आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मपरीक्षण:कोरोनानंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल होणार

Aurangabad3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजवर ज्या बाबींंना आपण महत्व दिलं नाही, त्या गोष्टी आपल्यासाठी किती गरजेच्या होत्या हे कळले

साधना शंकर

मागच्या दोन आठवड्यापासून सारे जग हे लॉकडाऊनमध्ये आहे. अनेकदा माझ्या खिडकीतून बाहेर डोकाऊन मी बघत असते. अनेकदा एखादी कार रस्त्यावरुन जाते तर कधी काही कुत्री इकडे तिकडे भटकताना दिसतात. कदाचित हे ते जग आहे जे मला माहित होतं. जेव्हा माझा फोन बघते तर त्यात जगभरातील विषाणूच्या प्रादुर्भावाचे व्हिडीओ असतात किंवा या लॉकडाऊच्या काळातील वेळ तुम्ही कसा व्यतीत कराल, विषाणूवर कशी मात कराल याचे सल्ले देणारे व्हिडीओ असतात. निसर्गाचे पुनरुत्थान हा देखील सोशल मीडियावर वारंवार येणारा विषय आहे. रस्त्यावर चालणारे हत्ती, दिल्लीमध्ये वाहणारी निळी यमुना या सर्वांचा यात समावेश आहे. अनेकवेळा हे आयुष्य मला हास्यास्पद ही वाटते. हल्ली मी सकाळी उठते तेव्हा पहिला विचार डोक्यात येतो की, मी एक वाईट स्वप्न बघत होते की काय? जसजसी सकाळ पुढे सरकते तसे माझ्याकडे ती एकटक बघते. ही वेळ माझ्यासाठी खूप त्रासदायक आणि आव्हानात्मक असते. 

मी नेहमी उत्साही राहण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी व्यायामपण करते, सोबतच घरातील सर्व काम करते ज्याची माझ्याकडून अपेक्षा केली जाते. मी आकाशातील ताऱ्यांनाही बघत असते जे प्रदुषण कमी झाल्यामुळे अधिक झगमगत असतात. पण मला हे स्विकारलं पाहिजे की, पुर्वीसारखं आयुष्य जगता येत नाहीये म्हणून माझी तगमग होते. बागेत फिरायला, चित्रपट बघायला जाण्यासाठी, मित्रांना आणि पाहुण्यांना भेटण्यासाठी माझी उत्कंठा वाढत आहे. या कित्येक वर्षात या सामान्य वाटणाऱ्या गोष्टींची किंमत मला कधीच जाणवली नाही. खरं तर या गोष्टी किती महत्वाच्या आहेत याबद्दल मी विचार सुद्धा केला नाही. अचानक ही एक संपत्ती बनली आहे जी मिळावी म्हणून मी प्रार्थना करत आहे.

कामावर जाताना आवरणे ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे अनेकदा आपण रडगाणं केलं असेल किंवा विनोदही केले असतील पण याच गोष्टींची वाट बघत बसलोय. घरी राहून काम सुरु आहे पण ऑफिसमध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांची उपस्थिती, एकमेकांना भेटणे, यासारख्या गोष्टींचे मूल्य आता स्पष्ट होत आहे. स्क्रीनची स्वतःची अशी एक उपयुक्तता आहे, परंतु आजूबाजूच्या इतर लोकांच्या उपस्थितीची उर्जा असते ती कधीही आत्मसात करू शकत नाहीत. रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणारे खेळाडू कधीही आकर्षक दिसत नाहीत. कोविड -१९ वर आपण विजय मिळवू, मग तो औषधाने असो, कालांतराने किंवा निसर्गाने. पण यानंतरचे जग कसे असेल याच प्रश्नाने आपल्याला घेरलेले असेल. 

आधीच्या सर्व साथीच्या रोगांनी आपल्या जगण्याच्या पद्धतीत बदल केलाय. एक मोठी लोकसंख्या नष्ट करणाऱ्या १३३७ च्या प्लेग या आजाराने इंग्लंडमध्ये मालमत्ता कायदा निर्माण केला शिवाय आम्हाला क्वारंटाइन या नवीन शब्दाचा परिचय करुन दिला आणि मध्यम वर्गाला जन्म दिला. अतिसाराच्या साथीने कचरा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेत आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठा बदल झाला. आमच्या काळात, सार्सच्या साथीने हे सुनिश्चित केले की तैवानसह अनेक देशांनी याची खात्री करुन घेतली की लोक नियमितपणे मास्कचा वापर करतील. युवल हरारी सारख्या लेखकांनी अधिकाधिक देखरेख ठेवण्याचा इशारा दिला आहे, कारण तंत्रज्ञानाचा उपयोग हा रूग्ण व त्यांच्या संपर्कांतील लाेकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो तर शिक्षणतज्ञ किशोर महुबानी हे चीन-केंद्रित जागतिकीकरणाबद्दल बोलतात, तर  रिचर्ड एन. हास या रोगानंतर आणखी अयशस्वी देशांच्या उदयाचा इशारा देतात. पण वैयक्तिक बदलांचे काय? आपले जीवन बदलण्याच्या विषाणूच्या क्षमतेमुळे लोक सध्या भारावून गेले आहेत. आयुष्य कधीच एकसारखे राहणार नाही अशी एक तीव्र भावना निर्माण झाली आहे. अशा अनेक कल्पना मनात येतात त्यापैकी आपल्या आयुष्याची गती मंद करणे शिवाय आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत वेळ घालावण्याचे महत्व, खूप मोठ्या महत्वाकांक्षा कशा निरर्थक असतात याची जाणीव, आयुष्यात भावनांचे महत्व, अनावश्यक गोष्टींचा वापर आणि आवश्यक गोष्टी किती मर्यादित आहेत या सर्वांची जाणीव होते. आपल्या आयुष्याचे नवीन नायक म्हणजेच पोलिस, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आहेत ज्यांनी जग सुरु ठेवलं आहे. अशी आशा करु शकतो की हे सर्व विचार आणि मूल्य ही सर्व नष्ट झाल्यावर ही जिवंत राहतील. पण एक क्षुल्लक शंका देखील आहे की, जेव्हा आपण विषाणूवर मात करु तेव्हा आपलं आयुष्य जगण्यासाठी आपण स्वतंत्र असू पण त्यावेळी या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत काय? की सर्व काही विसरुन पहिल्यासारखेच असेल. आपण मास्क वापरणे सुरु ठेवू शकतो. पण याकाळात आपण जो धडा घेतला आहे तो नेहमीच आपल्या स्मरणात राहील काय? अशी आशा करु शकतो की सर्वांमध्ये असे बदल होतील आणि हे पूर्ण जगात दिसून येतील, कारण ही घटना प्रत्येकाचं आयुष्य बदलणारी आहे.

बातम्या आणखी आहेत...