वैश्विक कर्जाचे बुडबुडे, ‘काेराेना’चे वाढते संकट


  • अमेरिकीे कॉर्पोरेट सेक्टरवरील एकूण कर्ज जीडीपीच्या ७५%, २००८ पेक्षाही अधिक

प्रतिनिधी

Mar 21,2020 08:19:00 AM IST

रुचिर शर्मा
द न्यूयॉर्क टाइम्सचेे स्तंभलेखक


जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदरांमध्ये अाक्रमकरीत्या कपात करीत अाहेत. परंतु, या निर्णयाचा मार्केटला क्वचितच फायदा हाेत असावा. अाता काेराेना विषाणूने १२ वर्षांपूर्वीच्या अार्थिक मंदीच्या तुलनेत जागतिक अर्थव्यवस्थेत बरेच संवेदनशील वित्तीय संक्रमण फैलावण्याचा इशारा दिला अाहे. गत वित्तीय संकटाच्या तुलनेत या खेपेस सारे जग कर्जाच्या विळख्यात अात्यंतिक गंभीरपणे अडकले अाहे. सर्वाधिक जाेखमीच्या कर्जापैकी माेठा वाटा घरे अाणि बँकांएेवजी काॅर्पाेरेशनकडे वळला अाहे. नगदीच्या प्रवाहात अचानक स्थगितीच्या शक्यतांशी झगडणाऱ्या व्यवसायामध्ये अधिकांश नवी पिढीतील अशा कंपन्या अाहेत, ज्या पूर्वीपासूनच कर्जफेडीसाठी संघर्षरत अाहेत. या श्रेणीत अशा जम्बाे कंपन्यादेखील अाहेत, ज्या इतके कमी कमावतात की अापल्या कर्जावरील व्याजाचीदेखील फेड करू शकत नाहीत. प्रत्येक वेळी नव्याने कर्ज काढून त्या पुढे रेटल्या जात अाहेत. ही महामारी जेवढा अधिक काळ लांबेल, वित्तीय संकट तितकेच गंभीर हाेण्याचा धाेका वाढेल अाणि या संधीचा फायदा घेत जम्बाे कंपन्या एकापाठाेपाठ एक डिफाॅल्टर बनण्यास सुरुवात करतील.


गेल्या शतकात जादा व्याजदराचा प्रभाव अधिक काळ राहिल्यामुळे मंदी सुरू झाली, मात्र एखाद्या विषाणूमुळे नव्हे. जागतिक अर्थव्यवस्थेतील या संक्रमणामुळे हाेणारे नुकसान तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही. परंतु, कर्जाच्या अाेझ्याखाली पिचलेल्या साऱ्या जगाला काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे धक्के बसत अाहेत. मध्यवर्ती बँकांमध्ये जाणवणारी राेकड टंचाई नव्या वित्तीय संकटाला जन्म देऊ शकते. २००८ मध्ये ‘फेड’ने मार्केटमधील भीतीचे वातावरण निवळण्यासाठी अाक्रमक उपाय याेजले हाेते. परंतु, अाताचे वित्तीय संकट इतके संवेदनशील का बनले अाहे, हा तपासाचा विषय अाहे. १९८०च्या अासपास जगभर कर्जाचे प्रमाण झपाट्याने वाढत राहिले, कारण व्याजदर कमी हाेत हाेते अाणि विनिमयन सुरळीत राहिल्याने कर्ज देणे साेपे ठरत हाेते. २००८ पूर्वी कर्जाने एेतिहासिक उंची गाठली हाेती. थाेडक्यात सांगायचे तर जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत कर्जाऊ रक्कम तिप्पट झालेली हाेती. मात्र जसा अार्थिक विस्तार हाेत गेला, उधार देणाऱ्यांमध्ये शैथिल्य अाले अाणि ज्यांची फारशी कमाई नाही अशा कंपन्यांनादेखील कर्ज पुरवले जाऊ लागले. अाजदेखील जगावरील कर्जाचा भार अाजवरच्या तुलनेत सर्वाधिक अाहे.


अमेरिकी काॅर्पाेरेट सेक्टरवरील कर्ज हे जीडीपीच्या ७५% असून, २००८च्या तुलनेत अधिक अाहे. ट्रान्सपाेर्ट, अाॅटाे अाणि तेल क्षेत्रात वित्तीय तणावाची स्थिती सतत निर्माण हाेत अाहे. जादा पुरवठा अाणि विषाणूमुळे मागणीतील घट यामुळे तेलाचे दर प्रतिबॅरल ३५ डाॅलरपेक्षाही गडगडले अाहेत. अनेक तेल कंपन्या स्वत:कडील कर्जदेखील फेडू शकणार नाहीत अशा स्थितीत येऊन ठेपल्या अाहेत. अस्थिर कंपन्यांचे बाँड नेहमीच जादा रिटर्नच्या अपेक्षेने गुंतवणूकदार खरेदी करतात, परंतु अमेरिकेत अशा कर्जावरील प्रीमियमची मागणी फेब्रुवारीच्या मध्यापासून दुप्पट झाली अाहे. या महामारीचा थेट परिणाम या कर्जदारांवर पडणाऱ्या प्रभावाने वाढणार तर अाहेच, शिवाय वित्तीय मार्केटमध्ये कंपन्या असफल ठरण्यानेदेखील तीव्रता जाणवणार अाहे. जेव्हा बाजार काेसळताे तेव्हा गुंतवणूकदारांचे उत्पन्न घटते अाणि ते अापले खर्च कमी करू लागतात, परिणामी अर्थव्यवस्थेची गती मंदावते. बड्या मार्केटवर याचा परिणाम अधिक नकारात्मक हाेताे. चीनमध्ये पहिला विषाणुबाधित ३१ डिसेंबरला उघडकीस अाला, अाणि १३ फेब्रुवारीला त्याची तीव्रता गंभीररीत्या वाढली. प्रारंभिक नुकसानीनंतर चिनी शेअर बाजाराने दाेन वेळा उसळी घेतली अाणि अर्थव्यवस्था पूर्ववत दिसू लागली. परंतु रिटेल विक्री अाणि गुंतवणुकीचा ताजा डाटा पाहता या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्था अाक्रसत असल्याचे दिसते. काेराेनाचा विषाणू जसा जगभर फैलावताे अाहे, तसे निर्यातीची मागणी घटेल अाणि चीनच्या अार्थिक अडचणी वाढतील. गेल्या दशकात चीनचे काॅर्पाेरेट कर्ज चारपटीने वाढून २० ट्रिलियन डाॅलरपेक्षाही अधिक झाले असून या कर्जाचा एकदशांश हिस्सा जम्बाे कंपन्या जीवित ठेवण्यासाठी वापरला गेला अाहे. अार्थिक अडचणीत असलेल्या कंपन्यांना सरकारने अशा पद्धतीने वित्तीय पुरवठा करावा, अशी मागणी जगभर जाेर धरते अाहे. काेराेना विषाणू किती लवकर पराकाेटीला पाेहाेचताे यावर बरेच काही अवलंबून अाहे. विद्यमान गतीने जेवढा अधिक काळ ताे फैलावत राहील तसे जम्बाे कंपन्या मृत्युशय्येच्या जवळ पाेहाेचतील. यामुळे मार्केट अाणखी रसातळाला जाईल.

X