आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण:मोदी राष्ट्रनेत्यासारखे बोलले, कुणालाच विरोध केला नाही

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • भारतात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश कसे मिळाले हे सांगणे गरजेचे होते

डॉ. वेदप्रताप वैदिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या निमित्ताने देशाला तिसऱ्यांदा संबोधित केले. त्यांची भाषा, शैली ही प्रासंगिक आणि प्रेरणादायक होती. त्यांनी योग्य वेळी कोरोना संसर्गापासून बचावासाठी निर्णय घेतला की नाही यावर मतभेद असू शकतात; परंतु जगाच्या अनेक शक्तिशाली देशांपेक्षा कोरोना साथीचा प्रसार भारतात कमी झाला आहे, यात शंका नाही. अनेक सुविधासंपन्न आणि विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कोरोना संसर्गाची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात भारतापेक्षा शंभरपट जास्त आहे. मोदींनी आपल्या एक-दोन मिनिटांच्या भाषणात या तथ्यांवर बोलणे गरजेचे होते की, भारतात संसर्ग इतका का पसरला नाही? यासाठी आपल्या डॉक्टरांची आणि परिचारिकांची सेवा आणि सामान्य जनतेची खबरदारी या गोष्टी कारणीभूत असून सोबतच भारतीय संस्कृतीची जीवनशैलीदेखील याला एक मोठे कारण आहे. कोट्यवधी भारतीय जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते हातात हात देण्याऐवजी एकमेकांना अभिवादन करतात, शारीरिक अंतर राखतात, फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाण्याऐवजी ताजे अन्न खातात, मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ जास्त खातात. अन्नामध्ये असे मसाले वापरतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. या मसाल्यांच्या सतत वापरामुळे युरोप आणि अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय कोरोनाला कमी प्रमाणात बळी पडले आहेत. हे चांगले झाले की जाता जाता मोदींनी आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेदिक शिक्षणाचादेखील उल्लेख केला. काही हिंदी वृत्तपत्रे आणि काही टीव्ही चॅनल्स या घरगुती उपचारांवर आधारित कार्यक्रमांचे प्रसारण करत आहेत.  परंतु मी आशा करतो की माध्यमेही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतील.

पंतप्रधानांनी ज्या सप्तपदींचा उल्लेख केला आहे ते उत्तम आहे. घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेणे, लॉकआऊटमध्ये शारीरिक अंतराकडे लक्ष, मास्क घालणे,  आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे, डॉक्टर, परिचारिका व पोलिसांचा सन्मान करणे इत्यादी बाबींना संबोधित केले. एखाद्या नेत्याच्या तोंडून अशा गोष्टी ऐकल्यामुळे मन:शांती मिळते. मोदींनी भर दिलेल्या इतर दोन गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. देशात उपाशीटी कुणालाही झोपू देऊ नका आणि गरिबांना अन्न द्या. दुसरे म्हणजे, व्यापारी आणि उद्योगपतींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये. पंतप्रधानांची छवी अशी आहे की ते राजकीय पदापेक्षा मोठी उंची गाठतात. या गोष्टीकडेही लक्ष दिले पाहिजे की मागच्या २०-२५ दिवसांत भाजप सरकारने कोरोना संकटाला कोणतेही सांप्रदायिक रूप देण्याचा प्रयत्न केला नाहीये. तबलिगी जमातचे प्रकरण भारतीय मुसलमानांच्या माथी मारण्याचा प्रयत्नही केला नाहीये. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निजामुद्दीनच्या जमात मेळाव्याला जातीय रंग देण्याच्या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवला आहे. हीच गोष्ट राजकीय परिपक्वता आणि खऱ्या राष्ट्रवादाचा जिवंत पुरावा आहे.

सरकार, भाजप आणि संघ यांची ही विधायक वृत्ती ही तबलिगी कार्यकर्त्यांना समजू शकलेली नाही. यापैकी अनेक जण घरी लपून बसले असून त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिका यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. त्यांना माहीत नाही की त्यांच्या मौलानाच्या बेजबाबदारपणामुळे सर्वात जास्त नुकसान त्यांनी त्यांच्याच जवळच्या व्यक्तींचे केले आहे.

आपल्या तिसऱ्या भाषणात मोदींचे राष्ट्रनेता म्हणून नवे रूप समोर आले. विरोधी पक्ष अजूनही अनेक मुद्द्यांवर सरकारचा विरोध करत आहे. परंतु मोदींनी त्यांच्याविरोधात एक शब्दही उच्चारला नाही. विरोधकांचे काम विरोध करणे आहे, परंतु मोदींनी विरोध करण्याऐवजी त्यांच्या सहकार्याची मागणी केली आहे. संकटाच्या वेळी हीच भूमिका महत्त्वाची आहे. जर मोदींना या संदेशात देशातील लोकांना सुखाने आपला दिवस घालवण्याची एखादी कृती सांगू शकले असते. त्याच्या बोलण्याचा खोलवर परिणाम झाला असता. लोकांची उदासीनता दूर झाली असती. तसेच ते लोकांना सांगायला विसरले की आज संपूर्ण जग कोरोनाच्या औषधांसाठी भारताकडे आशेने बघत आहे. भारत आज जागतिक स्रोत म्हणून उदयास येत आहे. कोरोनाच्या या काळात, मोदींसह आमचे सर्व नेते आणि माध्यमे कोरोनाशी संबंधित इंग्रजी शब्द वापरतात. या शब्दांचा अर्थ १४० कोटी लोकांपैकी किती जण समजू शकतील? लॉकडाऊनला टाळेबंदी, व्हायरसला विषाणू, सोशल डिस्टन्सला सामाजिक अंतर, मास्कला मुखवटा आणि क्वाॅरंटाइनला विलगीकरण आणि सॅनिटायझेशनला शुद्धीकरण असे शब्द आपण वापरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...