Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • प्रसिद्ध मराठी कवी व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही.. या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी देशमुखांच्या काव्यलेखनाबाबत दिव्य मराठीच्या वाचकांसाठी व्यक्त केलेले मत त्यांच्याच शब्दात... बोलावे ते आम्ही या श्रीकांत देशमुख यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकली आणि आभाळमाती कवेत घेणारा आनंद...
  December 22, 02:00 AM
 • आंदोलनामुळे गुजरातमध्ये भाजपचा उदय झाला. मंडल कमिशननंतरच राज्यात पक्षाने पाय रोवले. राम मंदिर आंदोलनानंतर राज्यात जनाधार वाढला अन् १९९५ मध्ये पहिल्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर विजयी घोडदौड कायम आहे. ८० च्या दशकात खाम वादामुळे काँग्रेसने सत्ता गमावली. या वेळी पुन्हा जातीय आधारावर निवडणूक झाली. यात भाजपचे नुकसान झाले. पुढील स्लाइडवर पाहा, आंदोलनाचा इतिहास...
  December 19, 07:31 AM
 • दिव्य मराठी- गुजरात विधानसभा निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीची ठरली होती. भाजपने गुजरातेत 22 वर्षांत सर्वात कमी जागा जिंकूनही आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. या निकालाच्या महात्वाच्या बाबी म्हणजे प्रचारा दरम्यान सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी. कॉग्रेसनेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर टीका करतांना नीच शब्दाचा वापर केला. नरेंद्र मोदींनी याच नीच शब्दाचे भांडवल करत प्रचाराची दिशाच बदलून टाकली. ज्या मतदार संघामध्ये या मुद्द्यावर प्रचार केला गेला तेथील 16 पैकी 14 जागा या...
  December 19, 07:05 AM
 • भाजप दिल्लीतून... ;सुरुवातीच्या कलांच्या आधारावर जल्लोष करण्यावर होती बंदी,कार्यकर्त्यांमध्ये उ. प्र. सारखा उत्साह नव्हता बिहार निवडणुकीत मतमोजणीत कल पक्षासाठी धोकादायक ठरले होते. त्यामुळे भाजप सतर्क होता. २-३ तास प्रवक्तेच समोर येत होते. रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर व गजेंद्रसिंह शेखावत हे चार केंद्रीय मंत्री निर्णायक आघाडी मिळाल्यानंतरच माध्यमांसमोर आले. सकाळी ८.३० : गुजरातमध्ये मिळालेल्या कडव्या आव्हानामुळे कोणीही घाईत आनंद साजरा करणार नाही याकडे लक्ष...
  December 19, 04:07 AM
 • गुजरात निवडणुकीवर दिव्य मराठीचे कल्पेश याग्निक यांनी केलेले सखोल विश्लेषण. गुजरात मध्ये हे काय घडले?: गुजरातने गजबच केले. गुजराती गौरवाला विजयी केले, पण गौरवाला अहंकारात परिवर्तित होण्यापासून रोखले. सर्वात मोठा घटक कोणता राहिला?: अर्थात, मोदी फॅक्टर. संपूर्ण भाजप, संपूर्ण काँग्रेस एवढेच काय, सर्वच घटक त्यापेक्षा प्रभावहीन राहिले. सर्वात आश्चर्यकारक बाब कोणती राहिली?: ग्रामीण आणि शहरी मतदारांनी दिलेला अगदी वेगवेगळा कौल. शहरी मतदारांनी मोदींच्या हूं छू विकास वर विश्वास ठेवला....
  December 19, 03:42 AM
 • शौर्य आणि धाडस दाखवत इतरांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी टाइम मासिकाने सादर केली आहे. यापैकी पाच कहाण्या येथे दिल्या आहेत... गोळीबारात जोनाथनने वाचवले २० जणांचे जीव ला स वेगासच्या कंट्री म्युझिक फेस्टिव्हलमध्ये १ ऑक्टोबर रोजी गोळीबार सुरू झाला तेव्हा लोक आपला जीव वाचवण्यासाठी वाट मिळेल तिकडे धावत सुटले होते. मात्र, ३० वर्षीय जोनाथन स्मिथ यांनी याच्या उलट केले. गोळीबार सुरू होताच ते घटनास्थळाकडे धावले. त्यांनी २० जणांचे जीव वाचवले. यापैकी काही जण भीतीने जागीच स्तंभित...
