आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक:परिस्थिती ठीक, पण लॉकडाऊन वाढवून सरकार जोखीम घेतेय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कामगारांना पायी घरी जाणे भाग पडत असेल तर नोकरी जाणार नाही हा विश्वास त्यांना देण्याची गरज

लॉकडाऊन किती यशस्वी ठरला? संपूर्ण देशात लॉकडाऊन नसता तर परिस्थिती किती वाईट झाली असती? यात सवलत मिळाली तर काय होईल? १३८ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जिथं मोठ्या प्रमाणात गरिबी आहे तिथं कोणतीही दिलेली सूट ही कशी योग्य ठरेल?  पंतप्रधानांनी सांगितले होते की, ‘जान है तो जहान है।’ जगाची तुलना केल्यास कोरोना व्हायरसने मृत्यू होणाऱ्यांची सर्वात कमी संख्या भारतात आहे. याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत. शिवाय पंतप्रधानांचे आभार मानून घरात पुन्हा बंदिस्त व्हा. खरंच लॉकडाऊनचे ४० दिवस पूर्ण झाल्यावर आपल्याला असं करायला पाहिजे? या परिस्थितीत आपण सर्वजण जिवंत राहण्याचा प्रयत्न करत असताना आपलं उत्पन्न ठप्प झालंय. कित्येक लोकांची उपजीविकेची साधनं कधीच परत येणार नाहीत. कोट्यवधी लोक जे १९९१ नंतर खूप प्रयत्न करून दारिद्रय रेषेच्या वर आले होते, पण पुन्हा ते दारिद्रय रेषेखाली लोटले गेलेत. ‘हम जिंदा है’ यातील अमिताभ बच्चन यांचा संवाद आठवा, ‘ये जीना भी कोई जीना है लल्लू?’  हा १९७९ च्या ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटातला आहे.  

पाच दशकं मागे वळून पाहिलं तर गोपालदास नीरज यांना दुःख व निराशेवर लिहिणारा कवी मानले जात होते. खरं तर त्यांनी अनेक रोमँटिक गाणीही लिहिली आहेत. यामध्ये लिखे जो खत तुझे (कन्यादान) आणि फूलो के रंग से (प्रेम पुजारी) या गीतांचाही समावेश आहे. पण ज्या गाण्याने त्यांना जगप्रसिद्ध केले ते दुःखी गाणं आहे, ‘कारवां गुजर गया, गुबार देखते रहे.’१९६६ मध्ये ‘नई उम्र की नई फसल’ हे गाणं महंमद रफी यांनी गायलं होतं. माझ्यावर आरोप होऊ शकतो की दुःखी वातावरणाची मी चेष्टा करतोय. पण सतत वाढत जाणारा लॉकडाऊनही असंच करतोय. विषाणूने आपल्याला मारलं नाही तर आपण बेरोजगारी, भूक, एकटेपणा, नैराश्याने मरू शकतो. पुन्हा काम सुरू करण्याची वेळ आली आहे. पण सरकारने लॉकडाऊनला दोन आठवड्यांसाठी मुदतवाढ दिलीय आणि निवडलेली ठिकाणे ज्या प्रकारे उघडली जात आहेत ती परिस्थिती लवकरच बदलणार नाही हे स्पष्ट दिसतंय.

भारताकडे अमेरिकेसारखा रोख साठा नाही किंवा नवीन चलन मुद्रित करण्याची संधी नाही, परंतु आपल्याकडे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससारखे सक्षम दल तर आहेत. फ्लाइपास्ट, बँड, कोरोनावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलवर फुलांचा वर्षाव करणे असे विचार आकर्षक आहेत. पण जेव्हा लाखोंच्या संख्येने कामगार पायी आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत तेव्हा  फ्रान्सची महाराणी म्हणाली होती, ‘ज्यांच्याकडे भाकरी नाही त्यांना केक खायला सांगण्यासारखे आहे.’ त्यांना खात्री देणं आणि आश्वस्त करणे गरजेचे आहे की त्यांची नोकरी जाणार नाही आणि लवकरच पुन्हा काम सुरू होईल. व्हिएतनामच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेचे सैन्य दररोज ज्या सूचना करत होते त्याला प्रेसने मूर्खपणाचे नाव दिले होते. असं तेव्हा होतंय जेव्हा सरकार नागरिकांना लहान मुलांप्रमाणे बालिश समजतं. आरोग्य मंत्रालयाची कोविड-१९ च्या विषयावर होणाऱ्या माहितीच्या प्रसारणावर जर एक दृष्टिक्षेप टाकला तर तिथं फक्त संक्रमण आणि मृत्यूंची संख्या सांगितली जाते तसेच इतर जगाच्या तुलनेने भारताची कामगिरी उत्तम असल्याची माहिती दिली जाते. मी एक दिवस पीआयबीच्या ब्रीफिंगमध्ये  एक प्रश्नसुद्धा विचारला की, कोविड-१९ च्या रुग्णांपैकी किती रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत? तेव्हा त्यात उत्तर शास्त्रज्ञांनी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नव्हे, तर एका अधिकाऱ्याने दिले. ते म्हणाले की, ‘जर तुम्ही मला माझे नाव विचारले तर मी माझी जन्मतारीख सांगणार.’

देशात कोविडची पहिली केस समोर आल्यानंतर तीन महिन्यांनी आकड्यांव्यतिरिक्त वेगळी माहिती पाहिजे. परिस्थिती कशी सामान्य होईल याचा पुढचा मार्ग पाहिला पाहिजे. लॉकडाऊनशिवाय लोक विचार न करता तुघलकी निर्णयाचे काटेकोरपणे पालन करतात हे पाहून आनंद झाला. कारण आपण घाबरलो आहोत. आपल्या आकांक्षा आणि उद्योजकतेमुळे जगभरात ओळखल्या जाणाऱ्या १३८ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला अजून दोन आठवड्यांनंतर काय होईल याची कल्पनाही नाहीये.  खूप आजारी असलेल्या रुग्णाला वैद्यकीय कोमामध्ये ठेवले जाते. कारण त्याचे शरीर निरोगी राहील. पण तुम्हाला याचा कालावधी किती आहे हे माहीत असले पाहिजे. म्हणजे रुग्ण स्वतःच जिवंत राहू शकेल. जर त्याला कोमामध्ये ठेवले असेल आणि प्रत्येक वेळी त्याचे सर्व मुख्य अवयव व्यवस्थित कार्य करत असल्याने तुम्ही आनंदी होत असाल, पण यामागे अशी भीती आहे की रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो आणि तुम्ही ताप मोजत बसलाय.

शेखर गुप्ता, एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिन्ट’

Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...