आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रसिक स्पेशल:मला श्वास घेता येत नाहीये...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला श्वास घेता येत नाहीये...हे वाक्य सध्या अमेरिकेत आणि जगात गाजतंय.

संकलन : मिनाज लाटकर

मला श्वास घेता येत नाहीये...हे वाक्य सध्या अमेरिकेत आणि जगात गाजतंय. हे वाक्य आहे अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय माणसाचं , ज्याचा जीव एका गोऱ्या पोलिसामुळे गेला. ही ठिणगी पडताच आता देशभरात वणव्यासारख्या दंगली पसरल्या आहेत. मृत जॉर्जचे कुटुंबिय आणि ज्या गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने जॉर्जला ठार केले त्याची पत्नी या सबंध घटनेवर काय म्हणतात...?

त्याच्यासोबतची असलेली माझी ओळख पुसायची आहे...

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्युमुळे मला मोठा धक्का बसलायं... आणि माझ्या पतीकडूनच हे कृत्य घडल्यामुळे माझी मानसिक स्थिती पार बिघडली आहे. अशा माणसासोबतची असलेली माझी ओळख मला पूर्णपणे पुसून टाकायची आहे आणि म्हणूनच मी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे... हे उद्गार आहेत केली चाऊविनचे.

केली ही ज्या श्वेतवर्णीय पोलिस अधिकारी डेरेक चाऊविनची पत्नी. तोच डेरेक ज्याने कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या गळ्यावर नऊ मिनिटांपर्यंत गुडघा दाबून ठार मारलं.  मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर हतबल झालेली केली म्हणते, मी जॉर्ज फ्लॉईडच्या कुटुंबीयासोबत सदैव राहीन. फ्लॉईडच्या मृत्युमुळे मला मोठा धक्का बसलायं.

डेरेक चाऊविन आणि केली यांच्या विवाहाला दहा वर्ष पूर्ण झाली असून केलीने संयुक्त अमेरिकेने २०१८ साली आयोजित केलेल्या सौंदर्यस्पर्धेत "मिसेस मिनेसोटा'चा किताब जिंकला होता. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतील बोलताना ती म्हणाली की,  या घडीला माझी मानसिक स्थिती चांगली नसून माझ्या कुटुंबीयांना सध्या संरक्षण मिळावे इतकीच माझी मागणी आहे. मी एका संवेदनशील कुटुंबात वाढली असून १९७४ साली सुरु असलेल्या गृहयुद्धाच्यावेळी माझा जन्म झाला आहे. माझे कुटुंबीय अनेक वर्ष शरणार्थीचे आयुष्य जगले आहेत. मला इंग्लिशही बोलता येत नव्हते, माझे पहिले लग्न हे वयाच्या १७ व्या वर्षी झालं होतं. मला दोन मुलं आहेत. दहा वर्षांच्या संसारानंतर मी घटस्फोट घेतला आणि ती मिनेसोटा इथं रहायला आले. तिथचं माझी ओळख डेरेकशी झाली. डेरेन हा मला संवेदनशील आणि सज्जन पुरुष वाटायचा,  पण आज मला पश्चाताप होतोय.

- केली चाऊविन (दोषी डेरेक चाऊवनची पत्नी)

तो एक आदर्श बाप होता...

"जॉर्ज फ्लॉईड श्वास कोंडला गेल्यामुळे तडफडतोय' हे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दृष्य अशी जॉर्जची ओळख न राहता तो एक उत्तम माणूस आणि आदर्श पिता होता ही ओळख पुढे राहायला हवी, अशी प्रतिक्रिया जॉर्जची पत्नी रॉक्सीने व्यक्त केली आहे. आमच्या सारख्या सामान्य कुटुंबात पित्याचे महत्व वेगळं असतं. माझ्या मुलांना मोठं होताना पाहणं, त्यांच शिक्षण पूर्ण होताना बघणं, हीच स्वप्नं घेऊन आम्ही जगत असतो. आता माझ्या मुलांच्या या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांचे वडीलच राहीले नाहीत. आमच्या आयुष्यातील ही पोकळी कुणीच भरुन काढू शकत नाही. आम्ही रस्त्यावर नागरिकांचा राग पाहिला, हिंसाही पाहिली. आम्ही एक सुंदर जगही अनुभवलयं. आम्ही लोकांना भूमिका घेऊन लढतानाही पाहिलं आहे. पण सध्या आम्हाला जगाचं खरं रुप बघायचं आहे, आणि माझ्या मुलांनाही ते जग मला दाखवायचं आहे.  

- रॉक्सी (मृत जॉर्ज फ्लॉईडची पत्नी)

जॉर्जला कधीही  विसरु नका...

जॉर्ज फ्लॉईडला तुम्ही कधीच विसरु नका असे आवाहन  जॉर्जचा भाऊ टेरेन्स फ्लॉईडने  केले आहे. जॉर्जच्या मृत्यूनंतर टेरेन्सचेे भाषण शिकागोच्या एवेन्यू साऊथ मिनियापोलिस साइटवर आयोजित करण्यात आलं होतं. तिथे टेरेन्सने आंदोलनकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याचे अपील केले. माझ्या भावाच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरले आहात.मात्र तुम्ही जे काही करत आहात याचा तुम्हाला अंदाज नाहीये. हिंसेने कधीच प्रश्न सुटत नाहीत. कोणत्याच घटनेचे उत्तर हे हिंसेतून मिळतं नाही. मी तुम्हाला शांततेने विरोध करण्याचे अपील करतो. तुमच्या अशा प्रतिक्रियेने माझा भाऊ परत येणार नाहीये. आमचे कुटुंबीय हे अहिंसावादी आहेत आणि ईश्वरावर आमची अपार श्रद्धा आहे. परंतू आमच्या आवाजाला कोणतीही स्पेस नाही आणि डोकी गहाण ठेवून आम्ही मतदान करतो असा इथल्या व्यवसथेचा समज असेल तर तो चुकीचा आहे. माझी एकच विनंती आहे की जॉर्जचे नाव नेहमीच तुमच्या मनात जिंवत राहिले पाहिजे.

- टेरेन्स फ्लॉइड (मृत जॉर्जचा भाऊ)

0