आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:येस, नेशन वॉन्ट्स टू नो..

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशाला घोटाळे नवे नाहीत. मात्र, मुंबई पोलिसांनी गुरुवारी उघड केलेला टीआरपी घोटाळा सर्वांना अचंबित करणारा आहे. जगात काय चाललंय, ते लोकांना सांगणाऱ्या माध्यमांच्या जगात काय चाललं आहे, याच्या गौप्यस्फोटामुळे वृत्तवाहिन्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. दोन स्थानिक मराठी वाहिन्यांसह राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिक टीव्हीचे नाव यामध्ये समोर आले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी रिपब्लिक टीव्हीने गैरमार्गांचा अवलंब करत पैशांचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे. टीआरपी अर्थात ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट’ हा विषय तांत्रिक असल्याने त्यातील गुंतागुंत समजून घ्यायला हवी. वाहिन्यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप म्हणजे टीआरपी. त्यासाठी बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) ही संस्था काही विशिष्ट घरांमधील सेट टॉप बॉक्सना टॅम बॉक्स जोडते. त्या टीव्हीवर कोणती वाहिनी पाहिली जात आहे, त्याचे हे उपकरण रेकॉर्डिंग करते. ते कुठे जोडले आहे, हे गोपनीय असते. त्यावर नोंद होणाऱ्या नमुन्यांच्या आधारे वाहिन्यांचा टीआरपी काढला जातो. साहजिकच जास्त रेटिंग असलेल्याला जाहिरातदार पसंती देतात. यावर डोळा ठेवूनच हा ‘टीआरपी घोटाळा’ झाल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘रिपब्लिक टीव्ही’च्या प्रवर्तकांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

स्वत: आततायीपणा करणाऱ्या या वाहिनीच्या मंडळींनी इतरांच्या पत्रकारितेला ‘चाय-बिस्कुटवाली’ असे हिणवल्यामुळे मध्यंतरी वाद झाला होता. कुणाच्याही चारित्र्यहननाचा परवाना मिळाल्याच्या आविर्भावात ‘नेशन वॉन्ट्स टू नो’ असे ओरडून विचारणाऱ्या चॅनलचे ‘पडद्या’मागे काय चालले आहे, तेही देशाला कळायला हवे. स्वत:वर वेळ येताच ‘हा आपल्याला अडकवण्याचा डाव आहे’, असे सांगत अजून आरोप सिद्ध व्हायचे असल्याचा पवित्रा ‘रिपब्लिक’ने घेतला आहे. मग, ज्या सुशांतप्रकरणी या चॅनलने एवढा थयथयाट केला, त्यातील संशयित रिया चक्रवर्तीचे म्हणणे तरी काय वेगळे होते? इथे मुद्दा एखाद्या व्यक्तीचा नसून, घडल्या प्रकाराने वृत्तवाहिन्यांची उरलीसुरली विश्वासार्हता धुळीस मिळत असल्याचा आहे. आणि तीच सर्वात गंभीर बाब आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser