जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • जानेवारीच्या अखेरीस देशातील एका राजकीय घराण्याचा वारसा सांगणाऱ्या प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारण प्रवेश काँग्रेसजनांसाठी आश्वासक बातमी ठरली. यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रातील एका राजकीय घराण्याचा वारसा सांगणाऱ्या ३२ वर्षीय नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याची सुखद वार्ता आली. शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील हे नीला यांचे पिता आहेत. नीला स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात फायनान्स इन्चार्ज आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त नीला...
  March 8, 02:38 PM
 • सुमारे ४२ हजार वर्षापूर्वीचा इतिहास सांगताे की, महिलांनीच मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक शाेधांचा याेग्य वापर करण्यास स्वत: शिकली आणि इतरांनाही तीने शिकवले. आगीचा याेग्य वापर करण्यापासून ते काॅम्प्युटिंग पर्यंतचा प्रवास महिलांचीच देण आहे. ४२ हजार वर्षापूर्वी आगीपासून सुरक्षेची आणि स्वयंपाकाची कला शिकली ४२ हजार वर्षापूर्वी महिलांनी आगीवर नियंत्रण राखण्याचे काैशल्य प्राप्त केले. पुरूष शिकार करीत, महिला मुलांची देखभाल करीत. घरासारखे सुरक्षित ठिकाण...
  March 8, 11:42 AM
 • चेन्नईहून गीताचे वडील टी. व्ही. गोपीनाथ मला आठवते, गीता सातवीत हाेती. तेव्हापासून गावातील शाळेत ती एकटीच जाऊ लागली. ताे तिचा निर्णय हाेता. या निर्णयामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तिचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. एकदा मला इंटर स्कूल अॅथलेटिक्स स्पर्धेबाबत माहिती मिळाली. गीताला मी त्यात सहभागी हाेण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, पापा मी नंबर वन बनू इच्छिते. परंतु स्पाेर्ट्समध्ये नंबर वन हाेईन, इतकी चांगली नाही. १२ वर्षांच्या मुलीची या विचारसरणीने मला आश्चर्य वाटले. हायस्कूल व...
  March 8, 11:21 AM
 • मध्य प्रदेशातील रिवाच्या अवनी यांची आई सविता चतुर्वेदी अवनी हिला सामान्य मुलींप्रमाणे चित्रकला, पाककला, पेंटिंग यांची खूप आवड हाेती. पायलट बनायचे आहे, असे ती नेहमी सांगत हाेती. आपल्या समाजात काही जण मुलींना बिचारी संबोधत कमकुवत करतात. यामुळे मी तिला नेहमी सांगत आले, तू आणि तुझा भाऊ यांच्यात काहीच फरक नाही. यामुळे आज दाेघेही लष्करात अधिकारी आहेत. अवनी बीटेक करण्यासाठी राजस्थानमध्ये जात हाेती तेव्हा आम्ही तिला साेडण्यास गेलाे. त्या वेळी तिला म्हणालाे, पुढचा मार्ग तुला एकटीलाच पूर्ण...
  March 8, 11:18 AM
 • ३८ वर्षीय जसिंदा वर्षभरात महिला सशक्तीकरणाची शक्तिशाली प्रतिमा बनल्या आहेत. त्या जगातील सर्वात कमी वयाच्या महिला पंतप्रधान आहेत. प्रसूती रजा घेऊन मातृत्व, करिअरमध्ये समानतेचा संदेश देणाऱ्या त्या एकमेव राष्ट्रप्रमुख आहेत... न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणजे माझी पार्टनर जसिंदा आर्दनर व माझ्याबाबत वाचून आपणास वाटेल महिला समानतेच्या मुद्द्यात जग उलट्या दिशेने चालत आहे. आमच्या कथेत जसिंदा मातृत्व आणि देशाशी संबंधित जबाबदाऱ्यांत संतुलन साधताना दिसेल. प्रसूती रजेनंतर संसदेत दाखल...
  March 8, 11:14 AM
 • १९ व्या शतकापूर्वी : २ हजार वर्षांपर्यंत गुलाबी रंग पुरुष शौर्याचे प्रतीक हाेते १९व्या शतकापूर्वी गुलाबी रंग युद्ध आणि शौर्याचे प्रतीक हाेते. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यात अधिकाऱ्यांचे हेल्मेट व ड्रेस गुलाबी रंगाचे हाेते. १७९४ मध्ये आलेले पुस्तक ए जर्नी राउंड माय रूम मध्ये लिहिले की, पुरुषांच्या खाेलीत गुलाबी रंगाचे पेंटिंग व वस्तू असायला हव्या. यामुळे उत्साह वाढताे. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, याविषयी आणखी रंजक माहिती...
  March 8, 11:10 AM
 • औरंगाबाद - देशातील राजकीय पक्ष देणग्या मिळवण्यात कोटीच्या कोटी उड्डाणे गाठत असताना भारतीय जनता पार्टीने थेट हनुमान उडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात देशातील प्रमुख सहा राजकीय पक्षांना १२९३.०५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. यात एकट्या भाजपला १०२७.३४ कोटींची देणगी मिळाली आहे. राजकीय पक्षांना ज्ञात आणि अज्ञात अशा स्रोतांतून वर्गणी घेता येते. ६ पक्षांच्या खात्यात अज्ञात स्रोतांतून ६८९.४४ कोटी रुपये जमा झाले. यात भाजपच्या खात्यात ५५३ कोटी जमले आहेत. ही रक्कम एकूण अज्ञात स्रोताच्या ८०...
  March 4, 10:36 AM
 • अलीकडेच ऑस्कर समारंभात नेटफ्लिक्सने चार पुरस्कार जिंकले आहेत. नेटफ्लिक्स हे ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म आणि त्यासारखे इतर डिजिटल मीडिया हॉलीवूड आणि बॉलीवूडसाठी आव्हान ठरत आहेत. टेक क्रंचच्या अहवालानुसार २० वर्षांत अमेरिकेत चित्रपटांच्या तिकिटांच्या विक्रीत १० % पेक्षा जास्त घट झाली आहे. आता त्याचा परिणाम भारतातही दिसत आहे. अर्नस्ट अँड यंग आणि फिक्कीच्या अहवालानुसार २०२० पर्यंत भारतीय चित्रपट उद्योगाला १९,२०० कोटी उत्पन्न मिळेल, तर डिजिटलला २२,४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल....
  March 3, 11:37 AM
 • आजपासून अंदाजे १२५ वर्षांपूर्वी जपानच्या एका छोट्या गावात शेतकऱ्याच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नावे कोनोसुके असे ठेवण्यात आले. कोनोसुके जेव्हा नऊ वर्षांचे होते, तेव्हा वडिलांना आर्थिक अडचणींमुळे सर्व जमीन विकावी लागली आणि घर सोडावे लागले. गावात सर्व काही गमावलेले कोनोसुके यांचा परिवार वडिलांसह शहरात आला आणि लहानमोठी कामे करू लागला. आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी कोनोसुके यांनाही शिक्षण सोडून एका दुकानात काम करावे लागले. सूर्याेदय झाल्या झाल्या ते उठत असत. दुकानाची स्वच्छता...
  March 3, 10:34 AM
 • जगात अनेक भाषा बोलल्या जातात; पण सर्वात जवळची असते ती आपली मातृभाषा. तिच्याबद्दल एक वेगळी आपुलकी असते. एखाद्या ठिकाणी गेल्यावर दुसरी भाषा बोलण्याची वेळ आली की तारांबळ उडते. मध्य प्रदेशात हिंदीचे प्रभुत्व आहे. काही वर्षे तेथे राहण्याचा योग आला. तेव्हा मराठीच्या संदर्भाने वेगळे अनुभव मिळाले. तिथे मराठीचे वेगळेपण जास्त लक्षात आले. हिंदी वातावरणात बोलण्याची भीती वाटायची. माणूस भीती आणि रागातही मातृभाषेलाच प्राधान्य देतो. त्यामुळे जास्तितजास्त मराठीतच बोलायचे. हिंदीच्या प्रभावात...
  February 27, 10:27 AM
 • तसं म्हणलं तर आम्ही भारताबाहेर राहतोय, ज्यांना एनआरआय संबोधले जाते. इंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या अमेरिका, इंग्लंड सारख्या नव्हे तर वेगळीच ओळख, वेगळी भाषा व संस्कृती असलेल्या जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये. इथे आमचं थोडं वेगळं आहे असं म्हणता येईल. त्यातच याच माय मराठीने इथल्या मराठीजनांना एकत्र आणलं. यातूनच महाराष्ट्र मंडळ म्युनिकची स्थापना झाली. या मंडळाने जर्मनीत पहिली शाळा काढण्याचा मान मिळवला. इथे महाराष्ट्र दिनापासून ते दिवाळीअंकापर्यंत एकूण एक सण, वार, परंपरा मनापासून...
  February 27, 10:25 AM
 • नुकतेच एका मंत्री महोदयांची एका इंग्रजी बातमीदाराने घेतलेली मुलाखत ऐकली . मराठी भाषिक मंत्रीमहोदयांचा इंग्रजीतूनच उत्तर देण्याचा अट्टाहास कौतुकास्पद होता. पण जर त्यांनी मराठीतूनच उत्तरे दिली असती तर ती अधिक श्रवणीय आणि माहितीपर ठरली असती हे मात्र तितकेच खरे. मी माझ्या मातृभाषेतच बोलणार , तुम्ही करत बसा भाषांतर हा आविर्भाव आणि हट्ट करणाऱ्या लोकांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. मला काही अगदी उच्चशिक्षित मंडळीही माहिती आहेत ज्यांनी इंग्रजीतच बोलावं लागेल असा आग्रह असलेल्या...
  February 27, 10:24 AM
 • आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावं, उच्चभ्रू जीवनशैली जगावी, आपल्यापेक्षा उत्तम अभ्युदय साधावा... या साऱ्यांच्या जोडीने आपल्या मुलांनी उत्तम माणूसपण निभावणं, हेही महत्त्वाचं आणि अगत्याचं आहे, याचं विस्मरण सध्या आजूबाजूला दिसतं. उत्तम माणूस होण्याची एक वाट पुस्तकं, भाषा, साहित्य, कलांमधून जाते, हे समजून घेणं, ही आजची गरज आहे. पालकांच्या हातात पुस्तकं असतील, तर मुलांच्या हातात ती वेगळी देण्याची गरजच पडणार नाही. मात्र, पालकांच्या हातात मोबाइल, टीव्ही असेल तर मुलांकडून वेगळ्या अपेक्षा करता...
  February 27, 10:09 AM
 • मराठी भाषा दिनानिमित्ताने माय मराठीचा गुणगौरव गायला जाईल किंवा तिच्या भवितव्याची चिंता वाहिली जाईल. सर्वसामान्यांसाठी मात्र मराठी सोबत करते ती दैनंदिन भाषा व्यवहार, परस्पर संवादात, वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुस्तकात आणि मनोरंजनाच्या निमित्ताने नाटक, सिनेमात. म्हणूनच राज्यातील सहा प्रमुख शहरांमधील मराठीजनांच्या व्यवहारात ही माय मराठी नेमकी कुठे आहे या उद्देशाने महासर्वेक्षणाच्या माध्यमातून दिव्य मराठीने घेतलेला हा मागोवा. भाषा व्यवहारात आणि लोकांच्या संवादातून मराठी...
  February 27, 09:26 AM
 • मुंबईची हवा अन् राजकारणही तापत चाललंय. विरोधी गटाची तीन सेंटर्स सध्या चर्चेत आहेत. एक शरद पवार यांचं भुलाबाई देसाई रोडवरचं सिल्व्हर ओक निवासस्थान. दुसरं प्रदेश काँग्रेसचं मुख्यालय परळातलं टिळक भवन अन् तिसरं म्हणजे दादरच्या हिंदू काॅलनीतलं ऐतिहासिक महत्त्व असलेलं बाळासाहेब ऊर्फ अॅड. प्रकाश आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान. मुंबईतल्या एकूण एक अड्ड्यावर बाळासाहेबांची चर्चा आहे. आंबेडकरी जनतेनं तर आता ठरवूनच टाकलंय ते म्हणजे एकच साहेब. बाळासाहेब ! काेरेगाव भीमा हिंसाचारानंतर...
  February 25, 10:14 AM
 • एका राष्ट्रीय पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सध्या तिकीट घेता का तिकीट... असे म्हणत राज्यभर फिरत आहेत. कारण, त्यांना हायकमांडने लोकसभेसाठी पाच कोटींचे टार्गेट दिलेले आहे. या वेळी ही पार्टी राज्यात लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवत आहे. विशेष म्हणजे ही पार्टी युती किंवा महाअाघाडीच्या लफड्यात कधीच पडत नाही. हरलो तरी बेहत्तर या तडफेने ती सर्व जागा नित्य लढवते. काँग्रेस, भाजपने तिकीट नाकारलेले बंडखोर या पार्टीचे हमखास तिकीट घेत असत. कारण, या पार्टीला महाराष्ट्रात पक्षविस्तारात...
  February 22, 11:39 AM
 • इस्लामिक क्रांतीने चाळीसी गाठली तरी इराणी शासन व्यवस्थेवरील धर्मगुरूंचा पगडा हटला नाही. ओबामांची होप विंडो ट्रम्पने बंद केल्यामुळे इराणमध्ये अस्वस्थता आहे. छुपा धर्मवाद जोपासणारा साैदी अरेबिया आर्थिक सत्ता बनला, तर कट्टरवादामुळे भुकेकंगाल व्हावे लागल्याची सल इराणला आहे. तालिबान-अमेरिका एकत्र येऊ जात असताना, इराण भारतासाठी होप विंडो ठरू शकेल का? ते काही महिन्यांतच कळेल. कारण, सुन्नी बहुल पाकिस्तानची खोड जिरवायला इराणशी मैत्री कामी येऊ शकते, तेल खरेदी स्वस्तात होऊ शकते. रामजन्मभूमी...
  February 18, 09:52 AM
 • हाडामांसाचीच माणसं असतात, आई -बाप- बायको- पोरं अन नात्यागोत्यांनी भरलेल्या भरगच्च घरातनं मै रहूँ या ना रहूँ, मेरा देश रहना चाहिये...8 म्हणत ताठ मानेनं लढायला सीमेवर जातात. या भावनेला वंदन केलं पाहिजे. देश एका मोठ्या दुःखातून जातोय... झगमगाट दुनियेत प्रचंड आक्रोश दिसतोय... पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, नामोनिशाण मिटवलं पाहिजे... इट का जवाब पत्थर से दिला पाहिजे... अशी भावना व्यक्त होतेय. उभा देश हळहळताना पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबी आलंय... एका बाजूला आभाळाएवढं दु:ख पदरात घेऊन मायमाऊल्या...
  February 18, 09:51 AM
 • औद्योगिक क्रांतीत आमचे देशी उद्योग बुडाले आणि बेकारी वाढली. आज बीए, बीएस्सी, बीकॉम आदी पदव्यांना नोकऱ्यांच्या बाजारात शून्य किंमत आहे. त्यातही जे विद्यार्थी सोपा विषय म्हणून भाषा घेतात किंवा भूगोल घेतात, त्यांचे नोकऱ्यांच्या संदर्भातील भवितव्य फारच अंधकारमय आहे. आरक्षणाच्या माध्यमातून ज्या सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत, त्या अतिशय मर्यादित आहेत. चौथी औद्योगिक क्रांती पारंपरिक नोकऱ्या कमी करत जाईल आणि नवीन नोकऱ्या निर्माण करत जाईल. या नवीन नोकऱ्या त्यांनाच मिळू शकतील, ज्यांच्याकडे तशा...
  February 18, 09:42 AM
 • प्रत्येक नागरिकाने राजकारण समजून घेतले पाहिजे. त्याने राजकारणावर बोलले पाहिजे. लेखक तर राजकीय जाणिवांनी संपन्न असतो. मग त्यांनी राजकारणावरील भाष्य का टाळावे? जे टाळतात ते पळपुटे आहेत, असे परखड मत प्रसिद्ध हिंदी लेखिका डॉ. शशिकला राय यांनी व्यक्त केले. नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त त्या औरंगाबाद येथे येऊन गेल्या. आमच्या प्रतिनिधी मंजिरी काळवीट यांनी साहित्य, सिनेमा, राजकीय घडामोडींबाबत मुलाखतीद्वारे त्यांची मते जाणून घेतली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला नयनतारा सहगल यांना...
  January 31, 10:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात