जाहिरात
जाहिरात
Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांच्या पलीकडे महिलांसाठी सुरक्षित व दर्जेदार कुटुंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता होण्याची गरज आहे. पुरुषांची साधने, पुरुषांच्या शस्त्रक्रिया आणि पुरुषांची यातील भूमिका याबाबतची जबाबदारी पुरुषांनी स्वीकारणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांची समता आणि समान न्याय याची चर्चा होते. हा दिवस साजरा करणाऱ्या प्रत्येक महिलेला वाटते, आता तरी महिलांना समान दर्जा मिळाला आहे, पुरुष बरोबरीची वागणूूक देतात. आतापर्यंत महिलांचे...
  March 6, 05:05 AM
 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतल्याने तमाम महाराष्ट्राच्याच भुवया उंचावल्या. हे दोन ध्रुव एका व्यासपीठावर आले कसे, असा प्रश्नही अनेकांना पडला. मात्र बेकीतही एकी ही मराठी माणसाची परंपरा यातून दिसून अाली. अशाच आणखी दोन ध्रुवांना एकत्र आणण्याचा योग दिव्य मराठीने होळीनिमित्त खास आपल्या वाचकांसाठी आणला आहे.... या उपक्रमाचे नाव आहे प्रतिशोध मराठी मनाचा..... या (न झालेल्या) विशेष मुलाखतीचे वार्तांकन खास अामच्या वाचकांसाठी... स्थळ : लोणावळ्याचे फार्म हाऊस...
  March 2, 03:14 AM
 • मराठी भाषेबद्दल वेळाेवेळी अगदी संतपरंपरेपासून ते अाताच्या साहित्यिकांनीही भाष्य केले अाहे. अाजच्या मराठी दिनानिमित्त त्यातीलच काही निवडक साहित्यिकांचे मराठी भाषेविषयीचे हे विचार... पुढील स्लाइडवर पाहा, साहित्यिकांनीही केलेले भाष्य ...
  February 27, 08:41 AM
 • मुळातच अभिजात म्हणजे काय? मग त्यापुढे जाऊ न मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळणे म्हणजे काय? ताे मिळाल्यावर भाषेत काही फरक पडणार अाहे का? हा दर्जा काेण देणार? हा दर्जा ठरविण्याचे निकष काय? असे अनेक प्रश्न अभिजात मराठीच्या संदर्भात निर्माण हाेतात. खरंच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्याची गरज अाहे का? इथपासून ते ती अभिजात झालीच तर काय हाेईल अाणि मराठी भाषा दिन साजरा करण्याची गरज पडेल की नाही इथपर्यंत मग हा अभिजाततेचा विषय जाताे. अाजच्या मराठी दिनानिमित्त दाेन भाषातज्ज्ञांचे या विषयावर...
  February 27, 08:39 AM
 • अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची खंत, इंग्रजी शाळांत पहिल्या वर्गापासूनच मराठी भाषा सक्तीची करण्याचा अाग्रह मराठी दैनिकांचा खप वाढत आहे. मराठी टीव्ही मालिका मोठ्या प्रमाणात बघितल्या जात आहेत. पुस्तकांचे वाचकही वाढत आहे. तथापि, ज्यांच्या खांद्यावर मराठी संवर्धनाची जबाबदारी आहे, अशा १० ते २५ वर्ष वयोगटातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची मराठी अत्यंत चिंताजनक असून त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे अाहे, अशा शब्दांत अखिल भारतीय...
  February 27, 08:36 AM
 • भाषा प्रवाही आणि संवादी ठेवण्यात बोली भाषांचा वाटा महत्त्वाचा आहे. तेव्हा लिखित प्रमाण भाषेचे मापदंड प्रमाण भाषेच्या व्याख्येतून आपण बाद करू शकत नाही. आज मराठीतीलही अनेक प्रादेशिक घटकांना मराठी ऐवजी इंग्रजी जवळची व सोपी वाटते ती याचमुळे. १९७३ च्या सुमारास पुना कॉलेज या मुस्लिमबहुल शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करीत असताना माझ्या लक्षात आले की, आपली केशवसुतांची आणि बालकवींची प्रमाणभूत मराठी भाषा आणि गावखेड्यातून आलेल्या त्या विद्यार्थ्यांची मराठी भाषा यात खूप फरक होता. भाषा ही...
  February 27, 08:36 AM
 • वऱ्हाड, मराठवाडा, खान्देश, कोकणातील बोलींचे कोश चार वर्षांपासून साहित्य,संस्कृती मंडळाकडे धूळखात;लाखो शब्द, हजारो वाक्प्रचार आणि म्हणींचे कोश तयार असूनही अभ्यासकांपासून दूर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांनी परिसरातील बोलींचे कोश निर्माण करून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडे सादर केल्यानंतरही गेल्या चार वर्षांपासून ते सांस्कृतिक खात्याच्या लालफितीत खितपत पडले आहेत. बोलीकोशांचे संशोधक आणि संबंधित विद्यापीठांच्या प्रकल्प प्रमुखांनी...
