आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रेलख:एक नवी ‘कसोटी’

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये कोरोनाच्या प्रकोपानंतर सुरू होत असलेाला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना अनेकार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांचा अपवाद वगळता क्रिकेटमध्ये एवढा प्रदीर्घ खंड पडण्याची ही पहिलीच वेळ होती. आता दोन संघात व्दंद्व सुरू झाले असले, तरी ते मैदानावर प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रेक्षक नसतील. अशा सुन्यासुन्या मैदानात खेळण्याबरोबरच नियमांत करण्यात आलेले बदल हे सुद्धा मोठे आव्हान असेल. चेंडूची चकाकी कायम राखण्यासाठी खेळाडूंना लाळेचा वापर करता येणार नाही, विकेट पडल्यानंतर एकमेकांना अलिंगन देता येणार नाही, आपले स्वेटर, टोपी, गॉगल पंचांंकडे सांभाळायला देता येणार नाही वगैरे. वर्षानुवर्षे अंगवळणी पडलेल्या अशा सवयी एकाएकी मोडीत काढणे जडच जाणार आहे. एवढे असूनही क्रिकेटचा पुनश्च हरीओम होत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण, या बहुप्रतीक्षित सामन्याची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांच्या उत्साहावर पहिल्या सत्रात पावसाने पाणी ओतले. मात्र, क्रिकेट शौकिनांची उत्कंठा आणखी वाढली असणार, यात शंका नाही. क्रिकेट इंग्लंडमध्येच जन्माला आले असले आणि बाल्यावस्थेत ऑस्ट्रे्लिया, विंडीज वगैरेंनी त्याला अंगाखांद्यावर खेळवले असले, तरी अलीकडच्या काळात त्याचे भरण-पोषण होत आहे ते भारतीय उपखंडात. भारत तर क्रिकेटवेड्यांचा देश. त्यामुळे अन्य कुणापेक्षाही क्रिकेट सामने पुन्हा सुरू होणे हा आपल्यासाठी अधिक जिव्हाळ्याचा विषय. आता खेळातल्या आनंदा एवढेच त्यातले अर्थकारणही महत्त्वाचे ठरले आहे. आयपीएल हे त्याचे उत्तम उदाहरण. त्या माध्यमातून अगदी नवखे खेळाडूसुद्धा करिअरच्या सुरुवातीलाच कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असतात. अर्थात, मुद्दा केवळ खेळाडूंना मिळणाऱ्या पैशाचा नाही, तर क्रिकेट ही एक इंडस्ट्रीच बनली आहे. मैदान आणि खेळपट्टी तयार करणाऱ्यांपासून नामवंत प्रशिक्षकांपर्यंत आणि खेळाचे साहित्य बनविणाऱ्यांपासून टीव्हीच्या थेट प्रक्षेपणातील समालोचक ते तंत्रज्ञांपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेकांना ही इंडस्ट्री लाभदायी ठरते. म्हणूनच ‘न्यूू नॉर्मल’चा अंगीकार करत सुरु झालेल्या कसोटी क्रिकेट पाठोपाठ आता वन डे आणि टी व्टेंटीतील चौकर, षटकारांच्या आतषबाजीलाही पूर्वीच्याच जोशात प्रारंभ होईल, अशी आशा करूयात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser