जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • गुजरातमध्ये सापुतारा आणि चोटिलादरम्यान देशातली पहिली फनिक्युलर ट्रेन धावणार आहे. गुजरात सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. सापुतारा पर्वतीय पर्यटन स्थळ आहे, तर चोटिला हे तीर्थक्षेत्र आहे. या दोन स्थळांमध्ये उच्च चढ-उतारावर ही ट्रेन चालणार आहे. या योजनेसाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत. गुजरात पर्यटन निगमच्या गुजटोप कंपनीला हा प्रोजेक्ट सोपवण्यात आला आहे. या प्रोजेक्टला पलिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारावर विकसित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुजरातचे पर्यटनमंत्री...
  June 3, 06:00 PM
 • दिल्ली कॅबिनेटमधून जयपाल रेड्डींची खुर्ची याआधी जाता जाता राहिली; पण आता त्यांच्या पदाला पुन्हा एकदा घरघर लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रिपद रेड्डींनी नाकारल्यामुळे पक्षाचा आदेश पाळला नसल्याचे मानले गेले. जयपाल रेड्डींना दिल्ली सोडून आंध्रचे मुख्यमंत्रिपद नको आहे. जयपालांऐवजी आता आंध्रचा कारभार किरण रेड्डींकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, आता जयपाल रेड्डींची दिल्लीतली खुर्ची डगमगत आहे. जयपाल रेड्डी हे तेलंगणा समर्थक मानले जातात. हेच कारण पुढे करून काँग्रेस त्यांना केंद्रातून...
  June 3, 05:49 PM
 • चारा घोटाळ्याला फायलींमधून बाहेर काढणारे यू. एन. विश्वास ममतांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदावर रुजू झाले आहेत. यामुळे दिल्लीपासून बिहारपर्यंतच्या नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बिहारमध्ये लालू यादवांवर अधिकारांचा हक्क बजावल्यामुळे बिहारमधून त्यांना शुभेच्छा देणारे कमी नाहीत. नितीश कुमारांनी ममता बॅनर्जींना याआधीच शुभेच्छा दिल्या; पण विश्वास मात्र थांबले होते. एकदा मंत्रिपद मिळाले की ममतादीदींचे अभिनंदन करायचे त्यांनी पक्के केले असावे. मंत्रिपद...
  June 3, 05:45 PM
 • बाबा ब्रिगेड म्हणजेच राहुल गांधींच्या सेनेचे विश्वासू नेते मिलिंद देवरा यांचे नाव सध्या कृपाशंकर सिंहांच्या पर्यायासाठी घेतले जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा कृपांकडून देवरांकडे सोपवण्याची चर्चा सुरू होताच मिलिंद देवरांच्या नावाला संजय निरूपम यांनी पहिल्यांदा पाठिंबा दर्शवला. बाकीचे काँग्रेस नेते कृपांच्या एकदम विरोधात उभे राहायचे की नाही यावर विचार करत आहेत, तिथे निरूपम यांनी थेट देवरांच्या बाजून वक्तव्य केले आहे.संजय निरूपम यांची यामागील हुशारीही दिसून येते आहे. जर...
  June 3, 05:40 PM
 • तंबाखूच्या पानांमध्ये सापडणाऱ्या प्रोटिन कन्सेन्ट्रेटपासून प्रोटिन पावडर वेगळी करण्याचा प्रयोग गुजरात येथील आणंद कृषी विद्यापीठातील संधोधकांनी यशस्वीपणे पूर्ण केला. या संशोधनाचे प्रमुख ए. डी. पटेल यांनी सांगितले की, या प्रोटिन पावडरमध्ये निकोटिन नसते. तसेच यास तंबाखूसारखा वासही नसतो. या पावडरचा उपयोग बिस्किट आणि बेकरीत तयार होणा:या पदार्थांत करता येऊ शकतो. हा प्रयोग मुख्यत: तंबाखूसंबंधी पर्यायी उत्पादनांना चालना देण्यासाठी होता. या प्रयोगासाठी संशोधकांनी 70 ते 90 दिवस जुन्या...
  June 3, 05:34 PM
 • शाळेची स्वच्छ, सुंदर इमारत, शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच डोळ्यांना दिसणारी झाडा-फुलांची हिरवळ, भिंतींचादेखील कलात्मकतेने वापर करून घेत त्यावर रंगवलेली माहिती आणि मुख्य म्हणजे शाळेची शिस्त पाळणारी मुले, खेळाचे नीटनेटके मैदान या सर्व वर्णनावरून हे एखाद्या खासगी शाळेचे वर्णन असावे, असे वाटते. मात्र सरकारी शाळेविषयीच्या सर्व परंपरागत समजुतींना फाटा देणारी ही आहे नुरपूरबेदी ब्लॉकमधील सस्कौर इथली सरकारी शाळा. शाळेत एकूण १२१ विद्यार्थी आणि सहा शिक्षक आहेत. मात्र शिक्षक कमी असले तरी...
  May 25, 12:38 PM
 • दिवसभराच्या तापलेल्या उन्हानंतर पावसाची एखादी छानशी सर आली तर......अगदी अशीच काहीशी सुखावणारी घटना उदयपूरच्या श्रोत्यांनी अनुभवली.निमित्त होते,अमजद अली खान यांच्या सरोद वादनाचे.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमजद अली खान यांनी कोणताही एकच राग न निवडता वेगवेगया रागांची सुंदर गुंफण करत केलेले सादरीकरण. भक्तिरसाला केंद्रस्थानी ठेवून निवडलेल्या या रागांमुळे श्रोत्यांनी सूर, ताल, लय यांची अनोखी पखरण अनुभवली. उस्ताद अमजद अलींच्या अनोख्या सादरीकरणाबाबत दिव्य मराठी न्यूज नेटवर्कने...
  May 25, 12:35 PM
 • जयपूर - राजस्थानच्या बारावी कॉमर्स परीक्षेत तब्बल बारा वर्षांचा रेकॉर्डब्रेक करत विष्णू जांगिड हा विद्यार्थी पहिला आला आहे. बारा वर्षांत पहिल्यांदाच ६५0 पैकी ६२३ गुण मिळवणारा विष्णू हा यशस्वी विद्यार्थी ठरला आहे. मागील १२ वर्षांमध्ये ५ विद्याथ्र्यांनी ६ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले. विष्णूला कमर्शियल मॅथ्समध्ये १५ पैकी १५ , अकाऊंटंसीमध्ये १४९ आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये १३६ गुण तर हिंदीत १ पैकी ९३ आणि इंग्रजीमध्ये ९५ गुण मिळाले आहेत. एवढे गुण मिळण्यामागे सत्रांक गुणपद्धती...
  May 25, 12:21 PM
 • अमृतसरच्या मोगा गावात सध्या या अंड्याची चांगलीच चर्चा आहे. एक अंडे १२00 रुपयांना, तर मटन आहे ५ रुपये प्रतिकिलो. हे अंडे कोंबडीचे नाही, तर ते आहे इमू पक्ष्याचे. ऑस्ट्रेलियन जातीच्या या पक्ष्याची अंडी भरपूर पौष्टिक असतात. दक्षिण भारतात इमू पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते मात्र उत्तर भारतात इमूची अंडी आणि मटन या गोष्टी अजून नव्या आहेत. त्यामुळे अमृतसरच्या एसपी हरजित सिंह यांनी पाळलेल्या या पक्ष्यांची मोठी चर्चा आहे. नत्थुवाला गरबी या गावात त्यांनी इमूच्या २५ जोड्या पाळल्या आहेत. इमूच्या...
  May 25, 12:17 PM
 • चंदिगड - चंदिगडच्या सरकारी शाळा तसेच कॉलेजांमध्ये आता लेटलतीफ गुरुजी बरोब्बर पकडले जाणार आहेत. उशिरा पोहोचणा:या शिक्षकांची शिक्षण सचिवांकडून चांगलीच हजेरी घेतली जाणार आहे. चंदिगड प्रशासनाने शासकीय शिक्षण संस्थांमध्ये वेळेची सक्ती करण्यासाठी फोटो आणि फिंगरप्रिंट युक्त बायोमॅट्रिक अटेंडंस सिस्टीम लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीत गुरुजींना बोटाच्या ठशांसोबतच १-१२ सेकंद कॅमे:यासमोर उभे राहून हजेरी लावावी लागणार आहे. याचा अहवाल शिक्षण सचिवांच्या कम्प्युटरवर तत्काळ पोहोचेल....
  May 25, 12:12 PM
 • भिलाई - गेल्या सात वर्षांपासून नक्षली कारवायांमधे समावेश असलेल्या गणेशूने अखेर या चळवळीला रामराम केला आहे. नवीन आयुष्य सुरू करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा असल्याचे गणेशूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करताना सांगितले. गरिबी, अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात लढण्याचे आमिष दाखवून नक्षली नेते गरीब आणि गरजू लोकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करतात. मात्र, नंतर नक्षली नेत्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठ्या प्रमाणावर विरोधाभास असल्याचे दिसून येते, अशी माहिती गणेशू...
  May 25, 12:07 PM
 • एकाच छताखाली चार पिढ्यांचा संसार, संपूर्ण कुटुंबात २३ लोक.. सर्वात मोठे कुटुंबप्रमुख ८६ वर्षांचे. सण-उत्सव, सुख-दु:ख सगळं काही वाटून घ्यायचं. एकच चूल. एकच अंगण. बहुतेक कर्ते पुरुष एकाच व्यवसायात. एेकायला नवल वाटेल, पण जशपूरनगरमधील हे कुटुंब कित्येक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहते. देशभरात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहत असताना कुटुंबप्रमुख नेमिचंद जैन यांनी चार पिढ्यांचं कुटुंब जीवापाड जपलंय. त्यांचा चौथा मुलगा सुबोध यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन कुटुंब मूळ राजस्थानच्या...
  May 25, 12:01 PM
 • जेम्स लेन या अमेरिकी लेखकावर टीका करणा:या पुरुषोत्तम खेडेकर या मराठी लेखकाने शिवरायांची बदनामी करणारे आणि ब्राह्मणांवर आक्षेपार्ह असे लिखाण केले. त्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी मराठी लेखकांकडून होत आहे. अमेरिकी लेखक जेम्स लेन यांनी शिवरायांवर लिहिलेल्या पुस्तकावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आक्षेप घेऊन त्या पुस्तकावर राज्य सरकारला बंदी घालावयास लावली होती. त्या पुस्तकात लेन यांनी शिवाजी महाराजांची मानहानी होईल,...
  May 25, 11:55 AM
 • भोपाल - शहरातल्या नबी बाद परिसरात रविवारी एका लग्न समारंभात चांगलाच गोंधळ माजला. इंदूरहून आलेल्या पत्नीने आपल्या पतीचे तिसरे लग्न थांबवले. भोपाळच्याच एका युवतीशी त्याचे लग्न होणार होते. एनवेळी त्याची पहिली पत्नी, तिची आई आणि बहीण मंडपात पोलिसांना घेऊन आली आणि त्याचे लग्न थांबवले. लग्न करू इच्छिणा:या या नवरदेवाला पहिल्या पत्नीपासून एक मुलगीही आहे. या मुलीला पुरावा म्हणून त्याची पहिली पत्नी घेऊन आली होती. भोपाळमध्ये रविवारी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत ३७ जोडप्यांचा सामुदायिक...
  May 25, 11:50 AM
 • रांची - राजधानी येथील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जवानांची शारीरिक चाचणी घेतली असता त्यांचे बिंग फुटले. सरकारने घेतलेल्या या चाचणीत कोणाला धाप लागली, तर कोणी लडखडत होता, कोणी म्हणत होता नेहमी साहेबांच्या मागे राहावे लागते मग पळायला वेळ कोठे मिळतो. काही अंगरक्षकांनी अतिशय सहजतेने निर्धारित केलेली सीमारेषा गाठली, पण बाकी सर्व अंगरक्षक घामाघूम झाले. त्यांनी कशीबशी सीमारेषा पार केली आणि जमिनीवर लोळण घेतली. या जवानांपैकी 20 टक्के येथेच नापास ठरले. ज्या...
  May 25, 11:46 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात