अर्थव्यवस्था : माेठी आर्थिक सुधारणाच पुन्हा उभारी देऊ शकेल

  • काेविड-19 कानफटीवर लावलेल्या बंदुकीसारखा, भीतीने खिसा रिकामा हाेताे

दिव्य मराठी

Mar 26,2020 10:31:00 AM IST

चेतन भगत


हा लेख लिहिता क्षणी भारत लाॅकडाऊन अाहे. रस्ते निर्मनुष्य अाणि रेल्वे-विमाने ठप्प अाहेत. शाळा-कार्यालये अाणि कारखाने बंद अाहेत. अाम्ही अशा एका महामारीशी संघर्ष करीत अाहाेत, ज्यास पराभूत करणे सर्वाधिक धनाढ्य अाणि विकसित देशांनादेखील अशक्यप्राय ठरले. हा लाॅकडाऊन याेग्यच अाहे. वेगाने फैलावणाऱ्या काेविड-१९ या विषाणूला चीनने केवळ लाॅकडाऊनच्या माध्यमातून पायबंद घातला. युराेप अाणि अमेरिकेतील महानगरांतदेखील या विषाणूचा प्रसार राेखण्यासाठी लाॅकडाऊनचा पर्याय अनुकरणीय ठरला. लाेक धास्तावलेले अाहेत. या क्षणी भावनेवर भीतीचे सावट गडद हाेते अाहे. अापण या विषाणूला अटकाव करू शकत नाहीत. अापल्याकडे अद्याप काेणतीही लस नाही. अापाेअापच या विषाणूची गती मंदावेल, उष्ण वातावरण असेल तर काही मर्यादेपर्यंत त्यास अापाेअाप अाळा बसू शकताे. काही अाैषधी तूर्तास वापरता येतील, एखादी लस विकसित हाेऊ शकते. परंतु हे केव्हा अाणि कसे शक्य हाेईल हे काेणीही सांगू शकत नाही. एवढ्या संभ्रमावस्थेमुळे सामान्य व्यक्तीच्या प्रतिक्रियेत भीतीचे सावट तर दिसणारच. ही भीती घालवण्यासाठी अाम्ही ती प्रत्येक गाेष्ट केली पाहिजे, जी करू शकताे. अखेर जीवनापेक्षा अनमाेल असे काय अाहे? अापल्याकडे एक म्हण अाहे, ‘जान बची ताे लाखाें पाए.’ अाज अापणास जीव वाचवण्यासाठी लाखाे, कराेडाे, अब्जावधी रुपयांची किमत माेजावी लागत अाहे. जेव्हा अापणास भीती संचालित करीत असते तेव्हा अाम्ही किमतीविषयी बाेलत नाहीत. एखादी व्यक्ती भाजीवाल्याकडे १० रुपयांसाठी घासाघीस करू शकते, परंतु कानफटीवर बंदूक राेखली तर वाॅलेट रिकामे करायला वेळ लावणार नाही. काेराेना अापल्यासाेबत हेच करीत अाहे. भारताच्या कानफटीवर बंदूक ताणून सारे खिसे रिकामे करीत अाहे. जाेपर्यंत ही बंदूक लावलेली अाहे ताेपर्यंत त्याचे पालन करावेच लागणार. चीन अाणि काेरियासारखे देश ही बंदूक बाजूला सारण्यात यशस्वी ठरले अाणि अापण असे करू शकताे अशी अपेक्षा जरूर अाहे. परंतु तूर्त रिकामे खिसे कशा पद्धतीने भरता येतील याविषयी विचार केला पाहिजे. ताे अर्थकारण राेखताे. काही क्षेत्रावर त्याचा गंभीर परिणाम झाला अाहे. या उद्याेगातील कामगारांना कंपनी कार्यमुक्त करेल. अनेक लाेक कर्जफेड करू शकणार नाहीत, परिणामी बँकांचा एनपीए वाढेल. बँका कर्ज देण्यास धजावणार नाहीत अाणि साऱ्या क्षेत्रांना त्याचा फटका बसेल. अनेक कंपन्यांना नुकसान हाेईल, अनेकांच्या नाेकऱ्या जातील, मागणी विलक्षण घटेल अाणि महामंदीचा कहर जाेर धरेल. उत्पन्न अाणि महसूल घटल्याने सरकारी कर भरणा कमी हाेईल अाणि उद्दिष्टपूर्ती हाेणार नाही. अामच्या कानफटीवर ही बंदूक किती दिवस ताणून राहणार अाहे त्यावर ही मंदी किती दिवस राहणार हे अवलंबून असेल. लाॅकडाऊनच्या तीन अाठवड्यांनंतर स्थिती सामान्य हाेऊ शकली तर अापण सारे लवकर सावरू शकताे, परंतु दाेन महिन्यांपेक्षा अधिक काळ लागला तर भारताला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक वर्षे झगडावे लागेल. अाशा करूया की, असे काही घडणार नाही. अमेरिका अाणि युराेप असा लाॅकडाऊन सहन करू शकतात, परंतु भारत गरीब देश अाहे. भारतीयांना त्यासाठी सज्ज राहावे लागेल. या स्थितीत अापण काय करू शकताे याचा विचार तूर्त केला पाहिजे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक दुर्बल वर्ग अाणि शटडाऊनचा फटका बसलेल्या सर्वाधिक लाेकांना थेट वित्तीय मदत पुरवली पाहिजे. राेजंदारी वर्गाला सुरक्षित करावे लागेल, उद्याेगांना मदत पुरवावी लागेल, जेणेकरून दिवाळखाेरीचे प्रमाण कमी हाेईल. हे साेपे नसले तरी तितकेसे कठीण नक्कीच नाही. यामुळे महागाई वाढू शकते. सरकार पैसा छापते, परंतु ताे काेणाला तरी द्यायचा असतो. अर्थसंकल्पानंतर अर्थसंकल्प अाणि सरकारनंतर सरकार अाले, परंतु भारतात मूलभूत विकास किंवा सुधारणा झाली नाही. अापल्याकडे अन्य पर्याय नाहीत त्यामुळे काेराेनाचे हे संकट अापणास माेठ्या सुधारणावादाकडे घेऊन जाऊ शकते. देशात अार्थिक संकटात असताना १९९१ मध्ये काही माेठ्या सुधारणांचा निर्णय घेतला गेला. २०२० मध्ये काेराेनाच्या निमित्ताने त्याची पुनरावृत्ती व्हावी, ज्याची खरी गरज अाहे. काेराेनामुळे झालेला हा लाभ ठरू शकताे.


X