आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षितिजांच्या पल्याड:वक्त के पांवों में कांटा नहीं चुभता, वह नहीं रुकता

Aurangabad3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ही वेळ जीवनाची नवी व्याख्या समजावून सांगणे, अंतरीचे नवे सूत्र सांगण्यासाठी आली अाहे.

इरशाद कामिल


खुश रहना हर हाल में
ये ताकीद बचाती आई है,
अपने जैसे कितनों को
उम्मीद बचाती आई है

मी माझ्या खोलीतून बाहेर डोकावून बघत होतो. बाहेर रस्ता ओस पडलाय. रिकामा रस्ता कोऱ्या कागदासारखा असतो, त्यावर काहीही लिहिता येतंय. शिवाय रिकामा रस्ता हा रिकाम्या कॅन्व्हाससारखा असतो, ज्यावर काहीही करता येतंय. जसं आता मोकळ्या रस्त्यांवर एक सोळा-सतरा वर्षांचा मुलगा सायकल चालवतो. याआधी इथूनच एक बस निघून गेलीय तर तिथूनच एक कार गेली, ती एक मुलगी चालवत होती. पण आता बघा आयुष्य निघालंय या रिकाम्या रस्त्यांवरून.

आपल्याला घरात बसून कंटाळाही येऊ शकतो, सारखं आपण बोलू शकतो की या जेलमधून कधी मुक्ती मिळेल. पण याच वेळी आपण आपल्या कुटुंबासोबत नवीन नात्यांची सुरुवात करू शकतो. त्यात कधी कटुता आलीय हे माहीतसुद्धा नसेल. 

तुम्ही मला विचाराल की, आयुष्य कसे आहे? मी सांगेन की, तुम्ही जशी कल्पना कराल तसेच असेल. तुम्ही विचाराल की आयुष्य कोण चालवतं? मी सांगेन की, तुम्हीच तुमच्या आयुष्याचे चालक आहात. पण आता हे कनेक्शनही पुन्हा जोडता येऊ शकते, जे मोबाइलमुळे लूज झाले आहे. एक पूल बनवता येऊ शकतो, जो दोन मनांना जोडू शकतो.

एक दिवस ऑफिसमध्ये कामाच्या वर्कलोडसोबत मी हातात चहाचा कप घेऊन विचार करू लागलो. कधीच मला तिला सांगितलं नाही की, तिचा कॉफी कलरचा क्लिप मला खूप आवडतो, कधीच तिला सांगितलं नाही. मला खूप वाटते की, तिच्यासोबत रम्य संध्याकाळी दूर कुठंतरी फिरायला जावं आणि खूप गप्पा माराव्यात. किती वर्षं झालीत, मी माझ्या मुलासोबत कोणताच खेळ खेळलो नाही. किती टाळतो मी त्या छोट्या- छोट्या गोष्टींना, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या डोळ्यांखाली झालेली काळी वर्तुळंही मी कधीच पाहिलं नाही. किती महिने झालेत त्या मित्राची चौकशी करून ज्याच्या घराबाहेर माझी सायकल चोरीला गेली होती तेव्हा मी त्या मुलाच्या वयाचा होतो, जो त्या रस्त्याच्या कॅन्व्हासवर काळ्या रंगाची सायकल चालवत होता.


उम्र गुजरी भी नहीं
और कुछ गुजर भी गई
वक्त ठहरा भी नहीं
और कुछ ठहर भी गया

खरं तर वेळेला कधीच कशाची मर्यादा नसते. वेळ ही कुणासाठीच थांबतही नाही, ती निघून जाते. आता माझ्याकडे वेळ आहे, मी घरीच आहे, आता मी सांगेन तिला तिच्या केसांतील क्लिपबद्दल, तिला सांगेन की माझं आयुष्य सुंदर बनवण्यात तिचा किती वाटा आहे हे, माझ्या बहिणीसोबत लहानपणी केलेल्या काही गमती करेन, आता मुलाचे बोट धरून त्याला चालायला शिकवेन. पण आता चालायचे रस्ते वेगळे असतील, त्याला या वेळी हेही सांगेन की अनेक वेळा चालताना रस्त्यात काही गोष्टी थांबून बघणंही गरजेचं आहे, जसे आपण घरी थांबलो आहोत. ही वेळ त्यांच्यासाठीही खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्यांनी या भांडवली व्यवस्थेत स्वतःचा मेंदू आणि मन गहाण ठेवलं नाहीये. जे आपल्या नात्यांसाठी वेळ देतात, चांगलं शिक्षण घेत आहेत, चांगलं संगीत ऐकतात आणि चांगला आचार-विचार करतात. असे अनेक सुंदर लोक घरातून काम करत असले तरी त्यांना ऑफिसमध्ये बसून न करता येणाऱ्या गोष्टी आठवत असतील, जुन्या मित्रांना फोन करणे, पत्नीच्या किंवा मुलांच्या आवडीनिवडी समजून घेणे तसेच आपल्या घरातील कामांना मदत करणे, त्यांचा आदर करणे. सरळ शब्दांत सांगायचं तर ही वेळ जीवन जगण्याची नवीन परिभाषा समजण्यासाठी तसेच आपल्यातील अंतराचे सूत्र समजण्यासाठी आली आहे. नात्यातील स्वार्थीपणा झटकून टाकण्याची आहे, आपल्या आत असलेला अहंकार दूर सारण्याची ही वेळ आहे.तसेच आपलीच आपल्या घरासोबत नव्याने ओळख करून द्यायला ही वेळ आली आहे.

काही वेळ थांबून चूक काय किंवा बरोबर काय आहे या दिशेने विचार करून आपल्याला पुढं प्रवास करायचा आहे, तसाच जसा तो सोळा-सतरा वर्षांचा मुलगा सायकल चालवत होता. अशा वेळी असगर गोंडवी यांच्या ओळी आठवतात-  

चला जाता हूं हंसता खेलता 
मौज-ए-हवादिस* से
अगर आसानियां हों ज़िंदगी 
दुश्वार** हो जाए।
*हादसों की लहर,  **मुश्किल

बातम्या आणखी आहेत...