आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षा:हिंदी महासागरात ताकद वाढवून भारताने चीनला उत्तर द्यावे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियंत्रण रेषेवरील तणाव हा उत्तर सीमेवर भारताला गंुतवून ठेवण्याच्या ड्रॅगनच्या मुत्सद्देगिरीचाच भाग

भारत आणि चीनमध्ये सीमेवर नुकतीच धक्काबुक्कीच्या दोन घटना घडल्या. यातील एक उत्तर सिक्कीम आणि एक लडाखमध्ये झाली. पाच भारतीय आणि साच चिनी जवान यात जखमी झाले, परंतु फार गंभीर काही झाले नाही. अशाच घटना तीन वर्षांपूर्वी डोकलाम आणि पूर्व लडाखमध्ये झाल्या होत्या, त्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांत धक्काबुक्की झाली होती. अशा प्रकारच्या नियमित धक्काबुक्कीमुळे जनतेत युद्धाबाबत अंदाज बांधणे सुरू होते. दोन्ही दोशांचे नेते अनौपचारिक पद्धतीने भेटतात आणि त्यांच्या सैन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर धक्काबुक्की होचते तेव्हा त्याला अनेक जटिल पैलू असतात. सीमा निर्धारित करण्यावरून भारत आणि चीनमध्ये गंभीर मतभेद आहेत. शांतता कायम ठेवण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, पण नियंत्रण रेषा निश्चित करण्यावर सहमती झाली नाही. नियंत्रण रेषेबाबत भ्रम कायम आहे आणि वादही सुरूच आहे. दरम्यान, १९६७ आणि १९८७ मध्ये अभूतपूर्व आणि मोठ्या प्रमाणावर यात अडथळे निर्माण झाले, तरीही २००५ पर्यंत दीर्घ काळ दोन्ही देशांत कूटनीतिक प्रयत्न सुरू असल्याने नियंत्रण रेषेवर सामान्यत: कोणतीही आक्रमकता दिसली नाही. 

या काळात भारताच्या बाजूने अतिशय सतर्कता दिसली आणि यामुळेच तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हा सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले. उत्तर सीमेवर आणखी चांगली तयारी करण्यासाठी अभ्यास गट बनवून सीमा क्षेत्रात ३३४६ किमी रस्ता तयार करण्यासाठी सामग्रीची जुळवाजुळव करून याचे उत्तर देण्यात आले. २००५ नंतर सातत्याने गस्त वाढवल्यामुळेही नियंत्रण रेषेवर वादाचे प्रसंग वाढले. दरवर्षी उन्हाळ्यात दोन्हीकडून गस्तीत वाढ आणि नियंत्रण रेषेबाबत आपापल्या धारणांवरून दावे-प्रतिदावे होतात. दरम्यान, चीनने नियंत्रण रेषेला नकाशावर छापण्याबाबत चर्चेचा इन्कार केला आहे.

हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी भू-राजनीतिक पैलू आणि अलीकडील इतिहासाचे विश्लेषण समजून घेणे आवश्यक आहे. आशिया आणि जगात महाशक्ती म्हणून उदयाला येण्यामध्ये भारत चीनचा प्रतिस्पर्धी आणि चिंतेचा विषय आहे. हिंद महासागरातून जाणाऱ्या उत्तर-पश्चिम समुद्र नियंत्रण रेषेवर भारताच्या भौगोलिक वाढीमुळे खासकरून चीन चिंतित आहे. समुद्री शब्दकोशानुसार आपली समुद्री बंदरे आणि शेजारी देशांकडील अशाच सुविधांमुळे भारत समुद्री नियंत्रण रेषेवर सहजपणे प्रभुत्व मिळवतो. चीनची तेलाची आणि त्याच्या बदल्यात देण्याच्या सामानाने भरलेले कंटेनर पर्शियन आखातापासून मलाक्काची सामुद्रधुनी आणि तिथूून चीनच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत याच समुद्री नियंत्रण रेषेवरून जातात. भारताच्या शांततापूर्ण आणि अनाक्रमक वृत्तीबद्दल चीन जाणतो, पण भविष्यातील महत्त्वाकांक्षांमुळे भारत एकटा किंवा अन्य देशांसोबत मिळून आपल्या भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊ शकतो. भारताची अमेरिका आणि अन्य सामर्थ्यशाली देशांशी वाढती रणनीतिक भागीदारी हे चीनचे सर्वात मोठे भय आहे. भारताला एक प्रमुख सदस्य करून हिंद-प्रशांत क्षेत्रात आखलेल्या नवी रणनीतीनेही चीनचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

चीनला आपले कूटनीतिक डावपेच खेळण्यासाठी हिमालयीन क्षेत्र मोठी संधी देते. ‘ना लढाई ना शांतता’ या धोरणातून चीन भारताला उत्तर सीमेवर लक्ष केंद्रित करण्यात गंुतवून ठेवतो. चीनकडून जमिनीवरील सीमेवरूनच धोका झालेला आहे आणि त्याने कधीही विशाल समुद्री क्षेत्राला यासाठी संधी म्हणून पाहिले नाही, याला इतिहास साक्ष आहे. म्हणून धोका वाढता राहावा यासाठी चीनने युद्धाभ्यास, तंत्रज्ञान आणि शस्त्रांच्या प्रदर्शनाद्वारे तिबेट क्षेत्राला नेहमीच सक्रिय ठेवले आहे. गस्तीदरम्यान वादविवाद आणि नियंत्रण रेषा ओलांडण्यातून हा धोका आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून चीनला नियंत्रण रेषा निश्चित न करण्यात त्याला मानसिकदृष्ट्या फार मोठा दिलासा मिळतो. असे करून चीन युद्धाच्या दोन आघाड्या तयार करून पश्चिमेला पाकिस्तानविरुद्ध भारताची सैन्य क्षमता कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. बदल्यात पाकिस्तान आणि चीनचे कूटनीतिक नाते मजबूत होते आणि उत्तर-पश्चिम हिंद महासागरात चीनच्या प्रभावासाठी हे आवश्यक आहे.

नियंत्रण रेषेवर अशा प्रकारच्या घटना नियंत्रणाबाहेर जाण्याची आणि त्यात मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, भारत-चीनदरम्यान सीमेवरील युद्धामुळे चीन कूटनीतिक स्तरावर काहीही हाती लागणार नाही. हिंद महासागरात आपली ताकद वाढवणे आणि आपल्या कूटनीतिक हितांनुसार भूमिका निभावणे भारतासाठी आवश्यक आहे. चीमनशी आर्थिक संबंध सुरू राहावेत, पण भारताने हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका बदलता कामा नये. परंतु, याबरोबरच आपली जनता आणि सुरक्षा दलांना नियंत्रण रेषेवर उन्हाळ्याच्या दिवसांत अशा घटनांना तोंड देण्यासाठी सज्ज केले पाहिजे.

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, काश्मीरमधील १५ व्या कोअरचे सेवानिवृत्त कमांडर 

बातम्या आणखी आहेत...