आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:कमला : ऐतिहासिक निवड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाने उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड जाहीर केली. डेमोक्रॅटने बराक ओबामा यांच्या रूपाने पहिला श्वेतवर्णीय अध्यक्ष अमेरिकेला दिला. त्या पार्श्वभूमीवर कमला यांची निवड अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. उपाध्यक्षाची निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या श्वेतवर्णीय व भारतीय वंशाच्या महिला आहेत. त्या जन्माने अमेरिकेतल्या. त्यांच्या डॉक्टर आई श्यामला गोपालन या चेन्नईच्या. वडील जमैकाचे. त्या स्वत: कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्राच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीधर. राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी त्यांची निवड करताच अनेकांना धक्का बसला. अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा पक्षांतर्गत दावा करताना कमला यांनी जो यांच्यावर टीका केली होती. बिडेन त्यांना एवढे ज्येष्ठ आहेत, की जेव्हा ते पहिल्यांदा सिनेटचे सदस्य झाले तेव्हा कमला फक्त आठ वर्षांच्या हाेत्या. सिनेटचे सदस्य म्हणून कमलांचा अनुभव चार वर्षांहून कमी आहे. तरीही नऊ महिला दावेदारांच्या यादीतून बिडेन यांनी कमला यांची निवड केली. यामागे दोन कारणे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सध्या काळे विरुद्ध गोरे असा वर्णवादी संघर्ष पेटला आहे. पोलिसी अत्याचारात जॉर्ज फ्लॉईड या तरुणाचा नाहक बळी गेल्यानंतर ट्रम्प विरोधातील संघर्षात कमला आघाडीवर होत्या. अमेरिकेतील अश्वेत लोकांची, शिवाय महिलांची मते डेमोक्रॅट पक्षाच्या मागे उभी राहावी, हा हेतू स्पष्ट आहे. शिवाय, अमेरिकेतील काही राज्यांत भारतीयांची मते मोठ्या संख्येने आहेत. यांच्या निवडीवर ट्रम्प यांनी जळफळाट व्यक्त केला. कमला या ओंगळ, भयंकर, धाेकादायक, कमी क्षमतेच्या आहेत, अशी निर्भर्त्सना त्यांनी केली. डेमोक्रॅट व रिपब्लिकन यांच्या उमेदवारात कमला या सर्वात कमी म्हणजे ५५ वर्षांच्या. बिडेन ७४, तर ट्रम्प ७७ वर्षांचे. कमला यांच्यासाठी एवढी जबरदस्त संधी व आव्हान आहे, की भविष्यात त्या राष्ट्राध्यपदासाठी डेमोक्रॅट पक्षाच्या दावेदार ठरू शकतात. पण बिडेन व कमला जिंकतील का? डेमोक्रॅट पक्षाने आजवर भारताबाबत फारशी अनुकूलता दाखवलेली नाही. त्यांची निवड अमेरिकेतल्या व देशातल्या भारतीयांना सुखावणारी असली तरी भारतासाठी हिताचे काय? याचा विचार करायला हवा.

बातम्या आणखी आहेत...