आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:"साकेत गोखले' हाजिर हो...!

दिप्ती राऊतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

"हू इज साकेत गोखले?' या आठवड्यात सर्च इंजिनवर अनेकांनी शोधलेला प्रश्न... काँग्रेसचा दलाल, राहूल गांधींचा चमचा, राष्ट्रदोही, हिंदू विरोधी या सौम्य शब्दांपासून सुरू होणाऱ्या आणि असंख्य असभ्य, हिंसक, अश्लिल विशेषणांचा धनी झालेला साकेत गोखले नेमका आहे तरी कोण याबाबत अनेकांना उत्सुकता वाटली. साकेत सध्या अँक्टीव्हीस्ट म्हणून काम करतोय. रुढार्थाने पूर्णवेळ कार्यकर्ता. आपली ओळख तो "ट्रान्सफरन्सी अँक्टीव्हीस्ट' आणि "ट्रान्सफरन्सी इन्व्हेस्टीगेटर' अशी करून देतो.

ओह, द टाईम व्हील कम अप

व्हेन द विंड्स व्हील स्टॉप

अँण्ड द ब्रीझ व्हील कॉज टू बी ब्रेदींग

लाईक द स्टीलनेस इन द विंड

बिफोर द हरिकेन् बिगीन्स

द आवर दँट द शीप कम्नस् इन...

२०१६ साली अमेरिकन गीतकार बॉब डीलनला साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले त्याचसुमारास त्याच्या शब्दांवर प्रेम करणारा एक भारतीय तरुण अनामिक अस्वस्थेने व्यथित होता. पत्रकार म्हणून एका इंग्रजी दैनिकात राजकारण,अर्थकारण आणि परराष्ट्र संंबंध यांचे वार्ताकन केलेल्या त्या तरुणाला देशातील बदलत्या राजकारणाने लोकशाही मूल्यांसमोर उभे केलेले आव्हान धोकादायक वाटत होते. भोवताली घोंगवणाऱ्या वादळात होडी धक्क्याला लावण्याची हीच ती वेळ असल्याचं त्याचं अस्वस्थ मन सांगत होतं. मनातलं वादळ शांत बसून देत नव्हतं. परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरीचा त्याने राजीनामा दिला आणि भारतात परतला तो "आवर डेमॉक्रँसी'चे स्वप्न घेऊनच.

२२ जुलै रोजी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या पूजनाबाबत साकेत गोखलेची एक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झाली, २३ जुलैला महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम भाजपच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आल्याच्या त्याच्या आरोपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली, २४ जुलैला ठाण्यातील त्याच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, त्याच्या फोनवर धमक्यांचा पाऊस पडला आणि साकेत गोखले हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले.

"हू इज साकेत गोखले?' या आठवड्यात सर्च इंजिनवर अनेकांनी शोधलेला प्रश्न.

काँग्रेसचा दलाल, राहूल गांधींचा चमचा, राष्ट्रदोही, हिंदू विरोधी या सौम्य शब्दांपासून सुरू होणाऱ्या आणि असंख्य असभ्य, हिंसक, अश्लिल विशेषणांचा धनी झालेला साकेत गोखले नेमका आहे तरी कोण याबाबत अनेकांना उत्सुकता वाटली.

"तुम्ही बॉब डीलनवर प्रेम करत असाल तर माझ्याशी तुमचे सूर बाय डीफॉल्ट जुळतीलच', साकेतच्या ट्विटल हँण्डलवरील हे वाक्य बॉबच्या संगीतावरचं प्रेम आणि जग बदलण्याच्या स्वप्नाची प्रेरणा अधोरेखित करतं. मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये शिकत असताना प्रोफेसर सुधाकर सोलोमोनराज यांनी साकेतची बॉबच्या गीतांशी भेट घालून दिली. "प्रत्येकाच्या आयुष्यात कॉलेजमधले दिवस भारावलेले असतात, आदर्शवत असतात तसेच माझेही होते. बॉबच्या गीतांमधून झपाटून जाऊन मी देखील जग बदलण्याच्या स्वप्नानं पछाडून गेलो आणि पत्रकार होण्याचं ठरवलं,' चेहऱ्यावरील मिश्कील भाव अधिकच गडद करीत साकेत सांगत होता. "हार्ड रेन इज गोईंग टू फॉल' हे बॉबचे त्याच्या कॉलेजच्या दिवसातील मोस्ट फेव्हरेट गाणे. जग बदलण्याच्या प्रेरणेने पत्रकारितेत आलेल्या साकेतने इंग्रजी दैनिकासाठी वार्तांकनासाठी सुरुवात केली. राजकारण, अर्थकारण, परराष्ट्र संबंध हे बीट कव्हर करीत असतानाच एक टप्पा आला जिथे पत्रकारितेच्या मर्यादाही लक्षात येऊ लागल्या. "पत्रकारिता करताना देशातील झपाट्यानं बदलणारं राजकारण मी जवळून बघत होतो. एकीकडे भाजपची विचारधारा देशाच्या लोकशाही मूल्यांना नख लावण्याचे काम करतेय हे पाहून मी अस्वस्थ होत होतो आणि दुसरीकडे पत्रकारिता, मीडिया यांचीही रुपं बदलत होती. सोशल मीडियावरील ट्रोलिंग वाढत होतं, फेक न्यूजचं प्रमाण वाढत चाललं होतं. अनेक वाहिन्या सरकारी प्रचार यंंत्रणा असल्यागत सत्तेतील पक्षाची प्रवक्ती बनली होती, विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यातच आपली पत्रकारिता सार्थकी लावत होती. दुसरीकडे शोध पत्रकारितेला मर्यादा आलेल्या दिसत होत्या. पत्रकार शोधून, खणून रिपोर्टींग करतात, पण त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. तो मुद्दा तिथेच संपून जात होता, पुढे जात नव्हता. मी माझे काम त्याच्या पलीकडे बघत होतो,' साकेत सांगतो.

२०१४ चं वर्ष या वळणावर निर्णायक ठरलं. त्याच्या मते, 'लोकशाही राष्ट्रात सरकारे येत असतात आणि जात असतात. पण २०१४ साली ज्या प्रकारे कँम्पेन केले गेले, धार्मिक भावना उसकावणारी विधाने झाली, विरोधकांवर खोटेनाटे आरोप झाले ते पाहून लक्षात येत होतं की हा फक्त एका सरकारमध्ये होणारा बदल नाही तर कोणतातरी मोठा अजेंडा सरकारच्या आणि सत्तेच्या आडून रेटला जात आहे. भाजप हा संघ परिवाराचा एक घटक आहे. देशात हिंदूंशिवाय अन्य धर्माच्या लोकांना राहण्याचा हक्क नाही ही भूमिका संंघ परिवाराची १९२५ पासूनची भूमिका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या लोकशाही विचारधारेतून भारतीय राज्यघटना उभी केली, त्या लोकशाही मूल्याना धोका निर्माण करणारे ते स्थीत्यंतर होते. ' परराष्ट्र संबंध कव्हर करताना साकेतला जाणवले की अन्य देशांच्या निवडणुकांमध्येही पैसे खर्च होतात, आरोप प्रत्यारोप होतात, मात्र भारतात ज्या फसवेगिरीतून सत्तांतर झाले ते धक्कादायक होते.

या टप्प्यावर साकेतने पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचा निर्णय घेतला. या निर्णायक टप्प्यावरही साकेतला बॉबच्याच "व्हेन द शीप कमस् इन..' या गीतातील शब्दांनी प्रेरणा दिली. एक दिवस वादळ बदलतं, जहाज किनाऱ्याला लागतं त्या दिवशी क्रांती होते या शब्दांमधून प्रेरणा घेत त्यानं नोकरी सोडली आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने "आवर डेमॉक्रॉसी डॉट इन' या डिजिटल प्लँटफॉर्मच्या माध्यमातून स्वत:चं स्वतंत्र काम सुरू केलं. साकेत सध्या अँक्टीव्हीस्ट म्हणून काम करतोय. रुढार्थाने पूर्णवेळ कार्यकर्ता. आणि त्यासाठी तो माहिती अधिकार कायदा, जनहीत याचिका, संशोधन ही साधने वापरतो आहे. पण त्याची ओळख तो "सोशल अँक्टीव्हीस्ट', "पॉलिटीकल अँक्टीव्हीस्ट' किंवा अगदी "आरटीआय अँक्टीव्हीस्ट' अशी करून देत नाही तर "ट्रान्सफरन्सी अँक्टीव्हीस्ट' आणि "ट्रान्सफरन्सी इन्व्हेस्टीगेटर' अशी करून देतो. याच भूमिकेतून तो भाजप सरकारच्या कारभारातील अ -पारदर्शकतेचा भांडाफोड करीत आहे. माहिती अधिकाराखालील अर्ज, जनहितार्थ पत्र, पत्रकार म्हणून असलेले स्रोत आणि शोध पत्रकारितेची कौशल्य ही त्याची साधने आहेत. आतापर्यंत त्याने पावणे दोनशेहून अधिक अर्ज माहिती अधिकाराखाली केले आहेत.

२०१७ साली गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालमपूरच्या जाहीर सभेत केलेल्या एका वक्तव्यातील सत्यता साकेतने माहिती अधिकाराच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला. गुजरात निवडणुकीसाठी, माजी पंतप्रधान डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी आणि लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानसोबत गुप्त मिटींग घेऊन कट केल्याचे विधान पंतप्रधान मोदींनी त्या सभेत केले होते. माहिती अधिकाराखाली साकेतने याबाबतचे आधार केंद्र सरकारकडे मागितले असता, त्या वक्तव्यातील फोलपणा पुढे आला. साकेतची ती पहिली यशस्वी लढाई होती. तो सांगतो, "आधी पंतप्रधान कार्यालयाने या अर्जाचे मुदतीत उत्तरच दिले नाही. मग मी अपीलात गेलो. अखेरीस पंतप्रधान कार्यालयास मान्य करावे लागले की यासाठी कोणताही ठोस आधार नाही, पंतप्रधानांचे ते विधान त्यांच्या औपचारिक सुत्रांवर आधारलेले होते. हा मुद्दा संसदेतही गाजला. अखेरीस तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना सरकारच्या वतीने डॉ सिंग यांची माफी मागावी लागली.'

दुसरी एक उल्लेखनीय लढाई ठरली ती शाहीनबाग आंदोलनाच्या वेळी दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या दुटप्पी भूमिकेची. त्यावेळीही माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मिळवून साकेतने दाखवून दिले की दिल्ली पोलिसांनीच रस्त्यांचे पुनर्नियोजन केले होते आणि आंदोलन दडपण्यासाठी ट्रँफीक जॅमच्या नावाने आक्रोश करीत होते. सध्या पीएम केअर फंडातून झालेल्या व्हेंटीलेटर्स खरेदीबाबतचे गैरव्यवहार तो उघडकीस आणतो आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा देखावा उभा करून सत्तेवर आलेले भाजप सरकारच्या कारभारात पारदर्शकतेस पूर्णपणे तिलांजली देण्यात आल्याकडे तो लक्ष वेधतो. परिणामी माहिती अधिकार कायद्याला निष्प्रभ करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना विरोध करतो. याच भीतीतून सरकारने स्वायत्त अधिकार असलेल्या माहिती आयुक्तांच्या नेमणुका, बदल्या आणि वेतन आपल्या पंखांखाली घेण्याचा बदल केल्याचे वास्तव अधोरेखित करतो.

"प्रॉब्लेम असा आहे की हे सरकार आल्यापासून आरटीआयला डायल्यूट करण्याचा प्रयत्न करीत आहे. माहिती अधिकाराखाली जनतेने विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरे देत नाहीत, माहिती टाळण्याचा प्रयत्न होतो. पीएम केअर बाबत माझ्यासह अनेकांचे माहिती अर्ज आहेत, त्यात पंतप्रधानांना माहिती अधिकार कायदा लागू नसल्याचे उत्तर देतात, अपीलांची सुनावणी होत नाही ', ही साकेतची तक्रार आहे.

सध्या त्याच्या पुढील प्रश्न आहे तो माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दाबण्यासाठी सरकारतर्फे सुरू असलेल्या दडपशाहीचा. "परवा माझ्या घरी जो हल्ला झाला, त्या लोकांना माझा पत्ता मिळाला कसा यावर मी लढतो आहे. ही माहिती पब्लिकली कुठेच उपलब्ध नाही. अधिक चौकशी केल्यावर मला कळलं की केंद्र सरकारच्या माहिती जनसंपर्क मंंत्रालयाने सध्या आरटीआय कार्यकर्त्यांचे अर्ज त्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर्ससह जाहीर करण्याची सुरुवात केली आहे. सरळ सरळ हे राईट टू प्रायव्हसीचे उल्लंघन आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांना घाबरवण्याचं काम आहे '

या सर्व लढाया भाजप सरकारविरोधात असल्याने साकेतवर होणारा पहिला आरोप म्हणजे तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, राहूल गांधींच्या जवळचा आहे. यावर साकेत म्हणतो, "लोकशाहीत आपण मतदान करतो तेव्हा आपण एका कोणत्यातरी पक्षाची बाजू घेतलेली असते. त्या पक्षाची विचारधारा, प्राधान्यक्रम आपल्याला मान्य असतात. मी सुरुवातीपासून काँग्रेसपक्षाची विचारसरणी मानणारा आहे. त्याही पुढे जाऊन सांगतो, राहूल गांधींचं नेतृत्व, त्यांची कार्यपद्धती मी जवळून पाहिले आहे, त्यांचा मी फॅन आहे. पण मी कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाही की कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही. '

या वाटेवर तो "आवर डेमॉक्रँसी' च्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सामान्य लोकांबद्दल तो कृतज्ञ आहे. तो म्हणतो, "मला कोणत्याही पक्षाकडून पैसे मिळत नाहीत, कोणत्याही संस्थेकडून पैसे मिळत नाहीत. पूर्णवेळ नोकरी सोडून यात उतरण्याचा मी निर्णय घेतला होता. पुन्हा भारत सोडून करिअर करण्याचा पर्याय नाकारून मी यात उतरलो. महिन्याअखेरीस मलाही बिले भरावी लागत आहेत, माझे उत्पन्नाचे साधन नाही. असावेळी हुकूमशाहीविरोधात आणि लोकशाहीच्या बाजुने कळवळा असलेल्या अनेक सामान्य लोकांनी मला मदत केली, करीत आहेत. कुणी शंभर रुपये कॉन्ट्रीब्युशन देतात, कुणी दहा हजार. त्यांच्या पाठबळावर, प्रोत्साहनामुळे मी उभा आहे. माझी लढाई त्यांना त्यांना पटते म्हणून ते माझ्या मागे उभे आहेत. अन्यथा मला काम करणे अशक्य. ' तेच सारे साकेतच्या 'अवर डेमॉक्रेसी'चे आणि देशाच्याही लोकशाहीचे खरे शिलेदार आहेत.

dipti.raut@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...