  February 27, 08:31 AM
 • भारतात चाैथ्या तर जगभरात पंधराव्या क्रमांकावर असलेली मराठी भाषा अाता समाज माध्यमांच्या माध्यमातून ग्लाेकल हाेऊ लागली अाहे.ग्लाेबल तंत्र अाणि लाेकल भाषा यातून एक नवीनच ग्लाेकल मराठी रुजत अाहे. त्यामुळेच तिच्या वापराच्या कक्षा रुंदावत चालल्या अाहेत. या वाटचालीत समाज माध्यमांवरही ती प्रमाणभाषाच असावी असा अाग्रह अाता मागे पडून तुम्हाला जशी येते तशी मराठी अशा अाविर्भावात तिचा वापर हाेताे अाहे. हा वापर किती याेग्य, किती अयाेग्य, त्याचा उपयाेग अाणि परिणाम यावरचा हा प्रकाशझाेत... मराठी...
  February 27, 08:28 AM
 • एरवी प्रमाण भाषा बोलणारे लोक सोशल मीडियावर आल्यावर ड्यूडवाली भाषा बोलायला लागले नाहीत. सोशल मीडियाशिवाय एरवीही त्यांची व्यक्त होण्याची भाषा प्रमाण मराठी ही नव्हतीच.म्हणूनच सोशल मीडियावरील ड्युडवाली भाषा त्यांना सोयीची आणि सुलभ वाटली. स माजमाध्यम हा शब्दच खरं तर सोशल मीडियावर कुणीही वापरत नाही. मराठी भाषेचे टोकदार अभिमानी लोक सोडले तर बहुतेक लोक सोशल मीडिया हाच शब्द वापरतात. सोशल मीडिया आणि मराठी भाषा या विषयाची सुरुवातच इथून होते असे मला वाटते. इथे हट्टाने मराठी टायपिंग करणारे...
  February 27, 08:26 AM
 • प्रमाणभाषेच्या अद्ययावतीकरणाचे आणि प्रसाराचे प्रयत्न म्हणजे बोली भाषांचा अपमान आणि अव्हेर नव्हे, हे आपण कधी समजून घेणार आहोत? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, की मग हे सगळे प्रश्न आपोआप विरून जाणार आहेत आणि अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी आपोआप जगावर राज्य करणार आहे, असा तर आपला गोड गैरसमज नाही ना? फेसबुक - व्हॉट्सॅप - ब्लॉग आणि मराठी संकेतस्थळं अशा समस्त ठिकाणी देवनागरी अक्षरांचा कल्लोळ उसळलेला पाहून मायबोली मऱ्हाठीचं सगळं काही सुरळीत-यथास्थित चाललेलं असणार असं कुणालाही वाटेल....
  February 27, 08:11 AM
 • समाज माध्यमात मराठीचा वापर करताना मला येणारी एकमेव अडचण म्हणजे मराठीत मी शॉर्ट फॉर्म वापरू शकत नाही कारण ते अद्याप रुजलेले नाहीत. उदाहणार्थ इंग्रजीत Thx किंवा Ths हे रुजले आहे, परंतु मराठीत आभार यासाठी आ हे अद्याक्षर रुजलेले नाही. त्यामुळे समाज माध्यमावर इंग्रजी वापरणाऱ्यांपेक्षा मला टाईप करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो एवढेच. प्रत्येक प्रदेशानुसार कोकणी, वैदर्भीय, कोल्हापूरी अशी मराठी भाषेची धाटणी ठरलेली असते. त्याप्रमाणेच समाज माध्यमांमधील मराठीचीही वेगळी धाटणी ठरत आहे. कोकणी,...
  February 27, 08:08 AM
 • केवळ बॉलीवूडच नव्हे तर तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटसृष्टीची आपल्या अभिनयाने सुमारे ५० वर्षे सेवा करणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी मध्यरात्री हृदयक्रिया बंद पडून अबुधाबी येथे निधन झाले. बॉलीवूडची पहिली सुपरस्टार म्हणून खिताब मिळवणाऱ्या श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूत झाला. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने चित्रपटात काम करणे सुरू केले. १९६७ च्या कंदनकरुनईमध्ये त्यांनी प्रथमच चेहऱ्याला रंग लावला, जो शनिवारी रात्री दुबईत एका लग्नात उपस्थित...
  February 26, 02:49 AM
 • सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या दौऱ्यात खलिस्तानच्या समर्थनावरून वाद निर्माण झाले. विशेषत: पंजाबमध्ये हा मुद्दा खूप गाजला. ट्रुडो यांनी पंजाब दौऱ्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भास्करचे प्रतिनिधी प्रमोद कौशल यांनी नवी दिल्ली येथे कॅनेडियन प्रसारमाध्यमांतून पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना काही प्रश्न विचारले. तुम्हाला खलिस्तानी विचारसरणीचे समर्थक म्हटले जाते. यावर आपले म्हणणे काय? खलिस्तानची...
