Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • नवी दिल्ली - आतापर्यंत आपल्याला एवढेच माहिती होते की आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक आहे आणि खनिज द्रव्ये आरोग्यासाठी आवश्यक आहेत. मात्र, सौंदर्य वाढवण्यासाठी ऑक्सिजन आणि खनिजे जास्त फायदेशीर ठरतात, असा सौंदर्यतज्ज्ञांचा दावा आहे. ऑक्सिजनच्या वापराने त्वचा जास्त ताजीतवानी होते. मिनरल मेकअपने सौंदर्य वाढवण्यास मदत होते. या प्रकारच्या सौंदर्यवाढीसाठी वापरण्यात येणाया माध्यमांना बराच खर्च येत असला तरी लोकांचा कल याकडे जास्त असल्याचे दिसून येते. सौंदर्यतज्ज्ञ मंजू रावत...
  June 28, 04:05 AM
 • अहमदाबाद - खासगी नोकरीतून थोडी बचत केली होती. त्या एफडीतून मासिक पाच हजार रुपये व्याज मिळते. त्यातील १५०० रुपये औषधांवर खर्च होतात. तीन हजार रुपये घरी देतो. सून म्हणते, स्वयंपाकाचा गॅस महागला आहे, घरात राहायचे असेल तर चार हजार रुपये द्या; नसता दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. ७० वर्षांच्या रमणलाल यांनी (नाव बदलले आहे) पश्चिम अहमदाबाद येथील जीवनसंध्या वृद्धाश्रमात पोहोचून रविवारी त्यांच्यावर आलेले संकट त्यांनी ऐकवले. स्वत:चा मुलगा आणि सुनेमुळे त्रासलेल्या रमणलाल यांना जरी घर सोडावे लागले तरी...
  June 28, 04:04 AM
 • गेल्या पंधरवडाभर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोयीस्करपणे रिचेबल-नॉट रिचेबल राहून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात उघडपणे शड्डू ठोकला. यापूर्वी मुंडेंनी स्वत:हून आव्हान देऊनही त्या दोन्ही वेळी अखेर नुरा कुस्त्याच ठरल्या होत्या. त्यामुळे या खेपेस तरी निकाली लढत समस्तजनांना पाहावयास मिळेल अशी जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्यांनी यंदाही धुळीस मिळविली. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या बंगल्यावर पक्षातच राहण्याची घोषणा त्यांनी केली खरी; पण समेटाची मिठाई...
  June 27, 03:31 AM
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि संघाचे विचारवंत मा. गो. वैद्य यांनी संघाचे मुखपत्र समजल्या जाणार्या मराठी दैनिकातून भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. संघ परिवारात मा. गो. वैद्य यांची भूमिका मार्गदर्शक समजली जाते. 'गोपीनाथ मुंडे यांचा बंडाचा झेंडा खाली आला, हे चांगले झाले. पण व्यक्तिगत अहंकाराने अभिभूत झालेल्या व्यक्तीचा तो अहंकार पुनः केव्हा उसळी मारील याचा नेम नसतो,' अशा शब्दात मुंडे यांच्या भूमिकेवर वैद्य यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित...
  June 26, 10:45 PM
 • स्वामी विवेकानंदांची मानसकन्या भगिनी निवेदिता यांनी स्त्री शिक्षणासाठी कठीण श्रम वेचले आणि मुलींसाठी शाळा काढली. ही शाळा व स्त्री शिक्षण हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. यासाठी त्यांनी आपल्या तत्त्वांना कधीच मुरड घातली नाही. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे देशवासियांनी त्यांना भगिनी म्हणून स्वीकारले. कर्मयोगिनी भगिनी निवेदितांचे हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. हे वर्ष भारतभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम करून साजरे केले जात आहे.हिंदुत्वाची सेवा हेच जीवनाचे ध्येय, तीच एकमेव उपासना...
  June 26, 02:46 AM
 • प्रत्येक सुखी संसार हा प्रेमाच्या मजबूत पायावर उभा असतो व खरं प्रेम हे त्यागात असतं, दुस-यासाठी निरपेक्षपणे काही करण्यात असतं. हाच आदर्श आपल्यापैकी प्रत्येकीने घेतल्यास सात पावलांचा स्वर्गाचा प्रत्यय येणे सहजशक्य आहे.संसार...! म्हटलं म्हणजे तडजोड ही आलीच. कितीही यशस्वी संसार असला; तरी कधी ना कधी, कुठे ना कुठे दोघांनाही तडजोड करावीच लागते. प्रसंगानुरूप, पती व पत्नी दोघांनीही समजदारीतून निर्णय घ्यावा लागतो.प्रत्येक दाम्पत्याचे आयुष्य समांतर न राहता ती एकमेकांत मिसळून जावी लागतात. इथे...
  June 26, 02:43 AM
 • मला आठवतं मी 3 वर्षांची होते. माझी आजी महिन्याचा आर्थिक ताळेबंद मांडायची, तेव्हा मी तिला अनेकदा पाहिलंय. जमाखर्चाच्या वहीच्या डाव्या बाजूस ती पेपरवाला, मोलकरीण आणि महत्त्वाचे म्हणजे गॅस सिलिंडर आणून देणार-या पोराची मजूरी याची आवर्जून नोंद करायची. महिन्याच्या शेवटी आजोबासमोर ताळेबंद मांडल्यावर तिला घरखर्चासाठी पैसे मिळायचे. पैशा-पैशाचा हिशोब जुळवून तिला कसरत करावी लागत असे. 1970-1980 च्या दशकात सरकारी कर्मचार-याला 9 सदस्यांचे कुटुंब चालविणे साधी गोष्ट नव्हती. परंतु माझी आजी तिच्या बजेट...
  June 25, 08:51 PM
 • परमेश्वराच्या राज्यातून येताना जर आपल्याला तो एकटं पाठवतो तर या जीवनातसुद्धा तुम्ही एकटे राहावे. म्हणजे स्वत:च स्वत:ची सोबत करावी. आपले मन, आपले विचार, आपली श्रद्धा व विश्वास हे सारे आपल्या सोबत ठेवावे. मग दुस-या व्यक्तीच्या सोबतीची गरज वाटणार नाही.ना ट्यमहोत्सवाला जाण्याची माझी खूप इच्छा होती. पण सोबत कुणी नव्हते. सारखी तगमग सुरू होती. हिला फोन कर, तिला फोन कर; पण प्रत्येक जण स्वत:ची काहीतरी अडचण सांगत होते. सारखं वाटत होतं, किती बायका स्वत:च्या संसारात कायम अडकून पडतात? आधी मुलं लहान म्हणून...
  June 25, 02:46 AM
 • मोठ्यांच्या आशीर्वादामुळे संसारातले,व्यवहारातील खाचखळगे, ऊन-वारा माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. मी आठवणीत ठेवली ती दोनशे झाडांच्या आमराईची मालकीण असणारी, सगळ्यांना आंबे आग्रहाने खाऊ घालणारी यांची आई. पोत्यातून, कणगीतून धान्य भरलं तरीही मातेरं धुवून त्या धान्याचा उपयोग करणा-या माझ्या जावा. माझ्यासाठी संसाराचं मॅनेजमेंट करणा-या हा आदर्श नमुना स्मरणात राहील. घरातल्या बागेतील आंबे गढीमध्ये छान पिकले होते. रसासाठी आंबे काढता-काढता माझ्या सासरच्या आमराईतून मन विहरू लागलं. ४० वर्षांपूर्वी...
  June 25, 02:39 AM
 • अडीच महिन्यांतील नऊ बैठका आणि प्रचंड गाजावाजानंतर प्रस्तावित लोकपाल विधेयकाचे दोन मसुदे जनतेसमोर येत आहेत. यापैकी एक मसुदा लोकपाल विधेयक तयार करणाया दहासदस्यीय समितीने, तर दुसरा मसुदा जनलोकपाल समितीत सहभागी टीम अण्णांच्या सदस्यांनी तयार केला आहे. या दोन्ही मसुद्यांत नेमका कुठे आणि काय फरक आहे? पंतप्रधानपद लोकपाल कक्षेत आणावे काय? लोकपालमध्ये सात सदस्य असावेत की अकरा? त्यांची निवड पद्धत कोणती असावी? त्यांच्या निवड पद्धतीवर सरकार, सत्तारूढ पक्ष आणि राजकारण्यांचे वर्चस्व असायला हवे...
  June 25, 02:02 AM
 • क्रिकेट, बेसबॉल, गोल्फ, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस किंवा टेनिस, या सर्व खेळांमधील साम्य म्हणजे यांच्यामध्ये होणारा चेंडूचा वापर. टेनिसचा सामना सुरू झाला की, चाहत्यांच्या केंद्रस्थानी जसे खेळाडू असतात अगदी तसेच प्रत्येक खेळाडूच्या केंद्रस्थानी टेनिसचा चेंडू असतो. सध्या जो रंग चेंडूसाठी वापरला जातो, त्याला ऑप्टिक यलो असे म्हणतात. व्यावसायिक टेनिससाठी तीन प्रकारचे चेंडू वापरले जातात. क्ले कोर्ट, लॉन टेनिस, कार्पेट व हार्ड कोर्ट यांच्यासाठी वेगवेगळे चेंडू उपयोगात...
  June 24, 03:30 PM
 • एमबीबीएस प्रवेश मिळण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांकाने पास झालेला विद्यार्थी जर पुढच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच सत्रात नापास झाला तर यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, छत्तीसगडच्या रायपूर इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात असे घडले आहे. पूर्व परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात चक्क नापास झाले आहेत.वैद्यकीय पूर्व परीक्षेच्या निकालात चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण...
  June 23, 10:27 AM
 • धार्मिक संस्थेच्या नावाखाली असणाया धार्मिक आणि चॅरिटेबल ट्रस्टवर आता आयकर विभाग विशेष लक्ष ठेवणार आहे. या संस्थांकडून एका निश्चित रकमेच्या कराची वसुली केली जाणार आहे. त्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे. आयकर विभागाकडून आतापर्यंत या संस्थांच्या हिशेबावर कर आकारणी केली जायची. मात्र, आता या संस्थांकडून विशेषत: धार्मिक ट्रस्टकडून निश्चित रकमेची करवसुली केली जाणार असल्याचे, मुख्य आयकर आयुक्त के. एस. पठाणीया यांनी केले. ज्या धार्मिक संस्थांची नोंदणी केलेली असते, त्यांच्या हिशेबाचा...
  June 23, 10:23 AM
 • ऑक्सफर्ड विद्यापीठ हे शिक्षण आणि संशोधनात जगात सर्वात अव्वल क्रमांकावर आहे. तुमच्या दृष्टीने या यशाचे गमक काय?ऑक्सफर्ड विद्यापीठाला स्वत:ची अशी एक परंपरा आहे. पण खूप जुना इतिहास असला तरी आम्ही इतिहासाला चिकटून राहत नाहीत. खरं तर, नवीन बदलांशिवाय आणि नव्या कल्पनांना स्वीकारल्याशिवाय कोणतीही संस्था एवढी वर्षे जिवंत राहत नाही. विद्यापीठाच्या यशामागे ९०० वर्षांपासूनच्या नावीन्याचा ध्यास आहे. स्वातंत्र्य, खुली चर्चा आणि वेगवेगळी मतं हे ऑक्सफर्ड संस्थेचे मूळ आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी हे...
  June 23, 10:21 AM
 • नोकरीच्या गावावरून बदली टाळण्यासाठी आतापर्यंत अनेक कारणं ऐकली आहेत. पण भोपाळमध्ये बदली रद्द करण्याची जगावेगळी कारणं दिली गेल्याचे समोर आले आहे. उच्च शिक्षण विभागाने कित्येक वर्षांच्या साचेबद्धपणा बदलण्यासाठी प्राध्यापकांच्या बदल्या केल्या आहेत. एकाच कॉलेजमध्ये २०-२० वर्षे घालवलेल्या प्राध्यापकांना आता बदलीच्या ठिकाणी जाणे नको आहे. त्यामुळे बदली टाळण्यासाठी अनेक अर्ज येत आहेत. त्यात मुलाला क्रिकेटर बनवायचे आहे, असे कारण एकाने दिले आहे, तर सासू-सासयांची सेवा करायची असेही एक कारण...
  June 23, 10:14 AM
 • भारतीय सैन्यातल्या जवानांना आता अधिक चांगल्या दर्जाचे भोजन, बूट, कपडे आणि अन्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत. संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सेनेच्या तिसया कोअरच्या दौयावेळी जवानांशी संवाद साधला. या वेळी जवानांनी त्यांना मिळणाया पीटी शूज आणि इतर साहित्यासंदर्भात येणाया अडचणी सांगितल्या. त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी, जवानांना यापुढे नामांकित कंपन्यांचे दर्जेदार साहित्य, चांगले भोजन, कपडे आदी सुविधा पुरवण्यात येतील अशी घोषणा केली. यामुळे जवानांना आता अधिक चांगल्या आणि दर्जेदार...
  June 23, 10:10 AM
 • देणगीच्या नावाखाली भारतात दरवर्षी तब्बल १२ हजार कोटी रुपये येतात. मात्र, तरीही टेरर फंडिंगसंदर्भात चौकशी करणाया उच्चस्तरीय समितीपुढे यासंदर्भातील एकही गुन्हा आलेला नाही. त्यामुळे कडक कायदे करूनही आरोपींना शिक्षा करण्याचे सरकारचे प्रयत्न विफल होताना दिसताहेत. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देणगीच्या नावे येणारा पैसा दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वापरला जातो आहे का, याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीला असे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. त्यामुळे...
  June 23, 10:08 AM
 • येथील डॉ. अमिता माहोर यांनी धरणाच्या पाण्याद्वारे जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याच्या विशेष तंत्रज्ञानावरील संशोधन पूर्ण केले आहे. कॅलिफोर्नियामध्ये होणाया हायड्रो व्हिजन 2011 मध्ये डॉ. माहोर या विषयावरील शोधनिबंध सादर करणार आहेत. या विषयावर देशभरातून फक्त तीनच शोधनिबंध निवडण्यात आले आहेत हे उल्लेखनीय. सध्या जगभरात प्रदूषणमुक्त ऊर्जेवर संशोधन चालू आहे. प्रदूषणमुक्त ऊर्जा मिळण्यासाठी जलशक्ती हे सर्वात अचूक माध्यम आहे. धरणांचे एकमेकांवरील अवलंबित्व आणि पाणी सोडण्यासाठी विशिष्ट...
  June 23, 10:05 AM
 • सिमल्यामधील दीनदयाल उपाध्याय रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेपर्वाईचा फटका इथल्या रुग्णांना बसला आहे. या रुग्णालयातील एक्स-रे मशीनचा स्कर्टबोर्ड उंदरांनी कुरतडला आहे. उंदरांच्या या प्रतापामुळे येथे येणाया रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून उंदरांच्या त्रासामुळे इथल्या एक्स-रे मशिन्स बंद आहेत. या संगणकीकृत मशिन्सची उंदरांनी खराबी केल्यामुळे या मशिन्समध्ये आता काही नवीन भाग टाकावे लागणार आहेत. हे भाग जर्मनीहून मागवण्यात...
  June 22, 09:59 AM
 • जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून काँग्रेसला आता करणसिंह यांच्याकडूनच जास्त अपेक्षा आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीत उमर अब्दुल्ला अर्ध्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्र्यांची खुर्ची काँग्रेसकडे सोपवणार की नाही यावरून चर्चा सुरू झाली. मध्येच कुणालाही खुर्ची न देता आपण कार्यकाळ पूर्ण करू, असे सांगून उमर यांनी मुद्दाच निकालात काढला. या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ वाढली. पीडीपी आघाडीच्या वेळी काँग्रेसने प्रामाणिकपणे सत्ता सोडली होती याची आठवण करून देण्यात आली. उमर...
  June 22, 09:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED