आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोविड-19 दरम्यान सकारात्मक जीवन:आंतरराष्ट्रीय जीवनगुरू गौर गोपाल दास म्हणतात, आनंदाकडे लक्ष द्या, जीवनातील कटुता आपोआप कमी होईल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनानंतरच्या न्यू नॉर्मलचा अर्थ शिस्तच असेल तर ती आनंदाने स्वीकारा. थोडा त्रास होईल, पश्चात्तापाच्या वेदनेपेक्षा शिस्तीचा त्रास चांगलाच असतो.

अनलॉकमध्ये आपल्याला सर्वात आवश्यक म्हणजे हे लक्षात ठेवायचे आहे की, आपण जगलो तरच जिंकू. अनलॉकमध्ये थोडी सवलत मिळाल्यावर अनेक लोक अनावश्यकपणे बाहेर जाऊ लागले आहेत, पण धोका अजून संपलेला नाही. अजूनही शिस्त पाळण्याची गरज आहे. आवश्यक असेल तेव्हाच बाहेर जावे आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांनी बाहेर गेले पाहिजे, हे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. ही शिस्त पाळली पाहिजे.

तथापि, काही लोकांना विद्यमान प्रतिबंध आणि शिस्तीचा त्रास होऊ लागला आहे. परंतु याक्षणी कोणताही पर्याय नाही, म्हणून या शिस्तीसह आनंदाने जगले पाहिजे. उदाहरणार्थ, निरोगी होण्यासाठी एखादी व्यक्ती जीवनात शिस्त आणते, तो व्यायाम करतो, मिठाई खात नाही आणि डाएट करतो. या शिस्तीचा त्याला त्रास होतो, परंतु ती त्याला निरोगी ठेवते. त्याने असे केले नाही तर त्याचे कोलेस्टेरॉल वाढते, अनेक आजार बळावतात. मग वेदना तर यातही होतील आणि पश्चात्तापही. आपण कोणती वेदना निवडतो, हे आपल्यावर अवलंबून आहे, शिस्तीच्या की पश्चात्तापाच्या? हे खरे आहे की लोक शिस्त पाळून कंटाळले आहेत, परंतु हीच नवीन सामान्य परिस्थिती असेल तर ती स्वीकारून पुढे जावे लागेल. कोरोनाच्या या युगाने मनामध्ये बरीच नकारात्मकता भरली आहे. अनेकांना असे वाटते की, आपण या काळात पाहिलेल्या वेदनांचा मनावर दीर्घकाळ परिणाम राहील. याला उत्तर म्हणून मी एक किस्सा सांगितला. उन्हाळा असल्यामुळे आम्ही सरबत बनवत होतो. यासाठी मी पाण्यात लिंबू पिळत असताना फोन वाजला. बोलता बोलता अर्धा ग्लास सरबतासाठी चार लिंबे पिळली. ते चाखून पाहिल्यावर खूप आंबट लागले. आता आम्ही पाण्यातून लिंबू काढू शकत नव्हतो, पण त्यात पाणी ओतले जाऊ शकत होते. त्यात चार-पाच ग्लास पाणी ओतले तर त्याचा आंबटपणा कमी होईल आणि बरेच लोक सरबत पिऊ शकतील. आयुष्यही असेच आहे. कोरोनाने आपल्या जीवनात थोडासा आंबटपणा आणला आहे. आपण तो काढू शकत नाही, पण कमी केला जाऊ शकतो. या वेळी आपण आपल्या आनंदाकडे लक्ष दिले पाहिजे, आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपले कुटुंब आपल्याबरोबर आहे, नोकरी आहे, मित्र आहेत.

या स्थितीचा मुलांवरही नकारात्मक परिणाम होत आहे. सध्या शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू आहेत, पण कोण कोण अभ्यास करत आहे, किती शिकत आहे हे ऑनलाइनमध्ये समजत नाही. माझी बहीण एक शिक्षिका आहे. ऑनलाइन शिकवणे किती कठीण आहे, हे तिचा कॉल आला तेव्हा तिने सांगितले. सामान्य दिवसांत ती करत होती त्यापेक्षा अधिक तयारी ऑनलाइनसाठी करावी लागत आहे, कारण मुलांना उत्साहीही ठेवायचे आहे. त्यांना किस्से आणि सांगून मुलांचे मनोरंजन करत शिकवावे लागते. याचा अर्थ शिक्षकांना आता जास्त परिश्रम करावे लागतील व त्यांच्याबरोबर पालकांनाही. सध्या मुलांची शारीरिक ऊर्जा वापरली जात नाही, कारण ते घरी आहेत आणि ही ऊर्जा वापरली गेली नाही तर ते अस्वस्थ होऊ लागतात. अशा वेळी मुलांच्या आवडी-निवडीकडे लक्ष दिले पाहिजे. काहींना संगीतात, तर काहींना खेळामध्ये रस असतो. काही दिवसांपूर्वी मला पालकांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलाला फुटबॉलमध्ये रस आहे, परंतु तो सध्या फुटबॉल खेळू शकत नाही, काय करावे? त्याचा आवडता खेळाडू कोण, असे विचारले तर ते म्हणाले, क्रिस्टियानो रोनाल्डो. मग आम्ही त्याला दिवसातून एक तास रोनाल्डोचे जुने व्हिडिओ पाहण्याचा सल्ला दिला. कसे खेळायचे ते त्यातून त्याला शिकायला सांगा. रोनाल्डोच्या सर्व मुलाखती ऐकायला सांगा. आयुष्यात त्याने काय काय केले ते त्याने पाहिल्यास तो बाहेर पडल्यावर त्याला त्या गोष्टी आपल्या आयुष्यात करून पाहता येतील. अशाच प्रकारे कुणाला संगीताची आवड असेल तर त्यासाठी अनेक ऑनलाइन क्लासेस उपलब्ध आहेत. फक्त अभ्यासाबद्दल बोलत राहण्यामुळे मुले प्रोत्साहित होणार नाहीत.