  February 26, 02:04 AM
 • बडोदा येथे पार पडलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्याम मनोहर यांच्या सत्कारानिमित्त त्यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. त्याचा हा गोषवारा... - गणित, नैसर्गिक विज्ञाने, समाजशास्त्रे, इतिहास, शेती, पर्यावरण विज्ञान, अध्यात्म ही ज्ञानक्षेत्रे आहेत. सर्व कला, साहित्य, कथा, कादंबरी, कविता ही ज्ञानक्षेत्रे आहेत. - गणिताचे तत्त्व काय असतं? इतिहासाचे तत्त्व काय असते? अध्यात्माचे तत्त्व काय असते? अशा तत्त्वांची चर्चा आपल्या समाजात आहे काय? - गणिती इतिहासकार, शास्त्रज्ञ, कलावंत,...
  February 23, 02:00 AM
 • संस्थांची उभारणी केली जाते पण शासकीय अनुदानावर अवलंबून असतात. त्यातूनच पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असते . मराठीच्या अभिजाततेचा प्रश्न आता मानबिंदूचा प्रश्न झाल्याचं प्रतिपादन माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले. ९१व्या साहित्य संमेलनात सुधीर रसाळ आणि दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सारांश... दीक्षित : स्वातंत्र्याची जी पहाट अनुभवली ते वातावरण आजच्या पिढीला जाणून घ्यायला आवडेल? चपळगावकर : मला वाङमयाची जी आवड निर्माण...
  February 23, 02:00 AM
 • पर्यावरण व्यवस्थेचा आदिवासी जीवन पध्दतीवर काय परिणाम होतो, याविषयी बेलाेरा (जि. अमरावती) येथील सुभाष पाळेकर प्रकल्प अभ्यास करीत हाेते. जंगलातील झाडे, वेलींना कोणतेही खतपाणी, औषधफवारणी नसते तरी आंबा, काजू, बोर, जांभूळ, चिंच अगणित फळे कसे देतात? अगदी दुष्काळात देखील फळे येतात. याचे इंगित सुभाष पाळेकरांना या अभ्यासात अाढळले. कृषिपदवीनंतर घरची शेती रासायनिक पध्दतीने करू लागले. पहिली १३ वर्षे चांगले उत्पादन मिळाले. मात्र नंतर शेतीत उत्पादन मिळेना. त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला अाणि...
  February 21, 03:01 AM
 • छत्रपती शिवरायांनी अवघे जीवन हे स्वराज्य स्थापनेसाठी अर्पण केले. त्यांचा केवळ उल्लेख झाला तरी एक वेगळे चैतन्य, उत्साह आणि शिरशिरी निर्माण होते. शिवरायांची जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या या राजाबद्दल मराठी बांधवांना जवळपास सर्वच माहिती आहे. पण शिवरायांची एक वेगळी ओळख एका विचारवंतांनी सांगून ठेवली आहे. हे विचारवंत म्हणजे दिवंगत डावे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकामध्ये...
  February 19, 04:00 PM
 • तामिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या महेश यांचे वडील लष्करात कर्नल होते. महेश यांचा स्वभाव सुरुवातीपासूनच चंचल होता. अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी गेले खरे; परंतु शिक्षण अर्ध्यावर सोडत विपणन क्षेत्रात आले. विशेष म्हणजे ते अभिमानाने कॉलेज ड्राॅपआऊट असल्याचे सांगतात. महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला तेव्हा त्यांना घरातून हाकलून देण्यात आले होते. शिष्यवृत्तीच्या पैशावर ते सिकंदराबादच्या हॉटेलमध्ये राहत होते. रोज रात्रीचे ५० रुपये भाडे...
  February 17, 08:04 AM
 • चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम यांच्या यू-ट्यूबला १४ फेब्रुवारीला १३ वर्षे पूर्ण होतील. त्यांना आधी एक व्हिडिओ डेटिंग साइट तयार करायची होती. पहिला व्हिडिओ २००५ मध्ये, ४ कोटींनी पाहिला यू-ट्यूबवर पहिला व्हिडिओ २३ एप्रिल २००५ ला अपलोड झाला. मी अॅट द झू नावाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ४ कोटी ५६ लाखावर लोकांनी पाहिला आहे. त्यात हत्तीचे चित्रीकरण आहे. त्यात यू-ट्यूबचे जावेद करीम दिसतात. यू-ट्यूबच्या व्हिडिओत ५ टक्के व्हिडिओ असे आहेत, ज्यांतून वेबसाइटला ९५ टक्के व्ह्यू येतात. यू-ट्यूबवर...
  February 11, 05:04 AM
 • मराठी बालरंगभूमीची चळवळ स्थापन करणाऱ्या अाणि प्रत्यक्षात या रंगभूमीसाठी अविरत झटणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे साेमवारी पहाटे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. अभिनेता, दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या त्या सख्ख्या मावशी होत्या. बालरंगभूमीसाठी थेट अमेरिकेत जाऊन अभ्यास करणाऱ्या सुधाताईंना नाटकाचे बाळकडू घरातूनच मिळाले हाेते. वडील तात्या अामाेणकर हे गिरगावातील साहित्य संघाशी निगडित हाेते. वयाच्या १८ व्या वर्षीच त्या भरतनाट्यममध्ये परंगत झाल्या. त्यानंतर मो. ग....
  February 6, 06:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात