आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईत जार्ज पंचम यांच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आलं, शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधलं... आपल्यासारखी माणसं राहण्यासाठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस हा खऱ्या अर्थाने महामानवच असतो. डॉ. बाबासाहेब हे महामानव होते म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकांसाठी घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. बाबासाहेबांच्या याच राजगृहावर काही माथेफिरूंनी हल्ला केला. ज्या घरात ६००० हून अधिक तत्वज्ञानाची पुस्तके आहेत त्याच घरावर नेमका हल्ला करण्यात आला. यातील एक पान जरी माथेफिरूंनी वाचलं असतं तर त्यांच्याकडून नक्कीच अस कृत्य झालं नसतं. असो, पण या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर “राजगृह” ही नेमकी वास्तू कशी आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न...
मुंबईतले एक घर... या घरात सुमारे ५०,००० हून अधिक पुस्तकं आहेत. त्यामध्ये राजकारणावर तीन हजार, कायद्यावर पाच हजार, अर्थशास्त्रावर एक हजार, तत्वज्ञानावर सहा हजार, युद्धशास्त्रावर तीन हजार, धर्मशास्त्रावर दोन हजार अशी बरीच संख्या आहे. या घराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ती म्हणजे, हे सर्वसामान्य घर नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “राजगृह’ आहे. चार दिवसांपूर्वी दादर येथील या राजगृहावर काही माथेफिरूंनी हल्ला केला. बंगल्याच्या आवारातील कुंड्या फोडण्यात आल्या... सीसीटीव्ही फोडून टाकण्यात आले. ही घटना अशासाठी वाईट आहे की, ज्या घरात ६००० हून अधिक तत्वज्ञानाची पुस्तके आहेत त्याच घरावर नेमका हल्ला करण्यात आला. यातील एक पान जरी माथेफिरूंनी वाचलं असतं तर त्यांच्याकडून नक्कीच अस कृत्य झालं नसतं. असो, पण या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर “राजगृह” ही नेमकी वास्तू कशी आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न...
मुंबईत जार्ज पंचम यांच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आलं, शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधल्याची नोंद आहे. आपल्यासारखी माणसं राहण्यासाठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस हा खऱ्या अर्थाने महामानवच असतो. डॉ. बाबासाहेब हे महामानव होते म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकांसाठी घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. बॅरिस्टर झाल्यानंतरदेखील बाबासाहेबांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. १९३० सालापासून त्यांच्या प्रॅक्टिसमुळे या स्थितीत फरक पडत गेला. आर्थिक पातळ्यांवर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी मुंबईत दोन घरे बांधण्याचा मनोदय केला. त्यापैकी एक घर हे खास पुस्तकांसाठी असणार होतं तर दुसरं घर हे राहण्यासाठी असणार होतं.
त्यासाठी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट घेतले. ९९ क्रमांकाचा आणि १२९ क्रमांकाचा प्लॉट त्यांनी विकत घेतला. १९३१ मध्ये बांधकामास सुरवात करून १९३३ साली बांधकाम पूर्ण करण्यात आलं. तर ९९ क्रमांकावर असणाऱ्या प्लॉटवर १९३२ साली बांधकाम सुरू करण्यात आलं. ९९ क्रमांकावरील बंगल्याचं नाव त्यांनी चार मिनार ठेवलं. मात्र पुढे ९ मे १९४१ साली त्यांनी चार मिनार ही इमारत विकली. कशासाठी तर ग्रंथ विकत घेण्यासाठी... १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर बांधण्यात आलेल्या सुरेख दुमजली इमारतीचे नाव बाबासाहेबांनी गौतम बुद्ध यांच्या राजमहालावरून “राजगृह” असे ठेवले. माणसं घरात पुस्तके ठेवतात. पण राजगृहची रचना पाहिली तर बाबासाहेब पुस्तकांमध्ये रहायचे हे दिसून येतं. आपलं सुरेख ग्रंथालय बांधताना त्यांनी न्यूयॉर्कच्या ग्रंथालयाचा अभ्यास केला होता. त्यासाठी मोठमोठे खांब आणि स्वच्छ प्रकाश येणाऱ्या खिडक्या बांधण्यात आल्या होत्या. पुढे इथेच बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहले. भारताचे संविधान तयार होण्याचं किंवा “बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक लिहण्याचं राजगृह साक्षीदार राहिलं आहे. अशा या राजगृहचे बांधकाम पूर्ण होताच रमाई यांना येथे आणलं होतं. रमाई हे घर पाहताच म्हणाल्या होत्या “‘हे घर नाही तर एका महान विद्वानाच भव्य असं ग्रंथ भांडार वाटतं.’’
बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांसाठी इंग्लडच्या ठक्कर कंपनीतून ग्रंथालय कार्ड बनवून घेतली होती. बाबासाहेबांच्या अचूक स्मरणशक्तीमुळे ५० हजार पुस्तकांमधून त्यांनी ती अचूक सापडत असत. तासन् तास बाबासाहेब ही पुस्तके वाचत बसत. इतक्या पुस्तकांमधून ते अचूक संदर्भ सांगायचे. एका विद्वान माणसाने पुस्तकांसाठी म्हणून हे घर बांधलं होतं. या घरातील पुस्तकांचे ग्रंथालय हे त्याकाळातील जगातील सर्वांधिक व्यक्तिगत पुस्तक असणारे ग्रंथालय होते.
राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तुसंग्रहालय आहे. डॉ. आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू इथं ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातलं फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचं टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. डॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या छड्या (Walking Sticks) जमवण्याचाही छंद होता. वेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलायं. शेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारे फोटोग्राफ्स आहेत.
बाबासाहेबांच्या या “राजगृह’वर ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर म्हणतात, राजगृह म्हणजे तत्वज्ञानगृह! मानवी जीवनाच्या व्यवस्थांतराची धगधगती प्रयोगशाळा म्हणजे राजगृह... इतर सत्ता येतात आणि जातात, पण ग्रंथसत्तेचा सूर्य उगवतो आणि कधीच अस्ताला जात नाही. राजगृह म्हणजे या ग्रंथराजांच गृह.
bolbhidu1@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.