे म्हटले जाते की त्यांना कोणीही समजवू शकत नाही. त्यामुळेच स्त्रियांविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा पुरुषांमध्ये आढळते. स्त्रियांच्या स्वभावाविषयी आचार्य चाणक्य यांनी लिहिले आहे की, अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभिता। अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषा: स्वभावजा:।। या संस्कृत श्लोकात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, सर्वसाधारणपणे अधिकांश स्त्रिया खोटे बोलतात. अचानकच काहीतरी करून बसतात. नखरे करतात. स्त्रिया अल्लड स्वभावाच्या असतात. त्या जास्त लोभी असतात. ही...
  November 11, 02:21 PM
 • कष्ट, दु:ख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात... कष्टं च खलु मूर्खत्वं कष्टं च खलु यौवनम्। कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।। श्लोकाचा अर्थ : पहिले कष्ट किंवा अडचण आहे मूर्ख असणे, दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. आणि या दोन्ही अडचणींपेक्षा अधिक गंभीर अडचण आहे...
  November 8, 07:17 PM
 • दररोजच्या व्यवहारात आपण अनेकांना भेटत असतो, त्यात काही जण चांगल्या चरित्र आणि स्वभावाचे असतात तर काहींचा स्वभाव आणि वर्तणूक वाईट असते. चांगल्या लोकांकडून शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप काही असते. परंतु आपण वाईट लोकांकडूनही काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो. या संबंधात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, विषादप्यमृतं ग्राह्ममेध्यादपि कांचनम्। नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि।। या श्लोकाचा अर्थ असा की, विषातूनही अमृत वेचले पाहिजे. घाणीतही सोने पडले असेल तर ते घेतले...
  November 4, 08:46 PM
 
जाहिरात

RECOMMENDED