  December 17, 04:26 AM
 • मूर्तिविज्ञान, प्राचीन भारतीय इतिहास, मंदिर स्थापत्य आणि पुरातत्त्व अशा वेगळ्या वाटेवरच्या विषयांतील तज्ज्ञता असणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांना चतुरंग प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार आज पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाड्याचे सुपुत्र असणाऱ्या देगलूरकर सरांनी ८४ वर्षे पार केली आहेत. अध्ययन, अध्यापन, संशोधन, उत्खनन, लेखन, व्याख्याने...अशा अनेक माध्यमांतून सरांची ज्ञानसाधना व अध्यापन सुरू आहे. अनेक सन्मानपदे त्यांनी भूषवली आहेत. उपरोक्त सर्व...
  December 17, 03:29 AM
 • चांगली कलाकृती ही नेहमीच समीक्षकांपुढे आव्हान निर्माण करत असते. प्रतिभावंत हा एक कोडं बनून समोर उभा राहतो आणि ते सोडवताना आपल्याला बौद्धिक कष्ट करावे लागतात. बब्रुवान रुद्रकंठावार उपाख्य धनंजय चिंचाेलीकर हा सध्याच्या मराठी साहित्यातील असाच एक लेखक आहे. त्याच्या कलाकृतींनी भल्याभल्यांना गेल्या २० वर्षांत गोंधळात टाकले आहे. याला ग्रामीण म्हणावे का? याला विनोदी म्हणावे का? ही शैली कोणती आहे? ही भाषा नेमकी कोणती म्हणायची? हिंदीत दुष्यंतकुमार या कवीच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. ही...
  December 17, 03:19 AM
 • चार वेळा फिफा वर्ल्ड प्लेअर अवाॅर्ड जिंकून जागतिक रेकॉर्ड बनवणारे अर्जेंटिनाचे फुटबॉल खेळाडू लियोनेल मेसी नुकतेच जगातील सर्वात महागडे खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. कारण बार्सिलोनाने त्यांना पुन्हा खरेदी केलेले आहे. भारतीय चलनात ही रक्कम ५३०० कोटी अाहे. त्याच्या रोजच्या कमाईचा हिशेब जर केला तर ही रक्कम १५ कोटी इतकी होते. शिवाय त्याला ७० लाख डॉलर सायनिंग बोनस मिळेल तो वेगळाच. जर बोनस पूर्ण अदा केला गेला तर जगात सर्वात जास्त कमाई घेणारे खेळाडू म्हणून त्यांचा लौकिक होईल. मेसीने...
  December 17, 02:44 AM
 • सान्योने नुकताच भारतात आपला पहिला ४ के स्मार्ट टीव्ही उपलब्ध केला आहे. सध्या २ मॉडेल उपलब्ध झाले आहेत. ४९ आणि ५५ इंची मॉडेल्स असून भारतीय बाजारासाठी याची निर्मिती केली आहे, असा कंपनीचा दावा आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. ऑडिआे आणि व्हिडिआे दर्जावर अधिक लक्ष दिले आहे. कमी किमतीत अधिकाधिक दर्जेदार देण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी कॅमेरा उत्पादक कंपनी कोडॅकने ४ के स्मार्ट टीव्ही सादर केला होता.
  December 16, 07:45 AM
 • रॅनबॅक्सीचे संस्थापक भाई मोहनसिंह यांचे सर्वात लहान पुत्र अनलजित, १९८१ मध्ये बोस्टनहून एमबीए करून आले तेव्हा त्यांचे सर्वात मोठे भाऊ डॉ. परविंदर यांनी रॅनबॅक्सीचे काम चांगले सांभाळले होते. वडिलांचाही विश्वास असल्याने अनलजित यांना मॅक्स इंडियाचे काम सोपवण्यात आले. कारखाना ओखलात होता आणि तेथे तयार होणारे पेनिसिलिन रॅनबॅक्सीला जात होते. १९९० मध्ये मोहन सिंह यांनी तिन्ही भावांचे व्यवसाय वेगळे केले तेव्हा रॅनबॅक्सी हा मोठा भाग परविंदर यांना मिळाला. अनलजित यांच्याकडे मॅक्सचे काम आले....
  December 16, 07:39 AM
 • मालविंदर यांनी पदवीनंतर अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये नोकरी केली. पण तोपर्यंत मालविंदर यांचे वडील आणि रॅनबॅक्सीचे प्रमुख डॉ. परविंदर यांचा मालविंदर यांच्या आजोबांशी वाद सुरू होता. डॉ. परविंदर यांना कर्करोग झाला होता. मालविंदर आणि त्यांचे भाऊ, आई यांनी वडिलांना जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांत नेले होते. त्यामुळेच देशभर हॉस्पिटल चेन स्थापित करावी, असे दोन्ही भावांना वाटले. मालविंदर यांचे वडील डॉ. परविंदर यांचा आणि त्यांचे वडील व भाऊ यांचा रॅनबॅक्सीचे शेअर आणि एका बंगल्यावरून वाद होता....
  December 16, 07:27 AM
 • माझा मराठीचा बोलु कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। संत ज्ञानेश्वरांच्या ओवीशी एकनिष्ठ असणारे प्राध्यापक मधू जामकर यांच्याच सक्रियतेमुळे परळीत ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी ठरले. सरांचे त्यांच्या जीवनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिष्टचिंतन करणे हे परळीकरांचे कर्तव्य ठरते, म्हणूनच येथील सर्वपक्षीय, सर्वस्तरीय समाजधुरीणांकडून त्यांचा गौरव सोहळा साजरा करण्यात अाला. आमच्या युवक गणेश मंडळाच्या वतीने डॉ. जीवनराव देशपांडे स्मृती...
  December 12, 07:48 AM
 • मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष हा मराठवाड्याचाच हाेणार यावर अखेर शिक्कामाेर्तब झाले. मराठवाड्यातील काही धुरीणांनी संमेलन विदर्भातून थेट बडाेद्यापर्यंत नेण्यात जसे यश मिळविले तसेच मराठवाड्यातूनच संमेलनाध्यक्ष बसविण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. नूतन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे उस्मानाबादचे. त्यांचे कार्यकर्तृत्व जरी पश्चिम महाराष्ट्रातील असले व स्थायिक जरी पुण्यात असले तरी संमेलनाध्यक्ष हाेण्यासाठी ते मूळ मराठवाडेकर असणे हे पुरेसं ठरलं. खरंतर ही निवडणूक बिनविराेध...
  December 11, 02:00 AM
 • चित्रपटातील तारे-तारका सामान्य माणसापेक्षा वेगळे असतात. ते आकर्षक असतात, महाग पोशाख करतात, मोठ्या घरांमध्ये राहतात. मात्र अनेक बाबतीत ते सामान्य माणसासारखे आहेत. वर्ष १९९७ मध्ये अॅश्ले जूडची चित्रपट कारकीर्द सुरू होतच होती. त्या वेळी तिची प्रथमच हार्वे वाइन्सटीनशी भेट झाली. मोठ्या मुश्किलीने त्याच्या तावडीतून ती बचावली. बाहेर पडून तिने त्याच्या दुर्वतनाची वाच्यता केली. हॉलीवूडमध्ये अनेकांना याविषयी माहिती असल्याचे तेव्हा कळले. मात्र त्याला लगाम घालण्याचा कोणताही मार्ग नव्हता....
