आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मीडिया : पत्रकारांना विचारतील भावी पिढ्या काेराेनामध्ये काय केले?

Aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्यायाविरूद्ध अावाज उठवावा, हीच महामारीच्या काळात जनतेची अपेक्षा

शेखर गुप्ता 

गॅब्रिएल गार्सिया मार्केजच्या प्रख्यात पुस्तकातील या लेखाचे शीर्षक ढापायचे असेल तुम्हाला थाेडेसे उतावळे, उद्धट अाणि काहीसे रंजक बनावे लागेल. सामान्यत: पत्रकार अशाच गुणांनी युक्त असताे. या गुणांसाठी अाम्हाला माफ जरी केले गेले तरी लाेकांना माहीत असते की अाम्ही काेठून अालेले असताे. माझ्याशी कधी-काेणी अशिष्ट वर्तन केले असे पत्रकारितेच्या अनेक दशकांच्या अनुभवात मला जाणवले नाही. 

या वैविध्यपूर्ण देशातील एक अब्जाहून अधिक लाेकांना काेणी सांगितले का, की पत्रकार त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा असताे? जर निवडणूक प्रचार माेहिमेच्या काळात प्रवास केला तर लक्षात येईल की, अनाेळखी पत्रकाराचेदेखील किती अगत्याने स्वागत केले जाताे. गरीब, ग्रामीण महिला विश्वासाने पत्रकारांशी माेकळेपणाने बाेलतात. जनता अाणि पत्रकारांमधील विशेष सामाजिक संबंधांचा हा परिपाक अाहे. कारण पत्रकार अतिशय मेहनत अाणि बहादुरीने काम करीत असतात, ही भावना त्याचा पाया असते. 

जेव्हा पाेलिस, प्रशासन यंत्रणा एेकत नाही तेव्हा पत्रकारास अावर्जून बाेलावले जाते. अाज जेव्हा काेराेनाच्या संदर्भात अाम्ही सारे वार्तांकन करीत अाहाेत, तेव्हा जनतेची अामच्याकडून हीच अपेक्षा अाहे. यापूर्वी कधीही अाम्हा पत्रकारांना अशा कसाेटीच्या क्षणांना सामाेरे जावे लागले नव्हते. पहिल्या महायुद्धाच्या काळातील पाेस्टर अाठवा, ज्यात मुलांनी विचारले हाेते, डॅडी, तुम्ही महायुद्धाच्या काळात काय केले? हा क्षण अापणा साऱ्यांसाठी तशाच पद्धतीचा अाहे.

‘काेराेना’ ही एक वैश्विक महामारी अाहे. प्रत्येक देश अाणि व्यक्ती अापापल्या समस्यांनी त्रस्त अाहे. सध्या काेणताही देश अन्य देशाची मदत करण्याच्या स्थितीत नाही, असे पंतप्रधान माेदी यांनी गुरुवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले हाेते. अाम्हा पत्रकारांना भारतात सन्मान अाणि स्वातंत्र्य मिळते, म्हणून अाम्ही याचे भान ठेवले पाहिजे की, ज्या सामाजिक संबंधांचा भाग येताे, ताे काेठून येताे. घटनेतील अनुच्छेद १९ देशातील प्रत्येक नागरिकास समान न्यायाने लागू हाेताे, पत्रकारांना काेणताही विशेषाधिकार नसताे. अाणीबाणीपर्यंत अाम्ही पत्रकार स्वातंत्र्याकडे गांभीर्याने पाहत नव्हताे. 
परंतु, अाणीबाणीच्या काळात प्रेसच्या स्वातंत्र्याचा अर्थ कळला. हा सामाजिक ऋणानुबंध येथूनच तयार हाेताे. जर अामच्या स्वातंत्र्यास ते इतके महत्त्व अाणि संरक्षण देत असतील तर, अाम्ही त्यांच्यासाठी याेग्य अाहाेत की नाही याचा निर्णयदेखील घेतील. काेणतीही समजदार व्यक्ती पूर्णत: भयमुक्त नसते. कुणीही अापल्या सहयाेगी पत्रकारास अनपेक्षित जाेखमीची जबाबदारी देणार नाही, कारण अापण सारेच पत्रकार अाहाेत. एक अब्जाहून अधिक लाेक अतिशय धास्तावलेले अाहेत, स्वत:ला अात्यंतिक असुरक्षित मानत अाहेत. 

‘काेराेना’च्या दहशतीच्या काळात अाम्हा पत्रकारांची जबाबदारी हीच अाहे की, न्याय अाणि इतिहासाला अाधारभूत मानून सर्वात अगाेदर प्रतिक्रिया अापण द्यावी. जर अापण असे करू शकत नसू, तर स्वत:ला पत्रकार म्हणवणे तत्काळ बंद केले पाहिजे. शक्य अाहे, अापल्यापैकी काही जण असफल ठरतील; परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असे घडणार नाही. 

माझे तर मत असे असते की, प्रारंभी एखादी बाब जेवढी वाईट वाटते, ती तितकीशी नंतर वाटत नाही. तणावपूर्ण गेल्या अाठवड्यात न्यूज रूममध्ये मला एक चांगला प्रश्न विचारला गेला, की जर स्थिती अतिशय खराब झालीच तर अाणि अापल्यापैकी एखाद्या पत्रकारास जीव गमवावा लागला तर काय हाेईल? जर असे घडलेच तर अन्य काही पत्रकार बातमीदारी करतीलच, पत्रकारितेचे काम थांबणार नाही.

पंतप्रधानांनी दाेन वेळा मीडियाचा उल्लेख अनिवार्य सेवेच्या रूपात केला. ही भूमिका म्हणजे पत्रकारितेसाठी एक सुखद बदल अाहे. म्हणूनच तमाम पत्रकारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अापण साऱ्या समाजासाठी महत्त्वपूर्ण अाणि अत्यावश्यक सेवा देत अाहाेत. सत्ताकेंद्राशी अापले मतभेद असू शकतात, राहतील अाणि लाेकशाहीत असे घडते. परंतु सध्याच्या संकटाच्या काळात त्या साऱ्या चिंता दूर केल्या पाहिजेत याची खूणगाठ बांधली पाहिजे. ‘काेराेना‘च्या काळात पत्रकारिता ही अशी बाब अाहे, जी पूर्वी कधीही नव्हती.

0