आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्यममार्ग:देशात संपूर्ण लॉकडाऊनऐवजी काही भागांत लक्ष्मणरेषा ओढा

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अधिक चाचण्यांमुळे कोरोना संक्रमणाची प्रकरणे समोर येत आहेत, पण ही वाढ गुणात्मक नाही

शेखर गुप्ता

जेव्हा आपण तीन आठवड्यांचा लॉकडाऊन पूर्णपणे असावा की काही ठरावीक भागात असावा हा विचार सुरू असतानाच्या काळात ब्राझीलचे राष्ट्रपती झायर बोल्सोनारो यांनी भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल यांची मागणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि रामायणातील लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने उचलून आणलेल्या पर्वताच्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. अशा काळात आपल्यालाही अशा कथा आठवतात. तिसऱ्या पर्यायाला आपण प्राधान्य देऊ. लक्षात ठेवा, लक्ष्मण बेशुद्ध आहे, त्याला रावणाचा मुलगा मेघनाद यांनी जखमी केलेय. सुशील वैद्य म्हणतात की, हिमालयातील जादुई औषध केवळ संजीवनी बुटीच त्यांना वाचवू शकते. हनुमान आणायला जातो. बुटी न ​​ओळखता आल्यामुळे हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. सुषेणने एका क्षणात त्या बुटीला ओळखलं. आज आपल्या परिस्थितीवरही  कसे लागू होते ते बघा. इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) फेब्रुवारीच्या मध्यापासून भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीवर लक्ष ठेवून आहे. पहिल्या दोन आठवड्यांत घेतलेल्या ८२६ नमुन्यांपैकी कोविड -१९ एकही संसर्ग नव्हता. १९ मार्च रोजी दोन पॉझिटिव्ह केसेस सापडल्या.  त्याच दिवशी देशभरातील सर्व रुग्णालयांत श्वसनसंसर्गाच्या रुग्णांच्या कोरोना तपासणीची घोषणा करण्यात आली. ५९११ प्रकरणांच्या तपासणीत १०४ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. हे प्रमाण १.८  टक्के आहे, परंतु हा आकडा काही कमी नाही. या संकेतावरून २१ मार्च ते २३ मार्चपर्यंत लॉकडाऊनची पार्श्वभूमी तयार झाली होती. म्हणजे सरळ शब्दांत सांगायचे तर आता बुटी शोधण्याची वेळ नव्हती तर सरळ पर्वत उचलून आणण्याची वेळ आली होती.

जगभरातून असंख्य मूल्यमापन केले गेले, ज्यामध्ये भारतातील लॉकडाऊन हे सर्वात भीषण असल्याची प्रतिक्रिया दिली गेली आहे. द इकॉनॉमिस्टद्वारा वापरलेला ग्राफिक सर्वात उल्लेखनीय आहे. यामध्ये इटली ९० आणि भारत १०० टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. पण ही अनुक्रमणिकादेखील आपल्या मर्यादा दर्शवते. जीडीपीच्या टक्केवारी स्वरूपात पाहिले तर भारत चार्टच्या सर्वात तळाशी आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांमध्ये भारत सर्वात गरीब आहे. म्हणूनच, गर्दी, दुर्बल आरोग्य व्यवस्था आणि दारिद्र्य हे तिहेरी आव्हान भारतासमोर आहे. अशा परिस्थितीत कडक स्वरूपातील लॉकडाऊनची आवश्यकता होती. शिवाय लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आलाय. बीसीजीपासून क्लोरोक्वीन किंवा आमच्या जनुक संरचनेने काय कार्य केले यावर चर्चा केली जाऊ शकते, परंतु लॉकडाऊनचे सर्वाधिक योगदान राहिले आहे.

अशा परिस्थितीत त्यास पुढे ढकलणे ही मागणी स्वाभाविक असेल. ते परवडणारे आहे की नाही याचे मूल्यांकन करावे लागेल. आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधासाठी नुकत्याच सादर केलेल्या योजनेतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपण विचार करू शकतो की राजस्थानचे भिलवाडा मॉडेल ही एक जादूची औषधी वनस्पती आहे, जी वेगवेगळ्या ठिकाणांच्या गरजेनुसार वापरली जाऊ शकते. अशा परिस्थितीत संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याऐवजी भिलवाडासारख्या ठिकाणांना ओळखले पाहिजे आणि त्यांच्या भोवती लक्ष्मणरेषा काढणे गरजेचे आहे. दिल्लीसह काही राज्यांतील चिन्हांकित क्षेत्रेदेखील हॉटस्पॉट्स आणि कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आपण या मॉडेलकडे जायला हवे. पण लॉकडाऊन जाहीर करण्यापेक्षा हे कठीण आहे. परंतु तीन आठवड्यांनंतर संपूर्ण लॉकडाऊन करणे उत्पादनविरोधी असल्याचे सिद्ध होऊ शकते. जिथे अधिक धोका आहे तिथं प्रतिबंध करावा.

टंचाई असल्याने व्हेंटिलेटर खरेदी करण्यावर अधिक जोर देण्यात येतोय. पण व्हेंटिलेटरवर जिवंत राहण्याचा अर्थ काय होतो यामागचे क्रूर सत्य आपल्याला समजले पाहिजे. अलीकडेच, व्हाइट हाऊसमध्ये एका सामान्य पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिक व्हेंटिलेटरच्या आवश्यकतेच्या प्रश्नावर सांगितले की, व्हेंटिलेटरवर असलेल्यांपैकी किती जिवंत राहतात हे माझ्याकडून तुम्हाला जाणून घ्यायचे आहे काय? तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा होणार नाही. पण त्यापूर्वी एक दिवस आधी न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, केवळ २० टक्के. म्हणूनच व्हेंटिलेटरवर जाण्यापूर्वी रुग्णाला वाचवणे हेच महत्त्वाचं. येथे आम्ही १.३८ अब्जची लोकसंख्या आणि ३ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर ठेवली आहे. आता वेळ आली आहे की रुग्णाला अांशिक स्वरूपात स्वतःच श्वासोच्छ्वास घेण्याची परवानगी द्यावी.

बातम्या आणखी आहेत...