आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिनधास्त:वंदे भारत मिशन विरुद्ध पायी गावी जाणाऱ्या भारतीयांचा प्रश्न 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माेदींचे संदेश केवळ मध्यम आणि उच्चभ्रू वर्गासाठी आहेत, त्यात गरिबांविषयी सहानुभूती का नाही?

राजकारणाची  हेडलाइन बदलण्याच्या मुद्द्यावर माेदी सरकारचा हात काेणी धरू शकत नाही, विशेषत: ज्या खुबीने, शानदार पद्धतीने ते साकारले जाते. वंदे भारत मिशनचेच उदाहरण घ्या, नैराश्याच्या या वातावरणातही यामुळे नवचैतन्य जागवले आहे. विदेशात नाेकरी करणारे प्रत्येक देशातील नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि कुटुंबे जगभरात ठिकठिकाणी अडकून पडली आहेत. बहुतेक देशांनी त्यांना मायदेशी आणण्यासाठी काही ना काही प्रयत्न केले आहेत, परंतु केवळ भारतानेच त्याचा इव्हेंट बनवला. अर्थातच ही कल्पना माेदींची असेल तर चर्चा हाेणारच, त्याला हॅशटॅगही लागणारच हे आेघानेच आले. ७८१ भारतीय स्वदेशी परतले तेव्हा असा साेहळा साजरा करण्यात आला, जणू ते मुझफ्फराबाद किंवा स्कार्दू स्वतंत्र करूनच परत आले असावेत.

यासाठीचा सारा खर्च तेच देत असल्याचे वारंवार सांगितले जात हाेते. अखेर ती खास व्यक्तींची मुले आहेत, जाे प्रत्येक सामान्य भारतीय असू शकणारच नाही. आपण साऱ्यांनीच खुश व्हायला हवे, असाच हा आनंदाचा क्षण आहे. सरकार विदेशातून लाेकांना घेऊन येत आहे. अखेर असे अविश्वसनीय काम पहिल्यांदा १९९१ मध्ये एकट्या अक्षयकुमारने कुवैतमधून लाखाे भारतीयांना मायदेशी आणून पार पाडले हाेते, त्यानंतर आताच तसे कर्तव्य बजावण्यात आले. सर्वांनीच ताठ मानेने उभे राहून ‘वंदे भारत मिशन’च्या धाडसाला सॅल्यूट ठाेकला पाहिजे आणि त्या मामुली भारतीयांची काळजी करू नका, ज्यांच्या पायांची पायपीट करून चाळण झालेली असेल; जे उपाशीपाेटी हजाराे किमीचा पायी प्रवास करत घरी परतत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी काेणी वाट पाहत उभे असणार नाही, काेणी ट्विट करणारा नसेल. त्यांच्यासाठी क्वॉरंटाइन कक्ष नाही, ४५ दिवसांपर्यंत बस आणि रेल्वेदेखील नव्हत्या. त्या वेळी प्रवास खर्च देण्यासाठी त्यांची तयारीही असेल. ते हुशार असते, चांगले सुशिक्षित असते तर बांधकामावर टाेपले वाहत बसले नसते. ईश्वराने सर्वांना समान संधी दिली नाही वा सारखे घडवले नाही तर तक्रार त्याच्याकडे करा व ताेपर्यंत या महान राष्ट्रकार्यासाठी टाळ्या वाजवा. कारण या वेळचा लेख ‘वंदे भारत विरुद्ध भारतीय’ या आशयाचा आहे.

येथे असाही प्रश्न निर्माण हाेताे की, ‘नरेंद्र माेदींचा प्रभाव कमी हाेत आहे का?’ ते केवळ पंतप्रधानपदापर्यंत पाेहाेचले असेच नव्हे, तर त्यांनी दाेन वेळा पूर्ण बहुमत मिळवले आहे आणि साऱ्या विराेधकांचे नामाेनिशाणही मिटवले. तेच स्व. इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक चतुर आणि सर्वात चाणाक्ष राजकीय नेते ठरले. त्यांची राजकीय प्रतिमा तीन मुद्द्यांवर आधारलेली आहे. पहिली बाब म्हणजे शानदार वक्तृत्व आणि संदेश देण्याची क्षमता, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि निर्णय घेण्याची क्षमता तसेच तळागाळातील भारतीयांशी संवाद साधण्याची खुबी. जेणेकरून प्रत्येक गरिबाला त्यांच्याशी संबंधित असल्यासारखे वाटते. माेदी सर्वांनाच आठवण करून देतात की, सत्तेवरून पायउतार व्हावे लागले तरी मला त्रास हाेणार नाही. मी शबनम उचलीन आणि निघून जाईन. ‘फकीर’ व्यक्तीकडे गमावण्यासारखे असते तरी काय? पंतप्रधान माेदींना पूर्ण कल्पना आहे की, खरे व्हीआयपी गरीब आणि नाेकरदार वर्ग आहे, शहरी तसेच उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीय लाेक नाहीत. कारण एका भारतीय नेत्याला स्वत:साठी निवडणूक जिंकायची तर असतेच, पण ३०० अन्य उमेदवारांनाही निवडून आणायचे असते. परंतु काेराेना विषाणूच्या प्रभाव काळातील त्यांचे सारे संदेश मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांसाठीच का आहेत?

माेदींची नारेबाजी पाहा : टाळी, थाळी, टाॅर्च, लाइट. बाल्कनी किंवा माेकळ्या जागेत या. असे वाटते की, ६ व्या वर्षी माेदींचे राजकारण इतके गाेंधळले की बाल्कनीवाले हेच खरे भारतीय असे समजते आहे. अखेर भारतातील किती मतदारांकडे बाल्कनी आहे? किती जणांकडे स्वत:चे घर आहे? किती जणांच्या डाेक्यावर न गळणारे छत आहे? काेट्यवधी लाेक आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहतात. खिडकी नसलेल्या आणि आगपेटीच्या आकाराच्या खाेलीत १४ लाेक राहतात. लाेकांचे लाेंढे एकीकडे निघत असताना ५० दिवसांनंतरही काेणी बडी असामी या लाखाे लाेकांविषयी सहानुभूती व्यक्त करण्यास आली नाही, जणू या लाेकांचे काही महत्त्व उरलेच नाही. हे लाेक आपल्या राज्य सरकारसाठी जणू संकट बनले आहेत.

गरिबांना एका रात्रीत श्रीमंत बनवता येत नाही, ना लाखाे लाेकांना विमान प्रवास घडवता येताे. परंतु, व्यथा समजून घेणे ही काही आगळी बाब असते. या लाखाे लाेकांचा आवाज भाजपतून काेण बनला आहे? काेणी त्यांच्या व्यथा समजून घेतेय? आधार देत आहे? उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडचे मुख्यमंत्रीच काही प्रयत्न करत आहेत. त्यांची राजकीय समज अजून शाबूत आहे. ते वास्तव जवळून आेळखतात. परंतु, माेदीदेखील प्रत्यक्ष वास्तव समजून घेतात हे गृहीत धरणे तसे कठीणच नाही का?

शेखर गुप्ता, एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’

Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...