आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Kavita Murlidharan Rasik Article : Will Rajinikanth's Magic Work In Politics?

रसिक स्पेशल:रजनीकांत यांचा करिष्मा राजकारणात चालेल का?

कविता मुरलीधरन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२१ची राज्यातील तामिळनाडूची विधानसभा निवडणूक पूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक आव्हानांची असणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच तामिळनाडूतील दोन बडे राजकीय नेते असणार नाहीत. करुणानिधी व जयललिता या दोन बड्या नेत्यांचे निधन झाल्याने पहिल्यांदाच तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीचा करिष्मा नसलेले अण्णा द्रमुकचे ई. पलानीसामी व द्रमुकचे एम. के. स्टालिन दोन नेते पाहावयास मिळत आहेत. आणि या नेत्यांना आव्हान दिले आहे ते चित्रपटसृष्टीचा करिष्मा असलेल्या रजनीकांत आणि कमला हसन यांनी...

सुमारे दोन दशकांच्या सस्पेन्सनंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी जानेवारी २०२१मध्ये आपण राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. ३१ डिसेंबरला पक्षाची अधिकृत घोषणा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तामिळनाडूची विधानसभा निवडणूक पुढील वर्षी मे महिन्यात होणार असल्याने रजनीकांत यांची ही घोषणा आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर २०१७मध्ये रजनीकांत यांनी आपण राजकारणात येणार असल्याची घोषणा केली होती. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर एक वर्षानंतर आणि द्रमुकचे नेते एम. करुणानिधी आजारी असताना रजनीकांत यांनी घोषणा केली होती.

१९९६मध्ये रजनीकांत यांनी तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका केली होती. जयललिता पुन्हा निवडून आल्यास तामिळनाडूचे रक्षण परमेश्वरही करू शकणार नाही, अशी टिप्पण्णी त्यांनी जयललिता यांना उद्देशून केली. त्यावेळी रजनीकांत राजकारणात प्रवेश करतील असे त्यांच्या चाहत्यांना वाटले होते. १९९६मध्ये जयललिता यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्या खुद्ध त्यांच्या बारगुर मतदारसंघातून द्रमुकचे नवखे उमेदवार ई. जी. सुगावनम यांच्याकडून पराभूत झाल्या. पण या पराभवामुळे रजनीकांत यांचा आवाज तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यांदा दिसून आला, त्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल कायम उत्सुक होते. अंतिमतः डिसेंबर २०१७मध्ये त्यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. तामिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपला प्रवेश जाहीर केला.

२०२१ची राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत अनेक आव्हानांची असणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच तामिळनाडूतील दोन बडे राजकीय नेते असणार नाहीत. करुणानिधी व जयललिता या दोन बड्या नेत्यांचे निधन झाल्याने त्यांच्याभोवती राजकारणाचा फिरणारा अक्ष बदलला आहे. आता अण्णा द्रमुक व द्रमुक या दोन पक्षांतील नवनेतृत्वाचा कस लागणार आहे. अण्णा द्रमुकचे ई. पलानीसामी व द्रमुकचे एम. के. स्टालिन या दोन नेत्यांनी व्यक्तिकेंद्री राजकारण बदलले आहे आणि पहिल्यांदाच तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीचा करिष्मा नसलेले दोन नेते पाहावयास मिळत आहेत. स्टालिन यांनी पूर्वी काही चित्रपट व टीव्ही सीरियल केल्या आहेत पण त्यांनी ते क्षेत्र सोडून दिले आहे.

राजकीय पोकळी

तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीत आपण शिरू व त्याचा फायदा आपल्या करिष्म्यामुळे मिळेल असा कमला हसन व रजनीकांत या दोन अभिनेत्यांचा प्रयत्न आहे. पण कमला हसन यांच्या तुलनेत रजनीकांत यांचा तामिळ जनतेवरचा पगडा प्रचंड आहे. रजनीकांत यांनी आपल्या अनेक चित्रपटातून सामान्य माणसाशी आपली जोडणारी प्रतिमा तयार केली आहे. या प्रतिमानिर्मितीमुळे त्यांच्या राजकीय आकांक्षा अधिक विस्तारित गेल्या आहेत. दुसरीकडे कमला हसन यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा लपवलेल्या नाहीत. त्यांनी मक्कल निथी मैयम पक्ष स्थापन करून २०१९ची लोकसभा निवडणूक लढवली होती.

२०१७मध्ये रजनीकांत यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले तेव्हा त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात क्रांती होईल असे म्हटले होते. त्यावेळी एक पत्र प्रसिद्ध झाले होते. हे पत्र रजनीकांत यांनीच लिहिले असल्याचे सांगण्यात आले होते. या पत्रात आपल्यावर ४ वर्षांपूर्वी किडनी रोपणाची शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे पुढील काही काळ लोकांमध्ये मिसळण्यास व प्रवास-दौर्यास डॉक्टरांचा प्रतिबंध असल्याचे नमूद केले होते. पण नंतर या पत्रावरून खळबळ उडाली. रजनीकांत यांनी असे आपण काही पत्र लिहिलेले नाही पण पत्रातील मजकूर खरा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रामच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीत तामिळनाडूतील केवळ १५ टक्के मते घेऊन उपयोग नाही असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.

या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रियन म्हणतात, एमजी रामचंद्रन यांचा जसा सामान्य तामिळ जनतेवर करिष्मा होता, जादू होती त्याची पुनरावृत्ती रजनीकांत यांना अपेक्षित आहे. रामचंद्रन यांच्यामागे ३० टक्क्यांचा मतदार होता व ते मुख्यमंत्री होण्याअगोदर पाच वर्षे सतत धडपडत होते. विधुथलाई चिरुथाइगल कटचीचे नेते थोल थिरुमावलावन म्हणतात, एमजी रामचंद्रन, जयललिता यांचा राजकीय काळ वेगळा होता. रजनीकांत आपल्या फिल्मी करिष्म्याच्या बळावर राजकारणात प्रवेश करत असून सध्या राजकारण करणे हा वेगळा खेळ होऊ शकतो. रजनीकांत करिष्मा राजकारणात किती फायदेशीर ठरू शकतो याची आपल्याला वाट पाहावी लागले असे त्यांचे म्हणणे आहे.

पण रजनीकांत ३ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत अत्यंत शांत व आत्मविश्वासाने उत्तरे देत होते. मी जिंकलो तर तो जनतेचा विजय असेल आणि हरलो तर तो जनतेचा पराभव असेल, असे त्यांनी विधान केले आहे. या पत्रकार परिषदेअगोदर त्यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये, आगामी विधानसभा निवडणुकांत जनतेच्या प्रचंड पाठिंब्यावर एक खंबीर, प्रामाणिक, पारदर्शी, निष्कलंक, धर्मनिरपेक्ष आध्यात्मिक राजकारण तामिळनाडूत येणार असून एक चमत्कार घडेल असे म्हटले गेले होते. बदल हे सर्व काही परिवर्तन घडवून आणू शकतो. पण परिवर्तन न झाल्यास काहीच घडून येत नाही, असेही ते म्हणाले होते.

रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल अण्णा द्रमुक उत्सुक आहे. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी रजनीकांत यांच्या पक्षाशी आपली युती होऊ शकते असे वक्तव्य केले होते. मात्र द्रमुकच्या नेत्या कळीमोळी यांनी निवडणुकांमधूनच रजनीकांत यांच्याविषयीची चर्चा स्पष्ट होईल, असे पत्रकारांना सांगितले. रजनीकांत यांच्या पक्षाचे समन्वयक म्हणून अर्जुना मूर्ती यांचे नाव पुढे आले होते. अर्जुना मूर्ती हे काही दिवसांपर्यंत तामिळनाडू भाजपच्या बुद्धीवादी गटाचे प्रमुख होते. मूर्ती यांनी पक्ष बदलताच भाजपने मूर्ती यांच्यापासून आपली फारकत घेण्यास सुरूवात केली. पक्षाने त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले.

बातम्या आणखी आहेत...