आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटलायझेशन:पर्यटन, रिटेलला गती देण्यासाठी तंत्रज्ञान करू शकते मदत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एआर/व्हीआर तंत्रज्ञानाद्वारे पर्यटकांना वास्तवापलीकडचा अनुभव देणे शक्य

काेराेना विषाणूविरुद्धच्या लढ्यात विजय हाेईल तेव्हा त्याचा वारसा काय असेल? सध्या सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. परंतु, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे व्हर्च्युअलायझेशनच्या (व्हीआर) माध्यमातून आणि अधिक रंजक बनवण्यासाेबत पर्यटकांचं मनाेबल वाढवून त्यापासून बचाव करता येऊ शकताे. संवर्धित वास्तविकता आणि आॅगमेंटेट रिअॅलिटी (एआर) सारखे टूल, जे संगणकाच्या माध्यमातून बनवण्यात आलेले व्हिडिआे, ग्राफिक्स आणि जीपीएससारख्या डेटाला सुपरइम्पाेज्ड करून पर्यटनाच्या वास्तविक अनुभवाला एका नव्या उंचीवर नेता येऊ शकते. याद्वारे पाहणाऱ्या व्यक्तीच्या भोवतालचे वातावरण त्या धर्तीचे निर्माण करण्यासाेबतच त्याची अनुभूती घडवता येऊ शकते. एक एआर- परिष्कृत संदर्भातील माहिती संवाद मूलक बनते आणि सहजपणे डिजिटल पद्धतीने वापरता येऊ शकते. हा प्रयाेग युराेपात काही शहरांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, यामध्ये इटलीतील फ्लॉरेन्स शहराचा समावेश आहे. 

भारतासंदर्भातील उदाहरण घ्यायचे तर सांची येथे येणारा काेणीही पर्यटक आपल्या स्मार्टफाेनवर एआर अॅप्लिकेशनचा वापर करून विद्यमान स्तुप तर पाहू शकताेच, शिवाय ताे समांतर दृश्यही पाहू शकताे. उदा. सम्राट अशाेकाच्या काळात बाैद्ध भिक्खूद्वारे पूजा-प्रार्थना व ध्यान केले जात असेल तेव्हा कसे वातावरण असेल? जेव्हा पर्यटक सांचीच्या परिसरात फिरत असताे तेव्हा येथे ब्राह्मी लिपीत लिहिलेल्या बाबींचा अनुवाद पूर्वीपासूनच सेट केलेल्या भाषेत (उदा. जपानी किंवा सिंहली) पाहता येऊ शकताे. एआरच्या वापरामुळे सारे अनुभव एखाद्याच्या आवडीप्रमाणे किंवा व्यक्तिगत बनवले जाऊ शकतात. एआरसाेबत व्हीआरसाठी अतिशय रचनात्मकता लागते आणि ती महागडी ठरू शकते. कदाचित सरकार विविध खासगी कंपन्यांना व्हर्च्युअल टुरिझम अॅप डिझाइन करण्याची परवानगी देऊ शकते. इतकेच नव्हे तर पर्यटन स्थळांच्या चित्रीकरणास परवानगी, उपलब्ध एेतिहासिक साहित्य, कलात्मक वस्तू आणि मल्टीमीडिया इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सुविधा दिली जाऊ शकते. खासगी कंपन्या एआर/व्हीआर सामग्री बनवून त्यास पब्लिक प्रायव्हेट भागीदारी अंतर्गत महसुलाचे वाटप करत उपलब्ध करू शकतात. यामुळे एकंदर महसुलात वाढ हाेऊ शकते, पर्यटनाला गती मिळेल आणि अखेरीस पर्यटन स्थळांचा विकास आणि सुरक्षेत सुधारणा हाेऊ शकेल. हाॅटेल्सही त्याचा वापर पर्यटकांना आपल्या मॅपवर अतिरिक्त माहिती देण्यासाठी करू शकतात. उदाहरणार्थ, जर मध्य प्रदेशच्या नकाशावर स्मार्ट फाेनला चंदेरीच्या वर नेल्यास त्यात तेथील इतिहास आणि अन्य रंजक गाेष्टी दिसू शकतात. एखाद्या रेस्टाॅरंटमध्ये मेन्यूतील एखादा पदार्थ असा दर्शवला जाऊ शकताे, जणू ताे प्रत्यक्षात दिसताे. इतकेच नव्हे तर त्याविषयीचे रिव्ह्यूज् आणि ग्राहकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया समाविष्ट असतील. या पद्धतीने केवळ पर्यटनविषयक आकर्षण वाढवले जाऊ शकते असेच नव्हे तर त्याविषयी काही उणिवा असतील तर त्याची भरपाई केली जाऊ शकते.

ग्राहकाेपयाेगी वस्तू आणि नाॅन-फूड रिटेल या क्षेत्रालाही जबर फटका बसला आहे. म्हणूनच माॅल आता अधिक आवडीचे क्षेत्र ठरणार नाही याची भीती वाटू लागली आहे. येथे पुन्हा व्हीआर मदतीस धावून येऊ शकताे. मात्र, त्यासाठी माॅल रिटेल आऊटलेटचे समूह बनावे लागतील. त्यासाठी प्रत्येक माॅल आपले व्हर्च्युअल पाेर्टल बनवू शकते. दुकानातील सामग्रीचे 3-डी व्हिज्युअलायझेशन पाहता येऊ शकेल अशा पद्धतीने अॅप डिझाइन करता येऊ शकते. आॅडी ही कार कंपनी ग्राहकांना शाे-रूमला भेट न देताच कार आणि रंगाचा अनुभव घडवते. आईकिया ही फर्निचर बनवणारी कंपनी आईकिया प्लेसच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांच्या वास्तविक थ्रीडीची अनुभूती घडवते. याअंतर्गत ज्या दालनात एखादे उत्पादन ठेवले जाणार आहे, त्याची लांबी-रुंदी आदीचा अंतर्भाव करून व्हिज्युअलाइझ केले जाते, की ते प्राॅडक्ट कुठे ठेवल्यानंतर प्रत्यक्षात कसे दिसेल. अशा माहितीमुळे ग्राहकांना खरेदी करण्याच्या निर्णयाप्रत येण्यास चालना मिळते आणि निर्णयही असाच येताे, ज्यामुळे ताे अधिक काळपर्यंत संतुष्ट राहताे. भारतासारख्या देशात टुरिस्ट गाइड किंवा सेल्स पर्सनसारखी सेवा क्षेत्रे संपुष्टात येण्याची भीती निर्माण हाेणे स्वाभाविक असले तरी आपले ग्राहक आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्वरेने नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि अमलात आणण्याची गरज आहे. सरकारनेही स्वत:ला रेस्टाॅरंट आणि हाॅटेल व्यवस्थापनासारख्या सामान्य कामातून बाहेर काढले पाहिजे. तसेच, याेग्य तंत्रज्ञानाने युक्त प्लॅटफाॅर्म निर्माण करण्याकडे आणि व्यापारासाठी पाेषक वातावरण निर्माण करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.

राघव चंद्रा, आयएएस 

माजी सचिव, भारत सरकार

बातम्या आणखी आहेत...