आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घणाघात:इसकी सज़ा ज़रूर मिलेगी...

प्रियदर्शन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही स्टेडियममध्ये राजकीय नेत्यांचे पुतळे बसवणे हे अयोग्यच आहे. येणाऱ्या पिढीला त्यापासून कोणतीही प्रेरणा मिळणार नाही. जगद्विख्यात लॉर्ड्स मैदानाबाहेर डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा पुतळा आहे. सर गॅरी सोबर्स यांचा पुतळा बार्बेडोसच्या किंग्जटन ओव्हल मैदानाची शान वाढवतो. सिडनी क्रिकेट ग्राऊंडबाहेर सर डॉन ब्रॅडमन यांचा पुतळा आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाबाहेर शेन वॉर्नचा पुतळा आहे. हे पुतळे पाहून स्टेडियममध्ये येणाऱ्या नव्या पिढीला त्यांचा इतिहास कळतो... प्रेरणा मिळते. बेदी पुढे असेही म्हणतात की, क्रिकेटच्या प्रशासकीय नेत्यांची किंवा अधिकाऱ्यांची जागा ही काचेच्या केबीनमध्ये असली पाहिजे... स्टेडियम हे खेळाडूंसाठी आहे...

बिशनसिंग बेदी यांना अद्याप देशद्रोही वा अतिरेकी म्हणून ट्रोल कसे केले गेले नाही याचेच आश्चर्य वाटतयं... कारण अशी हेटाळणी करण्यासाठीची जी पात्रता लागते ती बिशनसिंग बेदी यांनी अलीकडच्या काळात पूर्णपणे मिळवली आहे. एकतर ते अल्पसख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व करतात, दुसरे ते निर्भिडपणे आपले मत व्यक्त करतात आणि आता तर बेदी अशा एका नेत्याच्या पुतळ्याविरोधात उभे ठाकले आहेत ज्या नेत्याने भाजपमध्ये विद्वान, मुत्सद्दी राजकारणी आणि मुख्य संकटमोचक या कौशल्यावर एक मोठे स्थान मिळवले होते. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये जर का भाजपच्या दिवंगत नेते अरुण जेटली यांचा पुतळा उभारणार असाल तर फिरोजशाह कोटला स्टेडियममधील प्रेक्षागृहाला दिलेले आपले नाव तात्काळ काढून टाकण्यात यावे, अन्यथा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भारताच्या या महान फिरकीपटूने दिला आहे. बेदींच्या मतानुसार दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशने अगोदरच क्रिकेटला दफन केले आहे आणि आता त्या शवपेटीला शेवटचा खिळा ठोकण्याचे काम पुतळा उभारून करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासू निकटवर्तीयांपैकी एक अरुण जेटली होते ज्यांनी प्रत्येक मोर्च्यावर भाजपची पद्धतशीरपणे पाठराखण केली. मग ते संसदेचे अधिवेशन रद्द करणे असो वा ज्या राज्यसभेने भाजपच्या अनेक विधेयकांची अडवणूक केली त्या राज्यसभेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे असो... निवृत्त न्यायाधिशांच्या नियुक्तीचा मुद्दा असो वा शेतकरी कायद्याचा... अरुण जेटली भाजपचे संकटमोचक म्हणून यशस्वी ठरत होते. वास्तविक बिशनसिंग बेदी यांनी कै. अरुण जेटली यांच्याविरोधात काहीही म्हटलेले नाही. एकेकाळी अरुण जेटली जेव्हा दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदी कार्यरत होते तेव्हा बिशनसिंग बेदी यांनी संघटनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती. मात्र यावेळी बेदी यांनी अरुण जेटली यांच्याविरोधात काहीही म्हटलेले नाही. त्यांच्या नाराजीचा मुद्दाच वेगळा आहे. ते म्हणतात की, कोणत्याही स्टेडियममध्ये राजकीय नेत्यांचे पुतळे बसवणे हे अयोग्यच आहे. येणाऱ्या पिढीला त्यापासून कोणतीही प्रेरणा मिळणार नाही. जगद्विख्यात लॉर्ड्स मैदानाबाहेर डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा पुतळा आहे. सर गॅरी सोबर्स यांचा पुतळा बार्बेडोसच्या किंग्जटन ओव्हल मैदानाची शान वाढवतो. सिडनी क्रिकेट ग्राऊंडबाहेर सर डॉन ब्रॅडमन यांचा पुतळा आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाबाहेर शेन वॉर्नचा पुतळा आहे. हे पुतळे पाहून स्टेडियममध्ये येणाऱ्या नव्या पिढीला त्यांचा इतिहास कळतो... प्रेरणा मिळते. बेदी पुढे असेही म्हणतात की, क्रिकेटच्या प्रशासकीय नेत्यांची किंवा अधिकाऱ्यांची जागा ही काचेच्या केबीनमध्ये असली पाहिजे... स्टेडियम हे खेळाडूंसाठी आहे...

