आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बामुलाहिजा:कोरोनाने केवळ रुग्णच केले नाही, आपल्यात फूटही पाडली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एखाद्या विषाणूचा संबंध धर्म आणि विचारधारेशी जोडला जाऊ शकतो? आपण हेही करून दाखवले
Advertisement
Advertisement

 विषाणूचा काेणता धर्म असताे? महामारीची काही विचारसरणी असते? काय, हायड्राेक्सिक्लाेराेक्विन सारख्या अाैषधावर राजकारण पेटू शकते? दुर्दैवाने या तीनही प्रश्नांची उत्तरे ‘हाे’कारार्थी येतात. अाज अापल्या भोवताली किती विष पेरले गेले अाहे, याचे ते निदर्शक ठरावे. इतकेच नव्हे, तर काेराेना महामारीविराेधी संघर्षात संपूर्ण जगात अाणि अाता भारतातही इतकी अराजकता का अाहे? जाे लढा एका कठाेर अाणि संपूर्ण लाॅकडाऊनने सुरू झाला हाेता अाणि ज्यामध्ये प्रत्येक जण सहभागी हाेता. त्याचा परिणाम सत्ताधारी-विराेधी पक्ष, केंद्र सरकार अाणि बिगर भाजपशासित राज्यातील राजकीय तू-तू-मी-मीच्या रूपात पाहायला मिळाली. यापेक्षाही निराशाजनक बाब अशी की, अापल्या बहुतेक सार्वजनिक चर्चेची अखेर अशीच हाेते. खरे तर अाम्हाला या संकटाच्या निमित्ताने अापल्या पक्षीय भावना, अंधभक्ती, घृणा, संशय किंवा कल्पनांमध्ये गुंतून न राहता त्याच्याशी मुकाबला करण्यावर लक्ष देणे गरजेचे हाेते. अापल्या देशात काेराेनाच्या विषाणूला तर धर्माशी सर्वात अगाेदर जाेडले गेले. त्याचा प्रादुर्भाव तबलिगी जमातमुळे वाढल्याचा ठपका ठेवला गेला. तबलिगी जमातची मंडळी परत अाल्यानंतर गुजरातेत काेराेना बळावला असे विधान अगदी दाेन अाठवड्यांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केले हाेते. उल्लेखनीय म्हणजे त्यांचे राज्य हे या महामारीतील सर्वाधिक प्रभावी अशा तीन राज्यांमध्ये माेडतेे. या दरम्यान महाराष्ट्रातील नांदेड येथून परतलेल्या शीख भाविकांच्या माध्यमातून विषाणू पसरल्याचा मुद्दा चर्चेत राहिला. विषाणूला धर्माविषयी प्रेम नसते, मात्र धार्मिक जमावाशी जरूर असते.

या महामारीच्या संदर्भात लाॅकडाऊनपासून ते निदान-उपचार, संसर्ग अाणि मृत्यूपर्यंतच्या साऱ्या मुद्द्यांवरील चर्चा ही विचारधारेच्या अाधारावर विभागलेली राहिली. जर नरेंद्र माेदी, डाेनाल्ड ट्रम्प किंवा बाेरिस जाॅन्सन तुम्हाला अावडत असतील तर त्यांनी काही चुकीचे केले असे तुम्हाला वाटणार नाही. जर हे नेते अावडत नसतील तर लाखाे लाेकांच्या मृत्यूला हेच जबाबदार असल्याचे तुम्ही सांगाल. ही महामारी एप्रिल-सप्टेंबरदरम्यान संपुष्टात येईल, असे अाशावादी चित्र रंगवणारे विशेषज्ञदेखील तुमच्या पसंतीस पात्र ठरतील.

गेल्या ७० वर्षांपासून मलेरियावर मात करणाऱ्या हायड्राेक्सिक्लाेराेक्विन किंवा एचसीक्यू या स्वस्त गाेळ्यांविषयी बरेच काही लिहिले गेले अाहे. परंतु ट्रम्प यांनी काेणत्याही शास्त्रीय अाधाराशिवाय हे अाैषध गेमचेंजर असल्याचे सांगून टाकले अाणि माेदींनी त्याचे साठा पाठवण्यास काय सुरुवात केली, जणू हा राजकीय फुटबाॅल ठरला. खरे म्हणजे या साऱ्या दाव्याला काेणताही अाधार नाही. याचे इतके राजकारण झाले की, ‘द लॅन्सेट’सारख्या अाशयघन वैद्यकीय नियतकालिकाने असा शाेधनिबंध प्रकाशित करून टाकला की, जाे एखाद्या उपसंपादकानेदेखील संदिग्ध अाकडेवारीमुळे रद्दबातल ठरवला असता. या संकटकाळात ‘हिंदू’मधील लेख मला अावडला, अाणि मी विचार करू लागलाे की कदाचित मीदेखील इतकी चांगली बाब लिहू शकताे तर... त्यात म्हटले हाेते,‘काेविडनंतर जग दहशतीखाली काम करणारे ठरले अाणि काेणतीही संस्था, काेणतीही मूल्यांकन प्रक्रिया याला अपवाद राहिली नाही. एखाद्या वैज्ञानिक प्रक्रियेला सत्ता, विशेषाधिकार, पैसा अाणि राजकीय प्रभावापासून अपवाद ठरवणे ही चूक ठरेल हा या साऱ्या घटनाक्रमाने दिलेला धडा हाेय.

राजकारण कधी थांबत नाही, परंतु काही काळासाठी पक्षपात करणे स्थगित करू शकता अाणि मूळ मुद्दा विशेषज्ञ अाणि याेद्ध्यांच्या भरवशावर साेडू शकता. त्यांचा उपहास करण्याने काही साधणार नाही. विशेषत: साेशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवून काही मिळणार नाही. जेव्हा विशेषत: अायसीएमअारचे महासंचालक डाॅ. बलराम भार्गव यांना पाहाल तेव्हा त्यांच्या डाेळ्यांच्या चहुबाजूंनी अालेल्या काळ्या डागांकडेही लक्ष द्या, इतरांचीही हीच स्थिती अाहे.

अापण हे लक्षात घेतले पाहिजे की, सध्याच्या काळात गूढ गाेष्टी करणे हे अात्महत्या केल्यासारखेच अाहे. गेल्या अाठवड्यातील काॅलमवर अालेल्या प्रतिक्रियांद्वारे मला हा धडा मिळाला. या काॅलममधून माेदी सरकार अार्थिक सुधारणा लागू करण्यात मागे का हटत अाहे? या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न मी केला हाेता. त्यामुळे या वेळेस काेणताही राजकीय वाद उद्भवणार नाही यासाठी सावधगिरी बाळगली अाहे, तथापि या संघर्षात एकमेकांना शह देण्याचा जाे प्रयत्न हाेत अाहे, त्याचे परिणामदेखील समाेर येत अाहेत अाणि तूर्त असे वाटते की काेविड संकट काेणाच्या नियंत्रणात येत नाही.

एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’
Twitter@ShekharGupta
शेखर गुप्ता

Advertisement
0