Home >> Divya Marathi Special

Divya Marathi Special

 • राजकारण धूर्त लोकांचे आश्रयस्थानच... इंग्रजी साहित्यातील महर्षी शेक्सपिअरचे हे मत अाहे. माझे राजकीय भाष्य आपल्यार्पंत पोहोचावे अशी देशातील सर्वात मोठे व प्रतिष्ठित वृत्तपत्र दैनिक भास्कर/ दिव्य मराठीची इच्छा आहे. माझ्या टिप्पणीपूर्वी मला माझ्या ज्या बालमित्राचे ज्ञान ऐकून घ्यावे लागते ते म्हणजे हाजी पंडित! आश्चर्य वाटू देऊ नका, कारण हे राजकीय तज्ज्ञ नाहीत, फक्त अलिप्त व तटस्थ भावनेने राजकीय मत मांडतात.म्हणूनच बिचारे लहानपणीच्या माझ्या इतर राजकीय मित्रांसारखे ते धोकेबाज आणि...
  04:22 AM
 • दिव्य मराठी- मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजावर देशातील सर्वात मोठ्या सर्व्हेचा निकाल आला आहे. भास्कर/दिव्य मराठीच्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचे समोर आले आहे. मात्र, वाढती महागाई आणि नोकऱ्यांतील घट सामान्य माणसाच्या नाराजीचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. सर्व्हेत भाग घेणाऱ्या ७०% लोकांनुसार मोदी अजूनही लोकप्रिय आहेत. त्यापैकी ४७% नुसार तर ते सध्या २०१४ पेक्षाही जास्त लोकप्रिय आहेत. महागाई आणि नोकऱ्यांतील घट यांना ५४% लोकांनी सरकारचे सर्वात मोठे अपयश...
  May 18, 02:20 AM
 • दिव्य मराठी- सर्व्हे जसा देशाचा मूड दाखवतो, तसाच तो या वर्षी विधानसभा निवडणूक होणाऱ्या तीन राज्यांसाठीही महत्त्वाचा ठरतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांत भाजपची सरकारे आहेत. सर्व्हेत जो कल समोर आला आहे त्यातून स्थानिक मुद्द्यांवर लोकांचे मतही समजू शकते. उदाहरणार्थ, सरकारी आकड्यांनुसार, ज्या मध्य प्रदेश आणि राजस्थानात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना समोर येतात, तेथे ८२% लोकांनी १२ वर्षांखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींना फाशीसारखा कठोर निर्णय हे चांगले पाऊल...
  May 18, 02:06 AM
 • पुणे - इतिहासात अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा, असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर. या किल्ल्याला वज्रगड म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावरच झाला होता. या किल्ल्यावर काही दिवस पेशव्यांची राजधानीही होती. संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या किल्ल्याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर पुरंदरचा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने मोठा आणि मजबूत असून...
  May 14, 11:05 AM
 • छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. विविध मोहिमा आखणे, राज्यकारभाराची घडी बसवणे या प्रकारची कामे सुरू होती. सईबाईंच्या निधनानंतर जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराज लहानाचे मोठे होत होते. त्यामुळे वडील शिवाजी महाराजांना पाहतच शंभुराजे मोठे झाले. त्यामुळे त्या दोघांमध्ये अनेक प्रकारची साम्य होती. त्याचप्रमाणे दोघांमध्ये काही फरकही होते. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज...
  May 14, 10:56 AM
 • स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा अगदी नेटाने पुढे चालवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे ते राज्य पुढे नेताना संभाजी महाराजांनीही सर्वस्व अर्पण करून स्वराज्याचा अश्व पुढे पुढे नेला. सुमारे 120 हून अधिक लढायांमध्ये भगवा ध्वज सतत उंचावत ठेवण्याचा भीम पराक्रम शंभूराजांनी गाजवला. दुसरीकडे त्यापूर्वीच बुधभूषण सारखा संस्कृतग्रंथ आणि इतर ग्रंथ लिहून त्यांनी बुद्धीकौशल्याचे दर्शन सर्वांनाच घडवले होते. १४ भाषांवर...
  May 14, 10:43 AM
 • संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 1681 मध्ये झाला. त्यानंतर संभाजी महाराजा राज्याचा कारभार पूर्णपणे चालवू लागले. राज्य चालवण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे असते ते चलन. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी तयार केलेले शिवराई हे चलन पुढे सुरू ठेवले. पण त्याचबरोबर संभाजी राजांनी स्वतःचीदेखिल काही नाणी पाडून घेतली. पण आधीचे चलन सुरू ठेवले त्यात छोटा कार्यकाळ यामुळे संभाजी महाराजांचे हे चलन अत्यंत दुर्मिळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चलन म्हणजे शिवराई ही सोने, चांदी, रुप्य आणि ताम्र अशा...