अरुण जेटली हे चांगले नेते होते की वाईट, त्यांच्या कारकिर्दीत दिल्ली क्रिकेट संघटना बहारली की बुडाली या चर्चेत सध्या शिरायला नको. बिशनसिंग बेदी जे म्हणत आहेत त्याचे नेमके सार काय आहे यावर चर्चा करू. त्यांच्या मतानुसार कोणत्याही स्टेडियममध्ये कोणत्याही नेत्याचा पुतळा उभारणे हा क्रिकेटच्या परंपरेचा अपमान आहे, क्रिकेटच्या वारसाची थट्टा आहे. बेदी यांचे हे परखड मत त्यांच्या अंगाशी यायला फार वेळ लागणार नाही अशी चिन्हे आहेत. सध्याचे केंद्राचे सरकार आणि जेटली यांच्या समर्थकांची फौज बेदींवर कोणत्याही क्षणी तुटून पडू शकतात. बेदी हे किती महान फिरकीपटू होते आणि ६०-७० च्या दशकात अथक परिश्रम करून भारतीय संघाने जे काही विजय प्राप्त केले त्यात या महान फिरकीपटूचे योगदान किती मोठे होते हा इतिहास पालापाचोळ्यासारखा उडवून लावला जाईल आणि बेदींना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल केले जाईल. बेदी हे अतिशय सामान्य फिरकीपटू होते असे म्हणायलाही ही ट्रोल आर्मी कमी करणार नाही. त्यासाठी बेदींच्या क्रिकेटच्या आकडेवारीला तोडूनमोडून पेश केले जाईल. याच्या नेमके उलटही होऊ शकेल. म्हणजे जेटली विरोधक बेदींच्या या भूमिकेला पाठिंबा देतील आणि दुसऱ्या पद्धतीने जेटलींवर निशाणा साधतील. सर्व प्रकरण हे व्यक्तिगत समर्थक आणि विरोधक या आक्रमणात अडकून पडेल.

बिशनसिंग बेदींचा अस्सल "स्पिन' हा आहे की, भारतीय समाज हा देशाच्या नेत्यांचा आणि नोकरशाहीचा गुलाम बनत चालला आहे. समाज आणि संस्कृतीचे इतर अन्य घटक, मग ते साहित्य, खेळ किंवा विज्ञान असो वा संगीत, अभिनय, नृत्य असो... या सगळ्या गोष्टी नेते आणि नोकरशाहीसमोर तुच्छ वाटायला लागल्या आहेत. जिथे क्रिकेटपटूंचा पुतळा हवा तिथे नेत्यांचे पुतळे उभारले जात आहेत आणि हे अगदी आताच घडतयं असे बिलकुल नाही. मात्र याचा सध्या ज्याप्रकारे विस्तार होत आहे तो विकृत पद्धतीने होत आहे हे निश्चित... "पार्टी विद अ डिफरन्स' असे स्वत:च पाठ थोपाटून घेणारी आणि भारतीय संस्कृतीचा झेंडा फडकवणारी भाजप बिशनसिंग बेदींच्या या इशाऱ्यानंतर पुतळा बसवण्याचा निर्णय मागे घेईल असे काहींना वाटले होते. मात्र चारच दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि अरुण जेटली यांच्या पश्चात आता दिल्ली क्रिकेट संघटनेची धुरा वाहणारे त्यांचे पुत्र रोहन जेटली यांच्या उपस्थितीत दिवंगत अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये अनावरण झाले. भाजप सहजासहजी घेतलेल्या निर्णयापासून मागे फिरत नाही. त्या पक्षाचा अहंकार किती मोठा आहे हे आतापर्यंतच्या अनेक उदाहरणांनी स्पष्ट झालेले आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले सध्याचे शेतकरी आंदोलन हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे.

पुन्हा दिवंगत अरुण जेटलींकडे वळू... भाजपच्या इतर अन्य नेत्यांच्या तुलनेत अरुण जेटली उच्चविद्याविभूषित होते, खुल्या विचारांचे आणि तितकेच शालीन होते. याबाबतीत त्यांची तुलना फक्त दिवंगत सुषमा स्वराज यांच्याशी होऊ शकेल. दुर्दैवाने भाजपच्या सध्याच्या तेजस्वी काळात हे दोन तेजस्वी नेते आज हयात नाहीत. अरुण जेटलींकडे एक व्यंगात्मक दृष्टीकोन होता. कोणत्या घटनेवर हसायचं आणि हसायचं नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. लोकसभेत रेणुका चौधरी यांच्या हसण्याच्या पद्धतीवर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यंगात्मक टिप्पणी केली तेव्हा सगळे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले असताना अरुण जेटली मात्र पंतप्रधानांच्या अगदी शेजारी असूनही हसत नव्हते. त्याच अरुण जेटलींचा पुतळा त्यांच्या शिष्य आणि भक्तगणांनी फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये उभारला आहे. कदाचित तो पुतळाच आता जेटलींवर हसत असेल कारण जेटली जर हयात असते तर त्यांनादेखील ही कृती आवडली नसती. इतकी सांस्कृतिक मुल्ये त्यांच्याकडे निश्चितच होती. राजकीय नेतृत्वामध्ये कोणता पुतळा कोणत्या ठिकाणी असावा याची सांस्कृतिक मुल्ये असणे खुप गरजेचे आहे. कला-क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात जर राजकीय नेत्यांचे पुतळे बसवले तर त्याची शोभा नाही वाढत तर ते हास्यास्पद ठरते.

सध्याच्या धोकादायक काळात तोंड उघडण्याची हिंमत दाखवल्याबद्दल खरे म्हणजे बिशनसिंग बेदी यांचे अभिनंदन करायला पाहिजे. अन्यथा हा काळ तोंड बंद ठेवण्याचा आहे. पुतळा तर विराजमान झाला आहे आता भारताचा हा महान फिरकीपटू पुढे काय करणार हे पहावे लागेल. फिरोजशहा कोटला मैदानातील एका स्टॅण्डवर बिशनसिंग बेदी यांचे नाव आजही दिमाखाने झळकत आहे. बेदींनी त्यांचा हेका सोडला नाही, तर त्या मैदानातून बेदी हद्दपार होतील. सध्या तरी बेदी यांना त्यांच्या या साहसाची किंमत चुकवावी लागेल अशीच शक्यता आहे. याच साहसावरून मुक्तिबोध यांच्या दोन ओळी आठवल्या...

"हाय हाय, मैने उन्हे देख लिया नंगा/ इसकी मुझे और सजा मिलेगी...'

लेखक एनडीटीव्हीचे सीनियर एडिटर आहेत.

(सौजन्य : एनडीटीव्ही)

बातम्या आणखी आहेत...