साहचर्य : काेराेनाचा काळ - आयुष्याचे रिसेट बटण दाबण्याची संधी

  • विलग राहूनच महामारीच्या काळात एकमेकांशी जवळीक साधू शकताे

दिव्य मराठी

Mar 26,2020 10:29:00 AM IST

गौर गोपाल दास


साधी बाब अाहे, एका विनाेदावर अापण दुसऱ्यांदा पुन्हा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे हसून दाद देऊ शकत नाही, तर एकाच समस्येवर सतत का रडत बसताे? अापण काेविड-१९ नावाच्या ज्या महामारीचा सामना करीत अाहाेत त्यावर सतत चर्वितचर्वण करीत बसण्यापेक्षा या समस्येमुळे जाे धडा मिळाला अाहे ताे सर्वांनीच अापापल्या दैनंदिन जीवनात रुजवला पाहिजे.


काही वर्षांपूर्वी मी सॅन फ्रान्सिस्काेला गेलाे हाेताे. माझ्या मित्रांनी मेरवूड्स जंगलात नेले. रेडवूडची झाडे पाहून मला खूप अाश्चर्य वाटले. ही झाडे सुमारे ३०० फूट लांब, ३० फूट रुंद अाणि जवळपास तीन हजार वर्षे जुनी असतात. इथल्या वनाधिकाऱ्यास मी विचारले की, याची मुळे खाेलवर रुजल्यामुळे ही झाडे अधिक मजबूत अाणि टिकाऊपणे उभी अाहेत का? ताे अधिकारी म्हणाला, या झाडांची मुळे अधिक खाेल जात नाहीत, परंतु लगतच्या मुळांशी ते जाेडलेली असतात. अर्थात, या जंगलातील साऱ्या झाडांची मुळे एकमेकांशी जाेडली गेलेली अाहेत. या नेटवर्कच्या माध्यमातून ही झाडे ३००० वर्षांपासून प्रत्येक प्रकारच्या संकटाचा सामना करीत अाहेत. हीच साहचर्याची खरी शक्ती अाहे. स्वातंत्र्यलढ्यातदेखील अापण एकमेकांसाेबत हाेताे तेव्हाच तर स्वातंत्र्य मिळाले. काेविड-१९ या संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याचा अर्थ असा की, शारीरिकदृष्ट्या साेबत नसणे. इंग्रजीत एक म्हण अाहे- ‘युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फाॅल.’ परंतु अाजची स्थिती नेमकी याविरुद्ध अाहे, अाज अापण विलग राहू शकलाे तरच समस्येची साेडवणूक करू शकताे. ‘साेशल डिस्टन्सिंग’ अमलात अाणण्याची गरज अाहे. त्यासाठी अापणास फिजिकली नव्हे, तर मेंटली युनायटेड हाेण्याची गरज अाहे. मानसिकदृष्ट्या एकीकृत हाेण्याचा अर्थ असा की, विलग राहूनदेखील अापले उद्दिष्ट एक असणे.


विशेष म्हणजे या अाजाराशी लढताना ज्या मुद्द्यांकडे अावर्जून लक्ष देणे गरजेचे अाहे ते अापल्या संस्कृतीत पूर्वीपासून अस्तित्वात अाहेत. उदाहरणार्थ, नमस्कार करणे अाणि काेपरापासून हात अाणि गुडघ्यापासून पाय स्वच्छ धुणे. अाज सारे जग या भारतीय प्रथेचा स्वीकार करीत अाहे. यापासून अापणही बाेध घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने अापल्या सरकारला त्यांनी सहकार्य केले, अापणही त्यांना केले पाहिजे. त्यांची सर्वात चांगली बाब म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान. अापल्या येथे नेमका याचा अभाव दिसताे, अापल्याकडे याचा पूर्णत: पालन हाेत नाही. अापण विचार करताे, मी एकटा बाहेर न पडल्यामुळे काय हाेणार अाहे? एकमेकांपासून शिकण्याची हीच तर संधी अाहे.


पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने जे पाऊल उचलले ते प्रशंसनीय अाहे. एक दिवस घरात बसून राहिल्याने मूळ प्रश्न कसा सुटेल, असा प्रश्नही विचारला जात हाेता. एक दिवस घरी बसून राहिल्याने अापण त्या परिस्थितीसाठी तयार झालाे, ज्यामुळे अापणास अनेक दिवस घरात बसून राहावे लागेल. अाता मुद्दा येताे घरात बसून कंटाळून जाण्याचा. तर लक्षात घ्या, यापूर्वी अापण सुटी मिळत नाही म्हणून परेशान हाेताे. एक दिवसाच्या सुटीसाठी कळवळायचाे. अाता जेव्हा अापणास सुटी मिळाली अाहे तर त्याचा उपयाेग कसा करायचा ते अापणास सुचत नाही.


या संकटकाळाकडे अापण संधी म्हणूनही पाहू शकताे. अापल्यावर जे लाेक अवलंबून अाहेत त्यांना मदत करण्याची ही संधी अाहे. दरराेजच्या शारीरिक धकाधकीच्या जीवनात मिळालेली शारीरिक अाणि मानसिक विश्रांतीची संधी म्हणून याकडे पाहू शकताे. या संधीचा फायदा घ्या, अापल्यातील सारा तणाव घालवा. याेग, व्यायाम याकडे लक्ष पुरवा, अाराेग्याकडे लक्ष द्या. नात्यांतील अापलेपण वाढवा. पती-पत्नी घरात एकत्र बसून एकमेकांच्या कामांचे अाकलन करू शकतात, जे दूर राहून शक्य हाेत नाही. अशा स्थितीत एकमेकांची प्रशंसा करून नव्याने चांगल्या अायुष्याची सुरुवात करता येऊ शकते. सकारात्मक बाबींना महत्त्व द्या. घरात अशी अनेक पुस्तके असतील, जी वाचण्यासाठी कधी वेळ मिळाला नसेल, ती अाता वाचता येतील. त्या नातेवाइकांशी संपर्क करा, ज्यांना कधी पुरेसा वेळ दिला नसेल. अध्यात्मासाठी अाणि स्वत:ला अधिक जाणून घेण्याची ही संधी अाहे. अशा क्षणांचा वापर स्वविश्लेषणासाठी करता येऊ शकताे. अापण ज्या विलक्षण झपाट्याने-वेगाने अायुष्य घालवत अाहाेत ते याेग्य अाहे का? यावर मंथन करू शकताे. कदाचित या परिस्थितीमुळे अापल्या अायुष्यातील गतीचे रिसेट बटण दाबण्याची संधी निर्माण झाली अाहे. जगभरात काम करीत असलेले कामगार लवकरच या समस्येतून बाहेर येतील. अापले अायुष्य अतिशय उत्तम प्रकारे घालवू शकताे का? या अनुषंगानेही विचार केला पाहिजे. तसेच या वातावरणाचा उपयाेग जीवनशैली बदलण्यासाठीदेखील केला पाहिजे. अखेरचा एक किस्सा सांगताे... एकदा अापल्या मित्रांसमवेत अाॅस्ट्रेलियास गेलाे, तेथील कर्कराेग पीडितांना भेटलाे. हा त्यांचा १६ वा रिलॅप्स हाेता. अाम्ही त्यांच्या कुटुंबीयांना भेटलाे तेव्हा ते म्हणाले, अामचे शेजारी, मित्रांनी एकत्र येऊन त्यांना प्रत्येक प्रकारची मदत केली. एकत्र येऊन प्रश्नाची साेडवणूक करण्याचे हेदेखील एक उत्तम उदाहरण ठरावे. हां, एकत्र येऊ, परंतु सुरक्षित अंतर राखून...

X