  May 14, 10:41 AM
 • दे शातील सर्वात बडी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, जगातील तिसरी मोठी ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टला विकली जाणार आहे. मात्र या करारापूर्वी त्यांना त्यांच्यापेक्षा छोट्या कंपन्यांना स्वत:मध्ये सामावून घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आतापर्यंत त्यांनी १३ ब्रँड्सचे अधिग्रहण केले आहे. त्यातील बहुतांश शेअर्स आपल्या नावे केले आहेत. कंपन्यांच्या अधिग्रहणाची ही मालिका त्यांच्या स्थापनेच्या तीन वर्षांनंतर म्हणजे २०१० मध्ये सुरू झाली होती. इतकेच नव्हे तर तीन बड्या कंपन्यांना तर फ्लिपकार्टने अॅमेझॉन...
  May 13, 04:11 AM
 • स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मूलन, संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जाेतिबा फुले यांना११ मे १८८८ राेजी मुंबईकरांनी महात्मा ही उपाधी बहाल केली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी उपाधी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. अाज (दि. ११ ) या घटनेला १३० वर्षे पूर्ण हाेत अाहे. यानिमित्ताने महात्मा या उपाधीची पार्श्वभूमी, जाेतिबांचे अंगभूत गुण...
  May 11, 06:15 AM
 • महाराष्ट्रात १९९४ मध्येच ओबीसी समूहाला तामिळनाडूच्या दीड पट आरक्षण दिलेे. त्याला वैधानिक किंवा घटनात्मक आयोगाची मान्यता घेतलेली नाही. या वाढीव आरक्षणातच मराठा समाजाचे आरक्षण सामावलेले आहे. आरक्षणातील ५० टक्क्यांची एकूण मर्यादा वाढविण्यास मराठा समाजाचा विरोध नाहीच. पण जेंव्हा राज्य घटनेत दुरुस्ती करून ही मर्यादा वाढविण्यात येईल तेंव्हा ओबीसी समूहांचे आरक्षणही वाढेल. पण अशी मर्यादा वाढत नाही, तो पर्यंत ५० टक्क्यांवरील १६ टक्के आरक्षण न्यायालयात टिकू शकणार नाही. म्हणून असे आरक्षण...
  May 10, 04:18 AM
 • तामिळनाडूच्या 69 टक्के आरक्षणाशी महाराष्ट्रातील आरक्षणाशी तुलना होऊ शकत नाही. तामिळनाडूत 76 टक्के ओबीसी लोकसंख्येला फक्त 50 टक्के आरक्षण आहे; म्हणजे एकूण ओबीसी लोकसंख्येच्या केवळ 65 टक्के आरक्षण आहे. तर महाराष्ट्रात 32 टक्के ओबीसी लोकसंख्येला 32 टक्के आरक्षण आहे; म्हणजे महाराष्ट्रात एकूण ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण आहे. याला म्हणतात प्रमाणाबाहेर घटनाबाह्य आरक्षण. ते महाराष्ट्रात राजकीय दबावात सहन केले जाते. येथे मराठा आरक्षणाला ओबीसीतील अगदी एखाद-दोन जातींचाच जास्त विरोध...
  May 9, 06:35 AM
 • केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राजकीय पक्ष म्हणजे एक दुकान आहे. भाजपसोबत त्यांनी केलेली आघाडी ही आघाडी नसून दुकानदारी आहे. स्वतंत्र विचाराचा पक्ष असल्यामुळेच प्रवेश केला होता. पण प्रत्यक्षात आठवले भाजपला पूर्णपणे सरेंडर असल्याचे कळल्यामुळेच आपण रिपाइंला (ए) सोडचिठ्ठी दिली, असे मत सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच शहरात आले होते. त्या वेळी दिव्य मराठी प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली खास...
  May 8, 03:00 AM
 • कलेच्या क्षेत्रात अनुकरणाच्या सीमा ढासळवून टाकत, आपली वाट, शैली निर्माण करणे, हे आव्हानात्मक मानले जाते. जे अनुकरणातच धन्यता मानतात, त्यांचा वकुब मर्यादितच राहतो आणि ते कायम कुणाची तरी छाप किंवा ठसा घेऊन वावरत राहतात. पण काही मोजके कलाकार मात्र योग्य वेळी अनुकरणाची सरधोपट वाट सोडून, स्वत:च्या वाटा स्वत: निर्माण करतात, आणि कालांतराने त्या वाटांचे राजमार्ग बनून अन्य कलाकार त्यांचे अनुकरण करू लागतात...अशा मोजक्या कलाकारांमध्ये अरुण दाते हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संगीतमय, कलासक्त...
  May 7, 03:37 AM
 • सात दशकांपूर्वी महंमद अली जिनांनी देशाचे दोन तुकडे केले होते. मात्र त्यांच्या नावाखाली मतांचे विभाजन आजही सुरू आहे. कधी त्यांची प्रशंसा केली जाते तर कधी छायाचित्रावरून वाद होतो. नवा वाद हा छायाचित्राशी संबंधित आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठात ते लावले आहे. भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने ते हटवण्याची मागणी केली आहे. एएमयूला मात्र ते मान्य नाही. जिनांच्या नावाने पूूर्वीही या कारणांनी वाद झाले होते... * मुुंबईच्या लेमिंग्टन रोडजवळ असलेल्या काँग्रेस भवन परिसरात काही...
  May 6, 04:07 AM
 • मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा जमाना ओसरल्यावर आणि बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ज्या मोजक्या दिग्दर्शकांनी आपल्या कामाने दुरावलेला प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळवला, त्यातील दिलीप कोल्हटकर हे महत्त्वाचे नाव. भालबा केळकर, राजा नातू, विजया मेहता, पं. सत्यदेव दुबे..अशा दिग्दर्शकीय प्रभावळीच्या मुशीतून घडलेला कोल्हटकर यांच्यातील दिग्दर्शक मराठी प्रेक्षकांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर अनुभवला आणि त्यांच्या नाटकांना उदंड प्रतिसाद देऊन त्यांच्या दिग्दर्शकीय योगदानाला मनमुराद दाद...
  May 6, 02:20 AM
 • पुढील स्लाइडवर पाहा, इतर कार्टून्स...
  May 5, 03:43 AM
 • * १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दलितांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर केले. त्याआधी महात्मा फुले यांनी दलितांसाठी पाणवठे खुले केले होते. * १९३० -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील १९२७ चा महाडचा सत्याग्रह आणि १९३० चा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे जातीअंताच्या लढाईतील मैलाचे दगड ठरले. स्त्री शिक्षणाचे बीज रुजले स्त्री शिक्षणाचे बीज महाराष्ट्रात रुजले. १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली...
  May 1, 08:31 AM
 • पुणे आयटी पार्क: सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक पुणे(सुकृत करंदीकर)- बंगळूरू, हैद्राबादप्रमाणेच पुणे हे भारतातले प्रस्थापित आयटी डेस्टिनेशन आहे. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याने बंगळुरूनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे शहर आणि त्यातही हिंजवडी, खराडी, मगरपट्टा सिटी, ताथवडे या परिसरात आयटी उद्योग एकवटलेला आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी सांगितले, महाराष्ट्रातल्या लहानमोठ्या आयटी कंपन्यांची संख्या सातशेच्या...
  May 1, 08:29 AM
 • बलस्थाने महाराष्ट्रात शिक्षणाबद्दलची जागृती प्रचंड झाली. संपूर्ण समाज शिक्षण घेण्यासाठी अभिमुख बनला. तरुण पिढीने चांगले शिक्षण घ्यावे, राहणीमानाचा दर्जा सुधारावा ही वृत्ती समाजात वाढीस लागली. यासह राजकीय जागृतीही वाढली आहे. पूर्वी राजकारण आपला पिंड नव्हे, असे मानत तरुण मागे राहत, पण आता मात्र आपल्या हक्कासाठी शिक्षण घेणारा तरुण रस्त्यावर उतरत आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी नेतेही आग्रह धरत आहेत. दिल्लीतील जेएनयूतील आंदोलनही राजकीय जागृतीचाच एक भाग होता. धोके...
  May 1, 07:23 AM
 • १९१२ राजा हरिश्चंद्र... फाळकेंची निर्मिती चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी नाशिकमध्ये १९१२ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा तयार केला. महाराष्ट्र फिल्म कंपनी या देशातील पहिल्या चित्रपट निर्मिती कंपनीने १९२३ मध्ये सिंहगड आणि १९२५ मध्ये सावकारी पाश या चित्रपटांची निर्मिती केली. तेव्हापासून भारतीय सिनेमाचे केंद्रबिंदू बनलेली मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र बनली. १९६५ पासून वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या मराठीतील...
  May 1, 06:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED