आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृष्टीकोन:काँग्रेसकडून नेतृत्वाचे दहा धडे : काय करू नये?

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमकुवत होणाऱ्या काँग्रेसकडून भारताची तरुण पिढी जीवनासाठी आवश्यक अनेक धडे घेऊ शकते

काँग्रेस स्वत:चे पुनरुत्थान कसे करू शकते, याबाबतचा हा लेख नाही. अशी आशा जागवण्याचा प्रयत्न केला तर माझी खिल्ली उडेल. पण नेता म्हणून काय करू नये याचा एक छान धडाच काँग्रेस आपणास देत आहे. कॉर्पोरेट्स किंवा स्टार्टअप्स या संस्थांमध्ये असलेल्या सध्याच्या आणि भावी नेत्यांसाठी १० व्यावहारिक धडे....

कनिष्ठांना दोष देऊ नका : अनेक काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त करण्याचे धाडस केले तेव्हा नेतृत्वाची पहिली प्रतिक्रिया ही पत्रलेखकांना दोषी ठरवणारी होती. त्यांनी त्यांना गद्दार म्हणून संबोधले आणि पत्र लिहिण्याच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले. चिंतांबाबत चर्चाच केली नाही. नेते म्हणून असे करू नका. टीमचे म्हणणे ऐका.
बैठकांमध्ये वेळ घालवू नका : कार्यकारिणीची ७ तास चालणारी बैठक म्हणजे एक नाटक होते. बैठकीऐवजी, मी कोठेही जाणार नाही, असा चार शब्दांचा ई-मेल केला असता तरी चालले असते. तेव्हा वेळ वाया घालवू नका.
डायनासोर बनू नका : भारतीय परंपरा व इतिहासात मुळे असण्याखेरीज भाजप सर्वात जास्त तांत्रिक कौशल्ये असणारा पक्ष आहे. भाजप अॅमेझॉनप्रमाणे वाढणारा व नव्या सीमा काबीज करणाऱ्या कंपनीप्रमाणे आहे, तर काँग्रेस लालाजीच्या दुकानाप्रमाणे आहे. तेथे नोकरांवर राग काढला जातो. तेव्हा लालाजी बनू नका.
डोळे बंद ठेवू नका : विशेषाधिकार एकच असतो, पण राहुल गांधी यांच्याकडे कमकुवत करणारा अधिकार आहे. काही लोक समोरच्याचे गुण ओळखून त्याचा सन्मानही करतात, त्याच्यासोबत काम करून यशस्वीही होतात. पण राहुल गांधी यांच्यासारखा महान विशेषाधिकार जगाला वेगळ्या दृष्टीने पाहतो. तुम्हाला वाटते, तुम्ही राज्य करण्यासाठीच जन्मलेले आहात. नकारात्मक प्रतिक्रिया या तुम्हाला मूर्खपणा व जळफळाट वाटतो. तेव्हा नेतृत्व म्हणून आत्म-जागरूक राहा.
मतदारांकडे दुर्लक्ष करू नका : तुम्ही कोणाच्या सेवेच्या व्यवसायात असता तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. २०११ पासून काँग्रेस बदलावी, अशी मागणी देश करत आला आहे. पण असे वाटते की, काँग्रेस नेतृत्वाने हेडफोन लावले आहेत, ज्यात मोठ्या आवाजात संगीत वाजत आहे. गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व करावे वा अप्रत्यक्ष प्रभावित करावे हे भारतीयांना नको आहे... काय म्हणालात? माफ करा. संगीताचा आवाज मोठा आहे.
कामावर पूर्ण निष्ठा ठेवा : तुम्हा वरिष्ठ पदसिद्धांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. खरे उद्योजक फार मेहनत घेतात. आपले पंतप्रधान किती तास काम करतात ते सर्वांना माहीत आहे. अॅलन मस्क, झुकेरबर्ग, सुंदर पिचाई हे सारे खूप मेहनत करतात. काँग्रेसच्या पत्राने सांगितले की, नेतृत्व पूर्ण वेळ काम करत नाही. असे करू नका.
तुमच्या मर्यादांकडे दुर्लक्ष करू नका : राजकारण्याकडे चांगली भाषणकला असणे गरजेचे आहे. स्पष्ट, स्क्रिप्ट न घेता राहुल गांधी जोशपूर्ण भाषण देऊ शकत नाहीत. नेत्यांना जनतेची नस पकडता आली पाहिजे. राहुल असे करू शकत नाहीत. गरजेनुसार युती करणे, सहकाऱ्यांना सोडणे हे चांगल्या नेत्यासाठी आवश्यक गुण आहेत. राहुल यांनी असे कधी केले नाही. समस्या तुमच्या मर्यादा असू नयेत, त्या समजून घ्याव्यात.
चमच्यांच्या गोतावळ्यात राहू नका : टीम तुमचे सतत कौतुकच करत असेल आणि तुमच्यावाचून राहू शकत नसेल तर ते चांगले नाही. प्रगती होण्यामध्ये चमचे अडथळा आहेत. भाजपही यापासून दूर नाही, पण काँग्रेसमधील खुशामत याही पुढच्या पातळीची आहे. पराभव होऊनही काँग्रेस नेत्यांच्या गर्दीत राहिला आणि आपण काही चुकीचे केले नाही, याची खात्री देत राहिला. कुणीही खुशामतखोर जवळ ठेवू नका.
घाबरट बनू नका : तुम्ही कुशल नसाल तर हुशार व्यक्तींना नेमा, पण तुम्ही हिंमत या अंगभूत कौशल्याला नोकरीवर ठेवू शकत नाही. नेता बनण्यासाठी धाडसी पावले उचलणे गरजेचे असते. यात गांधी दोषी नाहीत, पण काँग्रेसमध्ये बदल गरजेचा आहे, हे जाणणारे काँग्रेसजन दोषी आहेत, पण त्यांच्यात तसे सांगण्याची हिंमत नाही. आपण आवाज उठवला तर बाकीचे चमचे आपल्यावर हल्ला करतील, अशी भीती त्यांना आहे. मोदींनी पंतप्रधान होण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना मागे टाकले. त्यांचे हे मोठे धाडस होते, यात त्यांचे करिअर संपले असते. तेव्हा नेता म्हणून साहस दाखवा.
स्वार्थी बनू नका : आज कमकुवत काँग्रेसमुळे देशात खरा विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. ही बाब लोकशाही आणि देशासाठी भयंकर आहे. पण काँग्रेस नेतृत्वाला भारत किंवा लोकशाहीची पर्वा नाही. तुम्ही एखादी संघटना चालवत असता तेव्हा सार्वजनिक हिताचाही विचार केला पाहिजे.
व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे असे धडे दिल्याबद्दल काँग्रेसला धन्यवादच दिले पाहिजेत. आशा आहे की, त्यांनी असेच धैर्य सोडत राहावे, जेणेकरून देशाची तरुण पिढी त्यांच्याकडून महत्त्वाचे धडे शिकत राहील.

इंग्रजी कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com (चेतन भगत)

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser