आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमेद 2021:राज्यांच्या निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उदारमतवादी स्वभावाचा बंगाल भाजपचे हिंदुत्व स्वीकारेल का, हा मोठा प्रश्न आहे.

२०२१ मध्ये राजकारण चाहत्यांना राज्यांच्या राजकारणातून रोमांच मिळेल. प. बंगाल, तामिळनाडू, आसाम व केरळ निवडणुकांचा धूमधडाका पाहण्यासारखा असेल. २०२१ राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात काही विशेष हालचाल होणार नाही. एक प्रकारचे जडत्व असेल, कारण दिल्लीच्या राजकारणात हालचाल तर सोडाच, पण व्यवस्थित चर्चा करू शकेल असा विरोधी पक्ष गायब आहे. नव्या वर्षात विधानसभा निवडणुकांचा रोमांच असेल. सर्वात आधी बंगालबद्दल बोलू. या निवडणुका जिंकणे हा भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. येथील २० टक्के मुस्लिम लोकसंख्या भाजपला हातखंडा असलेल्या ध्रुवीकरणाची पटकथा लिहिण्यास आधार देते. तिकडे ममतांच्या विरुद्ध सत्ताविरोधी मूड आहे, पण ममतांचे लढाऊ वृत्तीही कमी नाही. भाजप इथे जनाधार वाढवण्यासाठी ममतांवर तुष्टीकरण, बांगलादेशींचे लोंढे, भ्रष्टाचार याबाबत बोलत आहे, परंतु पक्षाचे केडर उभे करण्यात इथे सध्या आव्हान आहे. म्हणूनच टीएमसीचे नेते व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणणे ही त्यांची मोठी रणनीती आहे. भाजप इथेही मुख्यमंत्री कोण होईल, हे आधी सांगू शकणार नाही. म्हणूनच ही निवडणूक ममता विरुद्ध मोदी अशीच होईल. २०१९ मध्ये भाजपला १८ लोकसभा जागा आणि ४० टक्के मते मिळाली होती. परंतु, याची पुनरावृत्ती कठीण आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत भाजपला १० टक्के मते मिळाली, तथापि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते १७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. सध्या टीएमसी भाजपच्या पुढे असल्याचे ताजे सर्वेक्षण सांगते. बंगालची निवडणूक त्रिकोणी होईल. काही जागांवर एमआयएमही पुढे राहील. म्हणजे मुस्लिमबहुल १२५ जागांवर मतविभागणीची शक्यता आहे. उदारमतवादी स्वभावाचा बंगाल भाजपचे हिंदुत्व स्वीकारेल का, हा मोठा प्रश्न आहे.

तामिळनाडू निवडणुकांत किंगमेकर होण्यासाठी भाजप मैदानात उतरत आहे. द्रविड राजकारणात प्रथमच मोठा गैर-द्रविड पक्ष मोठ्या भूमिकेत उतरण्याची ही महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी उत्तर भारतातील हा हिंदी भाषिक पक्ष आपण तामिळ असल्याचे दाखवू इच्छितो. पंतप्रधान मोदींचे तामिळनाडूवर लक्ष केंद्रित करणे याकडे लक्ष द्या. शी जिनपिंग यांचे स्वागत तामिळनाडूत केले, मुरुगनचे वाहन असलेल्या मोराबरोबर फोटोही काढला. तामिळनाडूत उत्तरेतील ‘जय श्रीराम’ चालणार नसेल तर हे घ्या - मुरुगन म्हणजे श्रीगणेशाचा भाऊ कार्तिकेय. बहुतांश तामिळी मुरुगनला इष्टदेव मानतात.

नव्या तामिळनाडूच्या राजकारणाचा अक्ष आहे पेरियार. ते द्रविड चळवळीचे जनक होते. जातीय विषमतेविरुद्ध संघर्ष आणि समाजसुधारणेच्या आंदोलनाच्या या प्रणेत्याला कसे स्वीकारावे, यावरही भाजपमध्ये समांतर काम सुरू ङे. डीएमके-काँग्रेसला सत्तेपासून रोखणे ही भाजपची खेळी आहे. एआयडीएमकेविरुद्ध इथे सत्ताविरोधी लाट आहे. स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना भाजपच्या तिकिटावर उभे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कर्नाटकानंतर तामिळनाडूत स्थान बळकट झाले तप उत्तरेतील राज्यांवरील अवलंबित्व कमी होईल, ही मूळ कल्पना आहे.

डीएमके, डावे आणि काँग्रेस आघाडी मजबूत आहे, पण करुणानिधींच्या पश्चात त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. एम, के. स्टॅलिन करुणानिधींचे राजकीय वारसदार आहेत. म्हणून त्यांचे नाराज बंधू अलगिरी भाजपसोबत असतील. जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी कारागृहातून सुटी मागितली आहे. मुख्यमंत्री ई. पलानीसामी व ओ. पनीरसेल्वम हे दोघेही त्यांचे कृपापात्र होते. भावाचा पक्ष हाच पक्ष शशिकला यांचे राजकीय शस्त्र असेल. तामिळनाडूत या वेळी नक्कीच नवे समीकरण पाहायला मिळेल. गैर-द्रविड राजकीय पात्रांना हे राज्य कितपत स्थान देते, हे पाहावे लागेल. केरळमध्ये डाव्या आघाडीला हरवणे हे भाजपचे जुने स्वप्न आहे. मुस्लिम व ख्रिश्चन हा केरळात मोठा फॅक्टर आहे. कम्युनिस्ट पक्ष व भाजप एकमेकांचे कट्टर वैरी आहेत, परंतु इथे हिंदू मतदार डाव्यांचा मोठा जनाधार आहेत. म्हणजे भाजपला पाय रोवण्यासाठी डाव्या आघाडीच्या मतदारांना आकर्षित करावे लागेल. २०२१ च्या राज्य निवडणुकांमध्ये भाजप जिंकला तर हे आणखी एक ऐतिहासिक वर्ष ठरेल. परंतु, या निवडणुकांकडे लोक मोठ्या प्रमाणावर लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहतात, कारण भाजपने उत्तरेत मोठे यश मिळवले आहे. तेथील संभाव्य नुकसानीच्या भरपाईसाठी या हरित प्रदेशात जिंकणे भाजपसाठी गरजेचे आहे. २०२१ च्या राज्य निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी एक निश्चित, भाजपने निवडणुकांचे शास्त्र ज्या कल्पनातीत स्तरावर नेले आहे त्याचे नवे भाग येत राहतील आणि विरोधी पक्ष हे शास्त्र समजून घेण्यासाठी या वर्षीही संघर्ष करत राहील.

(‘द क्विंट’चे संपादकीय संचालक संजय पुगलिया)

बातम्या आणखी आहेत...