  December 10, 02:00 AM
 • मोली बॉल- उजाडण्यापूर्वीच अनेक लोकांना आपला फोन पाहण्याची घाई असते. जगातील काही व्यक्ती थोड्याशा भयाने तर काही आशेने आपला फोन तपासतात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एकाने ट्विट केले आहे वा नाही, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. ते ट्विटरच्या माध्यमातूनच सांगतात की टीव्हीवर काय पाहत आहेत. कोणत्या बाबीविषयी संताप आहे. सामान्य माणसाला विचार करण्यासाठी नवा मुद्दा देतात. ट्विटरच्या माध्यमातून ते माध्यम कंपन्यांना परवाना रद्द करण्याची धमकी देतात. त्यांच्या संतप्त ट्विटच्या...
  December 10, 02:00 AM
 • कार्ल विक आणि चार्ली कॅम्पबेल - वर्ष २०१७ मध्ये शी जिनपिंग यांनी जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशावर आपली सत्ता आणि पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. पक्षात त्यांचे स्थान माआे त्से तुंग आणि डेंग शियाआेपिंग यांच्या बरोबरीने मान्य करण्यात आले. त्यांनी घोषणा केली की, चीनला आता जगाचे नेतृत्व करायचे आहे. १८ ऑक्टोबर रोजी त्यांनी ही घोषणा केली तेव्हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष वारंवार संकेत देत होते की,अमेरिका जगाच्या नेतृत्वाची आपली इच्छा सोडणार आहे. चीनच्या नव्या महत्त्वाकांक्षेची घोषणा...
  December 10, 02:00 AM
 • नॉर्मन पर्लस्टीन- २०१७ मध्ये उत्तर कोरियाच्या वास्तवाविषयी जग अनभिज्ञ असल्याचे सिद्ध झाले. येथील तरुण हुकूमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेवर अणुहल्ल्याची क्षमता अर्जित केली आहे. या वर्षी ४ जुलै रोजी किम यांनी पहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. सप्टेंबरमध्ये अण्वस्त्र चाचणी घेतेली. नंतर २९ नोव्हेंबरच्या सकाळी क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. ते वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्कपर्यंत पोहोचू शकते. उत्तर कोरिया संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. मात्र किम आणि त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रसाठा...
  December 10, 02:00 AM
 • काश्मीरमध्ये अशांतता दिसत असली तरी, तेथील कला, परंपरा आजही टिकून आहेत. कपड्यांवर केलेली कलाकुसर एक अद्भुत नमुना आहे. काश्मीरमध्ये सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच डिझायनर जोडी उस्मान वताली आणि साजिदा नैन यांनी पारंपरिक डिझाइन केलेल्या कपड्यांची एक साखळी सादर केली आहे. जी भारतातील वस्त्रनिर्माणात अद्भुत व समृद्ध कलाकुसरीचा नमुना दिसून येतो. या जोडीने देशभरातील शिल्पकारांचा सहभाग घेतला आहे, ज्यात एप्लिक, एम्ब्रॉयडरी, कलर ब्लॉकिंग, लेअरिंगचे कार्य करते. हा गट हंगामाला...
  December 10, 02:00 AM
 • जेव्हा मी ७ वर्षांची होते तेव्हा वडिलांच्या दागिन्याच्या व्यवसायाचे दिवाळे निघाले. तेव्हा मला दिवाळखोरी शब्दाचा अर्थही माहीत नव्हता. मला एका कौटुंबिक मित्राकडे राहण्यास पाठवून दिले होते. सर्व सुरळीत होईल, असे मला सांगण्यात आले. पण जेव्हा मी परतले तेव्हा सर्व काही बदलले होते. आधी मी शाळेत कारने जात होते, पण आता कार नव्हती. घरातील एअर कंडिशन्ड काढले होते. रंगीत टीव्हीऐवजी ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आला होता. आधी आवडीचे पदार्थ जेवणात मिळत असत; पण आता पोट भरावे असे जेवण मिळत होते. कुटुंबाचे जीवन...
  December 10, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED