जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • चीनचे प्रसिद्ध संत कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांसोबत जंगलातून एका ठिकाणी चालले होते. रस्त्यामध्ये त्यांना एका महिलेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. संत सर्व शिष्यांना म्हणाले काहीही न बोलता हळू-हळू चालत राहा म्हणजे आपण त्या महिलेला शोधण्यात यशस्वी होऊ. सर्वजण महिलेचा आवाज येत असलेल्या दिशेने पुढे चालू लागले. थोड्या वेळातच संत आणि शिष्य त्या महिलेजवळ पोहोचले. संतने महिलेला विचारले, तुम्ही एकट्या या जंगलात बसून का रडत आहात? महिला म्हणाली- काही दिवसांपूर्वी वाघाने माझ्या पतीला येथे मारून...
  February 7, 12:06 AM
 • अहंकारात असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे सर्वांसमोर शरमेने मान खाली घालावी लागेल एका शहरात एक खूप शूरवीर तलवारबाज राहत होता. त्याचे शौर्य पाहून राजाने त्याला सेनापती बनवले. त्याने अनेक युद्धामध्ये राज्याला विजय मिळवून दिला. अनेक वर्ष त्याने आपल्या राज्याची सेवा केली. काही काळाने त्याला तो वृद्ध होत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्याने आपली तलवार चालवण्याची कला इतरांना शिकवण्याचा विचार केला. ही गोष्ट त्याने राजालाही सांगितली. राजालाही त्याची कल्पना आवडली. राजाने दवंडी देऊन ही...
  February 7, 12:05 AM
 • हिंदू धर्मामध्ये स्कंदपुराणाला महापुराण म्हटले जाते. स्कंदपुराणामध्ये धर्म, ज्ञान आणि नीतीशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. स्कंदपुराणानुसार 5 अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या जीवनात अनिवार्य मानल्या जातात. यामधील एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर जीवन अर्धवट मानले जाते. श्लोक- जीवितं च धनं दारा पुत्राः क्षेत्र गृहाणि च। याति येषां धर्माकृते त भुवि मानवाः।। 1. धन मनुष्य जीवनाचे 4 प्रमुख आधार मानले गेले आहे. ज्याला धर्म ग्रंथांत 4 पुरुषार्थ म्हटले जाते. चारही...
  February 7, 12:03 AM
 • ही कथा पुराणांमधील आहे. एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो राहत असलेल्या नगरमध्ये त्याचा व्यापार काहीच चालत नव्हता. कधीकधी तर दिवसभरातून एकही ग्राहक त्याच्याकडे यायचा नाही. त्याच्या कुटुंबाला कधीकधी उपाशी झोपावे लागत होते. अनेक दिवस असेच चालू राहिले आणि परिस्थितीही बदलली नाही. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला दुसऱ्या नगरात जाऊन व्यापार करण्याचा सल्ला दिला. व्यापाऱ्याला मित्राचा सल्ला पटला. व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलांना घरीच सोडून दुसऱ्या नगरात व्यापारासाठी गेला. नशिबाने...
  February 6, 12:03 AM
 • एका शहरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. एकदा त्याच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झाले. त्याने शहरातील सर्वात प्रसिद्ध डोळ्यांच्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले परंतु काहीच फरक पडला नाही. डोळ्यांच्या उपचारासाठी तो वेदशातही गेला आणि अनेक हकीम, वैद्यांना डोळे दाखवले. एका डॉक्टरांनी त्याला सांगितले की, तुमचे डोळे ठीक होऊ शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला 7 दिवस फक्त हिरवा रंग पाहावा लागेल, इतर कोणताही रंग पाहू नये. शेठजीला प्रश्न पडला की सात दिवस...
  February 6, 12:01 AM
 • एका मोठ्या अधिकाऱ्याला आपल्या पदाचा खूप गर्व होता. एके दिवशी त्याला एक सिद्ध व्यक्तीविषयी समजले. त्याने त्या व्यक्तीला गुरु बनवून त्यांच्याकडून काही ज्ञानाच्या गोष्टी जाणून घ्याव्यात, असा विचार केला. त्या संताला शोधण्यासाठी अधिकारी जंगलात गेला. जंगलात पोहोचल्यानंतर त्याला एक साधारण मनुष्य दिसला. त्याला पाहून अधिकाऱ्याने विचारले- अरे ये, येथे सिद्ध संतांचा आश्रम कुठे आहे? तो व्यक्ती त्या अधिकाऱ्याचे शब्द ऐकूनही काहीच बोलला नाही आणि आपले काम करत राहिला. हे पाहून अधिकाऱ्याला खूप राग...
  February 5, 12:02 AM
 • एकदा स्वामी विवेकानंद यांना एका व्यक्तीने विचारले- स्वामीजी या जगात सर्वात जास्त महत्त्व आईलाच का दिले जाते? स्वामीजी हसून त्या व्यक्तीला म्हणाले- सर्वात आधी तू समोर पडलेला दगड कपड्यात गुंडाळून कंबरेला बांधून घे. त्यानंतर उद्या मला येऊन भेट मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. त्या व्यक्तीने स्वामीजींच्या आज्ञेचे पालन केले आणि कंबरेवर दगड बांधून घेतला. थोड्यावेळाने तो व्यक्ती पुन्हा स्वामीजींकडे आला आणि म्हणाला गुरुजी तुम्ही मला एक प्रश्न विचारल्यामुळे एवढी मोठी शिक्षा का...
  February 5, 12:01 AM
 • एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होतो. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला. ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले- तू...
  February 4, 12:03 AM
 • गरुड पुराणातील आचार कांडमध्ये अशा काही वाईट सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्यामुळे एखादा राजसुद्धा रंक (भिकारी) होऊ शकतो. या वाईट सवयी सोडल्या नाही तर आयुष्यात कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. येथे जाणून घ्या, या वाईट सवयी कोणकोणत्या आहेत... 1. नशा नशा केल्यानंतर व्यक्तीला चांगल्या-वाईट गोष्टींची समज राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच्या कुटुंब आणि मित्रांना दुःख देतो. नशेमध्ये व्यक्ती चुकीचे काम करण्यासाठी प्रेरित होतो. यामुळे यापासून दूर राहावे. 2. मोह अत्याधिक मोह करणेही बरबादीचे कारण ठरू...
  February 4, 12:02 AM
 • प्राचीन काळी एक नवाब होता. घर-कुटुंबात आणि समाजात नवाबाचा खूप मान-सन्मान होता. एके दिवशी नवाब आपल्या पत्नीला म्हणाला, माझ्यामुळे तुला प्रत्येक ठिकाणी मान-सन्मान मिळतो. पत्नीने उत्तर दिले, मी एका मिनिटात तुमचा सर्व मान-सन्मान धुळीस मिळवू शकते. नवाब म्हणाला ठीक आहे असे करूनच दाखव. थोड्यावेळाने दोघांचाही राग शांत झाला आणि काही दिवस असेच निघून गेले. एका संध्याकाळी नवाब आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात घरातून त्यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. नवाबाने विचारले, बेगम काय...
  February 4, 12:01 AM
 • रिलिजन डेस्क : पुरातण काळात एक खूप धार्मिक आणि संस्कारी राजा होता. राजाची ख्याती ऐकून त्याला भेटण्यासाठी एक संत आले. साधूंना भेटून राजाला खूप आनंदझाला. राजाने त्यांच्या पाहूणचारात सर्व सुख-सुविधा पुरविल्या. जेवणाची काळजी घेतली. जेव्हा साधू परत जाण्यास निघाले तेव्हा राजाने महाराजांकडे एक इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, तुमची एखादी इच्छा असेल सांगा. मी ती अवश्य पूर्ण करेन. तुम्ही माझ्याकडे कशाचीही मागणी करू शकता. मी ते पूर्ण करण्याचे वचन देतो. राजाकडे काय मागावे याबाबत साधू विचारात पडले....
  February 1, 12:02 AM
 • रिलिजन डेस्क : सदर गोष्ट श्रीमद् भगवत गीतेतील आहे. महाभारतात या गोष्टीचा उल्लेख आढळून येतो. मनु वंशाची चौथी-पाचवी पिढी होती. स्वर्गात इंद्राचे शासन होते. एकदा इंद्राला दुर्वासा ऋषींच्या शापाचे बळी व्हावे लागले होते. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे इंद्र शक्तीहीन झाला होता. इंद्र शक्तीहीन झाल्यानंतर राक्षसांनी स्वर्गात उत्पात मांडणे सुरु केले. राक्षसांच्या उत्पातामुळे इंद्राला स्वर्गसोडून पळून जावे लागले होते. यानंतर राक्षसांचे साहस आणखीनच वाढले. स्वर्गावर रोज वेगवेगळे हल्ले होत होते....
  February 1, 12:00 AM
 • पद्मपुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांमध्ये गणले जाते. या पुराणामध्ये अशा 4 सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्या कोणत्याही मनुष्याच्या आयुष्याला उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरतात. आयुष्यात नेहमी प्रगती आणि सुखाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी या 4 गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे. श्लोक - न चात्मानं प्रशंसेद्वा परनिन्दां च वर्जयेत्। वेदनिन्दां देवनिन्दां प्रयत्नेन विवर्जयेत्।। 1. स्वतःचे कौतुक करू नका काही लोकांना स्वतःचे कौतुक करण्याची सवय असते. ही सवय मनुष्याला अहंकारी आणि...
  February 1, 12:00 AM
 • लोककल्याणासाठी अनेक नीति ग्रंथांची रचना केली गेली आहे, ज्यामधील एक आहे ते म्हणजे पंचतंत्र. पंचतंत्राची रचना आचार्य विष्णु शर्माने केली आहे. यामध्ये अशा अनेक नितींविषयी सांगितले आहे, ज्यांचे पालन केल्याने आपल्या चांगल्या वाईट कामाची ओळख सहज केली जाऊ शकते. पंचतंत्रची एक नीति अशा तीन कामांविषयी सांगते, जी कामे कोणत्याच मनुष्याने चुकूनही करायला नको. मनुष्यासाठी वर्जित सांगितलले आहे हे 3 काम अयशः प्राप्यते येन येन चापगतिर्भवेत्। स्वर्गाच्च भ्रंश्यते येन न तत्कर्म समाचरते।। 1. जे...
  January 31, 05:21 PM
 • ही कथा महाभारत आणि भगवतगीतेमधील आहे. एक कावळ्याची गरुडाशी मैत्री होते. दोघेही नेहमी सोबत राहायचे. त्यांच्यामधील मैत्री अगदी घट्ट झाली होती आणि दोघेही एकमेकांपासून काहीच लपवून ठेवत नव्हते. एके दिवशी दोघेही नदीच्या काठावर बसून गप्पा मारत होते, तेवढ्यात तेथून एक यमदूत गेला आणि तो कावळ्याकडे पाहून हसला. गरुड आणि कावळ्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा आपल्या गप्पांमध्ये मग्न झाले. दुसऱ्या दिवशीही परत तसेच झाले. दोघेही गप्पा मारत असताना तेथून एक यमदूत गेला आणि तो पुन्हा...
  January 31, 12:01 AM
 • रिलिजन डेस्क. एकेकाळी एक प्रसिध्द गुरु आपल्या शिष्यांसोबत आश्रमात राहायचे. त्या शिष्यांमधून एकाला ईश्वराला प्राप्त इच्छा होती. त्याला माहिती होते की, गुरुंशिवाय ज्ञान शक्य नाही. एकदा हा शिष्य आपल्या गुरुजवळ गेला आणि म्हणाला की, मला ईश्वराचे दर्शन करण्याची इच्छा आहे. गुरुने त्या तरुणाकडे पाहिले आणि एक शब्दही न बोलता फक्त स्मितहास्य केले. तो शिष्य रोज आपल्या गुरुंजवळ जाऊन फक्त एवढेच बोलायचा. एकदा हा शिष्य पुन्हा आपल्या गुरुजवळ गेला तेव्हा गुरु त्याला आपल्यासोबत नदीवर घेऊन गेले आणि...
  January 31, 12:00 AM
 • रिलिजन डेस्क. प्राचिनकाळी एका संतांच्या घरात चोर घुसला. त्यावेळी संतांना झोप लागलेली नव्हती. पण चोराला वाटले की, घराचा मालक झोपलेला आहे. तो चोरी करण्यासाठी मौल्यवान वस्तू शोधू लागला. पण त्याला काहीच सापडले नाही. चोर निराश होऊन परत जात होता. - निराश झालेल्या चोराला पाहून संतांनी त्याला थांबवले. संत चोराला म्हणाले की, हे एका संताचे घर आहे, येथे चोरी करण्यासाठी तुला काहीच सापडणार नाही. येथे फक्त प्रेम मिळू शकते. तु माझ्यासोबत येथे बस आणि रात्रभर देवाची भक्ती कर. तुझे कल्याण होईल. चोराने विचार...
  January 31, 12:00 AM
 • जीवनात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी शास्त्रामध्ये विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीतींचे पालन केल्यास आपल्या विविध अडचणी दूर होऊ शकतात. घर-कुटुंबात सुख-शांती कायम राहते. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गरुड पुराणाच्या नीतीसारमध्ये अशा 4 कामाविषयी सांगण्यात आले आहेत, जे चुकूनही करू नयेत अन्यथा अडचणी वाढत राहतात... 1. अहंकार करू नये काही लोकांना आपल्या पद आणि धनाचा फार अहंकार असतो. या अहंकारामध्ये असे लोक इतरांना तुच्छ मानतात. असे लोक वेळोवेळी इतरांना कमीपणा...
  January 30, 12:02 AM
 • बौद्ध धर्माचे गुरु 14 वे दलाई लामा यांचा जन्म 6 जुलै 1935 मध्ये झाला. यांचे बालपणीचे नाव तेनजिन ग्यात्सो होते. 17 नोव्हेंबर, 1950 मध्ये ते चौदावे दलाई लामा बनले. मानवी मूल्य आणि आधुनिक विज्ञानाचे हे समर्थक आहेत. मानव अधिकारांसाठी काम केल्याबद्दल याना 1989 मध्ये नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथे जाणून घ्या, दलाई लामा यांचे काही खास विचार, ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुख-शांती प्राप्त होऊ शकते... 1. चुका दाखवणारे मित्रच चांगले असतात. कमजोरी दाखवून ते आपल्या व्यक्तिमत्त्वातील लपलेल्या...
  January 30, 12:01 AM
 • रिलीजन डेस्क. प्राचिन काळात एक व्यक्ती आपल्या आयुष्याला खुप कंटाळली होती आणि सकाळ-संध्याकाळ दुःखी राहायची. एक दिवस त्याच्या शहरात एक संत आले. तो युवक त्यांच्या दर्शनासाठी गेला. सर्व लोक संताना आपल्या अडचणी सांगत होते. तेव्हा संधी मिळताच दुःखी तरुण महात्माजींसोबत बोलला. - तरुण म्हणाला मी खुप चिंतेत आहे, माझ्यावर कृपा करा, सर्व अडचणी दूर होतील असा काही तरी उपाय सांगा. - दुःखी व्यक्तीचा प्रश्न ऐकून संत म्हणाले की, मी तुझे दुःख दूर करण्याचा उपाय सांगेल, यासाठी तुला माझे एक काम करावे लागेल. -...
  January 30, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात