आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृष्टिकाेन:लडाखमध्ये सैन्याला मदत करणारे सैन्यदलाचे अनाम नायक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखमध्ये ५० हजार सैनिक युद्धासाठी सज्ज ठेवण्यात ऑपरेशनल लॉजिस्टिक स्टाफची मोठी भूमिका

एक जुनी म्हण आहे, सैन्य आपल्या पोटावर चालते आणि लढते. आधुनिक काळात पोटाचा सांकेतिक अर्थ व्यापक झाला आहे आणि तो ऑपरेशनल (परिचालन) प्रयासाच्या लॉजिस्टिक्सशी (सैन्य संचालन) संबंधित भागाशी जोडला गेला आहे. यामुळे याला ऑपरेशनल लॉजिस्टिक्स म्हटले जाते. यामध्ये लढाई सोडून बाकी सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. धान्य, अवजारे, वाहनांचे इंधन, वंगण, उंचावरील ठिकाणांसाठीचे कपडे, जनरल स्टोअर, टेक्निकल स्टोअरसारख्या अनेक गोष्टींचा यात समावेश होतो. ही यादी बरीच लांब आणि कधीच पूर्ण न होणारी असते. सामान्य धारणेनुसार, सैनिक बंकरमध्ये पोहोचतात आणि लढाईसाठी तयार होतात. सैनिक प्रत्येक वेळी तयारीतच असतात, पण त्यांना योग्य स्थितीत ठेवणे, आजारी किंवा जखमी असल्यावर त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांचे मनोबल वाढवणे हे लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशनचे काम असते. सीमेच्या संरक्षणासाठी जवळजवळ ४० हजार अतिरिक्त सैनिकांना सहा आठवड्यांपेक्षाही कमी वेळेसाठी लडाखमध्ये पाठवणे या संघटनांसाठी बरेच अवघड काम होते. या मोहिमेची योजना सामंजस्याने आखण्याची जबाबदारी ऑपरेशनल लॉजिस्टिक्स स्टाफच्या प्रत्येक हेडक्वार्टरवर असते.

सैनिक आणि त्यांच्या उपकरणांचे परिवहन जलद गतीने केले जाते. त्यामध्ये हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या संसाधनांचा समावेश असतो. लडाखच्या जागी राजस्थान किंवा पंजाब असेल, तर लॉजिस्टिक्स अनेक कारणांनी सुलभ होते. मैदानी भाग असल्यामुळे विविध रस्त्यांवर वेगवान आणि विस्तृत हालचाली होतात. दुसरे म्हणजे, स्थानिक स्रोतांकडून अन्न आणि स्टोअरचा पुरवठा उपलब्ध होतो, जो आधीपासूनच मोठ्या लोकसंख्येसाठी तयार असतो. तिसरे म्हणजे, सामान्य वातावरणामुळे विशेष कपडे आणि पोषणाची वेगळी गरज नसते. चौथे, सैनिकांचे आरोग्य धोक्यात न घालता त्यांना सामान्य कॅन्व्हास तंबूमध्ये ठेवता येते. लडाखबाबत गुंतागुंत जास्त आहे. मैदानी भागपासून ते पर्वतीय भागात रणगाडे घेऊन जाणे हे अवघड काम आहे. कारण तिथे ज्यावर अवजड वाहतूक करता येईल, असे रस्तेच कमी प्रमाणात आहेत. हवाई वाहतूक खर्चिक आहे. खरे तर अनेक रणगाड्यांची आधुनिक यूएस सी-१७ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने वाहतूक करण्यात आली. पठाणकोट आणि जम्मूसारख्या क्षेत्रात, जिथे मैदान आणि पर्वतरांगा आहेत, तिथे मनालीहून लेह आणि जोजिला पासकडून श्रीनगर या मार्गात रस्त्यांची संख्या मर्यादित असताना सैनिकांना युद्धाच्या सामग्रीचे परिवहन करण्यात आले. कोणत्याही मार्गाने गेले तरी पोहोचायला चार दिवस लागतात आणि कोणत्याही गाडीला येण्या-जाण्यासाठी दहा दिवस लागतात. याचा अर्थ असा की, अवजड सामानाची वाहतूक करण्यासाठी अशा गाड्यांची अधिक गरज आहे. दोन्ही रस्ते नोव्हेंबरमध्ये बर्फ पडल्यामुळे बंद होतात आणि पुढच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये उघडतात. म्हणजेच काम करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी असतो. यादरम्यान ४० हजार अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती केली जाते. प्रत्यक्षात गलवान संघर्षानंतर जुलै २०२० मध्ये साठा करणे सुरू झाले, तेव्हा लडाखमध्ये अतिरिक्त सैन्याची तैनाती सुरूच राहणार, हे स्पष्ट झाले. याचा अर्थ असा की केवळ चार महिने संचयनासाठी उपलब्ध होते. उदा. आपण असे गृहीत धरले की एखाद्या सैनिकाला दररोज २.१ किलो धान्य (पीठ, डाळी, तांदूळ, दुधाची भुकटी इ.) लागत असेल तर ४० हजार सैनिकांसाठी १८० दिवसांत १५ हजार १२० टन धान्य आवश्यक असेल, जे ३७८० गाड्यांच्या भार क्षमतेच्या समान आहे. आपण इंधन, तेल, जनरेटर, शस्त्रे इत्यादींसाठी समान गणना केली, तर धक्कादायक आकडेवारी समोर येईल. यामध्ये हवाई दल आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गरजा तीन लाख लोकसंख्येचा संचयनासाठी समाविष्ट केल्या आणि संपूर्ण हंगामात वाहतुकीची व्यवस्था केली नाही, तरच पूर्ण हंगामात वाहतूक कोंडी होईल. हे लक्षात घ्या की, सगळे प्रशासकीय प्रयोग लेहपर्यंत होत आहेत आणि खरेच युद्ध सुरू झाले तर लडाखच्या रेंजमध्ये १८ हजार फूट उंचीवर पूर्व लडाखमध्ये ते होतील. हा एक चमत्कारच आहे की, आपल्या सेनेने तेथे अतिरिक्त ठिकाणे तयार केली आहेत. इथे स्मार्ट कॅम्प आहेत, त्यामध्ये उणे ३० डिग्री तापमान सहन करण्याची क्षमता आहे. लाइट, पाणी आहे. शिवाय, आघाडीवर उष्ण तंबू उपलब्ध आहेत. यावरून भारतीय सैनिकांच्या दृढतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. कोणतीही युद्ध संस्था वैद्यकीय सुविधांशिवाय कार्य करू शकत नाही. पूर्व लडाखमधील सर्जिकल सेंटरमध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, जी तेथील वैद्यकीय सुविधांची चांगली उपलब्धता दर्शवते. लॉजिस्टिक्स स्टाफ आणि युनिट हे सेनेचे अनाम हीरो असतात. त्याच्या अथक प्रयत्नांमुळेच आपले सैनिक केवळ दृढपणे उभे ठाकत नाहीत, तर आपल्या सीमांचे रक्षण करण्याचे राष्ट्रीय ध्येय सक्षमपणे पूर्ण करू शकतात.

काश्मीरमधील १५ व्या कोअरचे
माजी कमांडर
लेफ्ट. जनरल एस.ए. हसनैन

बातम्या आणखी आहेत...