जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • प्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या व्यक्तिचा जन्म मोठ्या कुटुंबात, संपन्न परिवारात झाले असेल तर त्या व्यक्तिला या सा-या गोष्टी विनाप्रयास मिळून जातात.समाजात ख्याती कशी प्राप्त करावी ? महान कसे बनावे ? आपल्याला मान सन्मान कसा मिळेल, याविषयी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. कोणत्याही माणसाला महान बनण्यासाठी आवश्यक आहे त्याचे कर्म. व्यक्ती केवळ जन्माने महान बनत नाही. त्यासाठी तिने दृढ...
  September 16, 12:43 PM
 • समजूतदारपणाचा संबंध केवळ शिक्षणाशी नाही. निरक्षर लोकही समजदार असतात. उच्चशिक्षित लोकही नासमजदार असू शकतात. मनाला समजदारीतूनच नियंत्रित केले जाते. समज आपल्यासाठी लाभदायक आहे; मात्र आपल्या मनासाठी तितकीच ती न रुचणारी आहे. त्यामुळे मन हे हरेक समजदारीला विरोध करीत असते. याचा परिणाम जीवनावरही पडत असतो. जीवन सरत असते; मात्र लोक आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराला समजू शकत नाहीत. कारण की मन हे बाधा ठरत असते. यामुळेच लोकांचे जीवन संघर्षमय बनते. जोडीदाराच्या उणिवा सहज आणि सहानुभूतीपूर्वक...
  September 15, 03:03 PM
 • परिवाराची निर्मिती केवळ समाज आणि कुळधर्म निभावण्यासाठी केली तर त्यात कर्तव्याची भावना अधिक असेल, परंतु प्रेम आणि ओलाव्याचा अभाव असेल. अशा परिवारात पति-पत्नीच्या नात्यात वचनाला महत्त्व असते आणि धर्माची आज्ञा मानून ते पाळले जातात. वंशाच्या प्रतिष्ठेचा विचार केल्यास त्यातून प्रेमभावना लोप पावते आणि मजबुरी माणसाला वरचढ ठरते. मात्र परिवारामधील सदस्य एक-दुस-यासाठी जगण्याची भावना ठेवत असतील, प्रेमाने राहू इच्छित असतील तर त्यांनी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवायला हवे. अहंकारामध्ये...
  September 13, 02:23 PM
 • आजार, सदैव दुख आणि यातना देतो. आपण अस्वस्थ होतो, मानसिक शक्तीचे खच्चीकरण होते. आजार अनेक प्रकारचे असतात. आजार हा कधीही वाईटच. प्रत्येक आजारावर एक औषधही असते. या औषधाने आपण बरे होतो. काही आजार शारीरिक असतात तर काही मानसिक. शारीरिक आजारांवर औषधाने विजय मिळविता येतो. पण मानसिक किंवा वैचारिक आजारांवर औषधे काम करीत नाहीत. या संबंधात आचार्य चाणक्य यांनी सर्वात घातक आजार म्हणून 'लोभ' या आजाराचा उल्लेख केला आहे. लोभ म्हणजे हाव. ज्या माणसाच्या मनात लालच किंवा हाव सुटते तो पतनाकडे वेगाने सरकू लागतो. हाव...
  September 12, 08:06 PM
 • अडचणी तर प्रत्येकाच्या जीवनात असतात. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्गही उपलब्ध असतात. काही लोक योग्य वेळी योग्य मार्ग निवडतात आणि यशाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो. काही लोक मात्र सर्व काही नशिबाच्या हवाली सोडून आळसात जीवन कंठतात आणि जीवनभर दु:खाला कवटाळून बसतात.एक सामान्य बालक चंद्रगुप्त याला अखंड भारताचा सम्राट बनविणा-या कौटिल्याच्या जीवनातील एक महत्त्वाचे सूत्र येथे देत आहोत. हे सूत्र आपण अवलंबिले तर आपल्या जीवनाचे सोने होईल. आर्य चाणक्य म्हणतात, नियती तर आपले फासे...
  September 9, 05:28 PM
 • कधीही जुने शास्त्र, विचार, सिद्धांतावर चर्चा करायची असेल तर नवीन शब्दप्रयोग होणे आवश्यक आहे. भावार्थ तोच असावा. जो हजारो वर्षांपूर्वी होता तो. जसे की रुपये - पैसे कुजतात तसेच शब्दही खराब होतात. शब्दांना ताजेतवाने ठेवण्यासाठी मोजकेच बोला. अधिक बोलण्याने केवळ शारीरिक नुकसानच होत नाही तर शब्दांच्या ताकदीची तीव्रता कमी होते. जास्त बोलण्याचा परिणाम घसा आणि फुप्फुसावरही होऊ शकतो, एकूणच ते शरीरास अपायकारक आहे. जास्त बोलणाराला हे माहीत नसते की आपली भाषा कधी वायफळ झाली. समाजात आदर, मोठेपणा आणि...
  September 8, 04:34 PM
 • आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडेसे यशदेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य आहे. आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. परंतु गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील...
  September 4, 05:15 PM
 • एखादे तत्त्व गोष्टीच्या माध्यमातून सांगितले गेले तर मनाला अधिक भावते. समाजात चांगली कामे करणा-या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना असतात. चांगली माणसेही कालांतराने बिघडताना दिसतात. अशी वेळ आपल्यावर येवू नये यासाठी पुढील गोष्ट सदैव मार्गदर्शक ठरणारी आहे.एका गावात मंदिराची निर्मिती सुरू असते. काही वर्षानंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण होते. एका शुभ मुहूर्तावर मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरते. गावचा मुखिया शहरात येतो. सुंदर मूर्ती खरेदी करतो. बस थांब्यावर येतो. खूप वाट पाहूनही बस...
  September 3, 05:07 PM
 • चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद हे भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्यांना भावणारे तत्त्वज्ञान ते सांगत. फसवून गोरगरिबांचे धर्मांतरण करणा-या शक्तींच्या ते विरोधात होते. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आपल्याला जीवनाकडे पाहायची निकोप दृष्टी देवून जाते. स्वामी चिन्मयानंद यांनी सांगितलेली गोष्ट अशी...प्राचीन काळी देव आणि दानव यांच्यात लढाया होत असत, अशा गोष्टी आपण पुराणात वाचतो. या गोष्टींत सांगितलेले असते की देव स्वर्गात असतात आणि राक्षस...
  September 1, 06:09 PM
 • पाप केल्यानंतर त्या पापाचे फळ भोगावेच लागते असे म्हणतात. माणूस जीवनात पाप करतो, त्या पापाचे प्रायश्चित न केल्यास त्यांस यमलोकात शिक्षा भोगावी लागते. एखादी गोष्ट पाप की पुण्या याबद्दलही लोक वाद घालत असतात. परंतु गरुड पुराणात काही पापांची नावे आणि त्यासाठीची शिक्षा याचे वर्णन मिळते.गरुडजी म्हणाले, भगवन जीवांना त्यांच्या कोणत्या पापाची काय शिक्षा मिळते ? पुढील जन्म कसा असतो, तेही सांगा.यावर भगवंत म्हणतात, गरुड लक्षपूर्वक ऐक...- ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी.- गोहत्या करणारा कुबडा.- कन्याहत्या...
  August 24, 07:52 PM
 • मनुष्य जीवन दुर्लभ आहे. देवतांनाही मनुष्य जन्म घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. असे दुर्लभ जीवन नियोजनाअभावी, विचार न करता असेच घालविले तर त्यात शहाणपण नाहीच. रोजच्या जगण्यात लग्न, व्यापार, नोकरी आणि इतर छोटी मोठी कामे करतानाही आपण नियोजन करतो. मग इतके मौल्यवान जीवन, नियोजन न करता घालवणे योग्य होईल काय ? आणि जीवनाचे नियोजन, व्यवस्थापन करण्याची गोष्ट येते तेव्हा आपल्यासमोर नाव येते ते पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण यांचे.भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेल्या 6 मौल्यवान गोष्टी आपण येथे जाणून...
  August 22, 05:33 PM
 • नदीचे पाणी धरणात अडवून ऊर्जा व सिंचनाची कामे पार पाडली जातात. अगदी तसेच धनाच्या प्रवाहालाही बंधन घालावे लागेल. याचा अर्थ पैशाचा प्रवाह रोखायचा असा नव्हे. शिस्त आणि नियमपूर्वक पैशांचे व्यवहार हेच त्यावरील बंधन आहे. धन आणि नदीची गती सारखीच असते. नदी नष्टचर्य, कष्ट आणि समाधान या तिन्ही गोष्टी देते. धन आपल्या जीवनात येते तेव्हा त्यातून अनेक उत्तरे मिळतात आणि तेवढेच प्रश्नही उभे राहतात. पैशांमुळे प्रत्येक गोष्टीची विभागणी होते. त्यामुळे पैशांच्या बाबतीत बाजू घ्यायची असेल...
  August 20, 01:24 AM
 • ब्रेन केमिकल्सच्या असंतुलनामुळे मूड चांगला ठेवणारा सेरोटॉनिन हार्मोन गडबडून जातो. त्यामुळे रोगी डिप्रेशनमध्ये येऊ शकतो. अशा स्थितीत प्रीस्क्राइब करण्यात येणाया अँटिडिप्रेसेंटने अनेक साइड इफेक्टस्सुद्धा होऊ शकतात. कसे ते जाणून घेऊया... जीव घाबरा होणे आणि अनिद्रेचा विकार जडणे. अधिक थकल्यासारखे वाटणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ होणे इत्यादी. तोंड कोरडे पडणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, काम करताना चिडचिड करणे आणि जास्त राग करणे. गर्भावस्थेत अँटिडिप्रेसेंट घेतल्याने होणाया बाळावर त्याचा...
  August 19, 08:41 AM
 • भारतीय संस्कृतीने एक महत्त्वाचा शब्द दिला आहे तो म्हणजे अपरिग्रह. याचा अर्थ जास्त संग्रहाची वृत्ती ठेवू नये. कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ त्या गोष्टीतील आनंदच हरवून टाकतो हा त्यामागचा विचार आहे. जग पैशाच्या मागे पळते ते फक्त मौजमजा करता यावी म्हणून! आज खा-प्या, मजा करा, उद्या कुणी पाहिला. यामुळेच अनेक मोठे देश दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. भविष्याबद्दलच्या अनेक शानदार योजना असलेले पण जीवनाबद्दल दृष्टीच विकसित न झालेले अनेक देश आहेत. भारताने नेहमीच कोणतीही प्रगती किंवा...
  August 19, 03:16 AM
 • परमात्म्याचे लौकिक स्वरूप आपल्याला मौलिक बनण्यास मदत करते. त्यामुळे आपण मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना केली, अवतारकथा जीवनाशी संलग्न केल्या. या दिव्य आत्म्यांना आपण आपल्या जीवनात आपली मौलिकता उजळून जाईल अशा प्रकारे स्वीकारायला हवे. बहुतांश लोक जगाची पळापळ पाहून स्वत:देखील त्याच्यामागे पळू लागतात. लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टींचे अनुकरण जरूर करायला हवे, पण आपल्याकडेही आपली मौलिक ध्येये असायला हवीत. दुसरे पैसा कमावत...
  August 18, 04:05 AM
 • जगाच्या इतिहासात एकाहून एक श्रीमंत माणसं होऊन गेली आहेत. परंतु श्रीमंती सार्थकी लागल्याची उदाहरणे मात्र बोटावर मोजण्याइतकीच. श्रीमंती आल्यानंतर माणसं अहंकारी, स्वार्थी आणि विलासी बनतात, असे बहुतेक वेळा पाहायला मिळते. पैसा, प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊनही शालीनता जपणारी माणसं खूपच कमी असतात. धन संपत्ती ही कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. परिश्रम, सौभाग्य आणि पूर्वजन्मपुण्याईमुळे धनप्राप्ती होते. या श्रीमंतीचा वापर सार्थक कार्यासाठी करणा-या व्यक्तींचे नावे इतिहासात अजरामर होतात. ते...
  August 11, 12:16 PM
 • सुखी आणि आनंदी राहण्याचे अनेक मार्ग आहेत. भौतिक जीवनातून सुख मिळविताना एक अडचण असते ती म्हणजे ती भौतिक बाब नष्ट होते तेव्हा आपण पुन्हा दु:खी होतो. क्लबला गेले, टीव्ही पाहिली, खेळ खेळले आणि या बाबींपासून दूर गेले की पुन्हा आपण अशांत होतो. कायमस्वरुपी आनंद देणारी कोणती गोष्ट आहे काय ? आपल्याला कायमस्वरुपी सुख पाहिजे तर आंतरिक सुखाचा शोध घ्या.जे लोक या जगात ख-या अर्थाने सुखी आहेत, त्यांनी आपल्या एकांताचा योग्य वापर केला. एकांतात आपल्या अंतर्मनाचा त्यांनी शोध घेतला. कारण यासाठी भौतिक जीवनाच्या...
  August 9, 07:11 PM
 • आज माणसाची गती वाढलेली आहे. प्रतीक्षा करण्याची कोणाचीच तयारी नाही. घाई करण्याच्या नादात माणूस धैर्य हरवून बसला आहे. भौतिक जीवनात घाई किंवा जल्दबाजी करण्यालाच गुण मानण्यात येत आहे. अध्यात्मात मात्र धैर्य हीच संपत्ती आहे. ज्यांच्याजवळ धीर आहे त्यांनाच परमेश्वरप्राप्ती होते. ज्याच्याकडे धीर आहे तोच आपल्या आजूबाजूलाही पाहू शकतो. जो घाईत आहे त्याच्याजवळ आजूबाजूला पाहायला वेळच नाही.दूरच्या लोकांची बात सोडा, जवळच्या नातेवाईकांकडे पाहायलाही यांच्याकडे वेळ नसते. जीवनात धैर्य असेल तर आपण...
  August 8, 02:42 PM
 • चांगली स्मरणशक्ती याचा अर्थ असा नाही की सर्वच गोष्टी आपल्या ध्यानात ठेवाव्यात. ज्या गोष्टी विसरण्यायोग्य आहेत त्या विसरणे म्हणजेही स्मरणशक्तीच होय. एखादी गोष्ट ध्यानात ठेवायला शक्ती खर्च होते. परंतु विसरण्यासाठी त्याहून अधिक शक्ती खर्च होत असते. स्मरणशक्ती ही लाभदायी असली पाहिजे. ज्या गोष्टी आनंद देणा-या आहेत, चित्त हलके करणा-या आहेत, त्याच ध्यानात ठेवा. ज्या गोष्टी ध्यानात ठेवल्याने निराशा, जडता, खिन्नता येते त्या गोष्टी आठवायच्याच कशाला. स्मरणशक्तीलाही रिचार्ज करावा लागतो. सतत...
  August 7, 03:51 PM
 • बहुतेक वेळा आपण दुस-यांच्या सल्ल्याने वागत असतो. काही लोक छोट्या-छोट्या निर्णयांसाठीही दुस-यांवर अवलंबून असतात. स्वत:वर श्रद्धा नसल्याचा हा परिणाम आहे. कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील, याकडे अधिक लक्ष देवू नये. लोकांच्या म्हणण्यानुसार आपण वागू लागतो तेव्हा आपले मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो.आपण स्वत:वर श्रद्धा ठेवू लागलो की हळूहळू आपल्या योग्यतेत वाढ होऊ लागेल. चांगल्या आणि वाईट दोन्ही स्थितीत निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात विकसित होऊ लागेल....
  August 4, 07:30 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात