आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थव्यवस्था:सरकारने ठरवलेले निकष आणि मर्यादेपलीकडे जाण्याची गरज

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोविड-१९ ने संकटांसोबतच उद्योजकांसाठी एक नवीन संधी आणलीय

सुनीलकुमार सिन्हा 

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर आर्थिक वर्ष २०१६ मध्ये आठ टक्के आणि २०१७ मध्ये ८.२ टक्के होता, परंतु त्यानंतर जीडीपीत घट होण्यास सुरुवात झाली. एनएसओने २ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या पत्रकात २०२० मध्ये विकास दरात पाच टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. पण कोविड १९ च्या संक्रमणामुळे देशाचे पूर्ण वातावरण बदलून गेले. हे बदल इतके जलद आणि वेगाने झालेत की यामुळे संपूर्ण जगात आर्थिक आणि वाणिज्य प्रक्रिया पंगू झाली. या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे आकलन करणे हे आव्हानात्मक झाले आहे. 

कोविड-१९ मुळे अर्थव्यवस्थेवर काही प्रारंभिक स्वरूपात दिसून येणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत (i) बऱ्याच उत्पादन क्षेत्रातील पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे उत्पादन थांबेल (ii) पर्यटन, सेवा क्षेत्र आणि हवाई वाहतूक क्षेत्र जवळजवळ कोसळण्याच्या मार्गावर आहेत. (iii) आरोग्य सेवा क्षेत्रातील कामाचा ताण आणि बोजात लक्षणीय वाढ झालीय. याव्यतिरिक्त प्रत्येक क्षेत्राच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये आर्थिक प्रवाहाचे संकट दिसून येऊ लागले आहे. याचा अर्थ असा नाही की इतर क्षेत्रांवर काही परिणाम झाले नाहीत. खरे तर बँकिंग, आयटी आणि आयटी उद्योगाशी संबंधित क्षेत्रात कामासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग केल्यामुळे यांना थोड्या प्रमाणात फायदा झाला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्यामुळे त्यांनी स्थिर करून घेतलं.  इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स संस्थेच्या अंदाजानुसार, या वर्षी मार्चमध्ये, अनपेक्षित भांडवल (इक्विटींमधून ५२.४ अब्ज डॉलर्स आणि कर्जातून ३१.० अब्ज डॉलर) काढले गेले आहे. या अनपेक्षित भांडवलाची परतफेड म्हणजे फक्त चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी भारताला भांडवली खात्याचा आधार नसेल. पण चांगली गोष्ट म्हणजे जागतिक आर्थिक क्रियेत कमी मागणीमुळे कच्च्या तेलासारख्या जागतिक वस्तूंच्या किमती आणि भांडवली वस्तूंच्या मागणीत घट झाल्यामुळे चालू खात्यातील तूट ही नियंत्रणात राहील. पण देशांतर्गत वापरासाठी भांडवलातून निधीचा वापर होणे ही वाईट बातमी आहे.

अर्थव्यवस्थेला अजून एक धोका कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. रब्बी पिकांचा हंगाम असून त्याची काढणी व वेळेवर खरेदी प्रक्रियेत अडथळा हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला धक्का देणारी बाब आहे. दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थिती, अन्नधान्याच्या किमतीत घट यामुळे गेल्या सहा वर्षांपैकी मागील तीन वर्षांत ग्रामीण मागणीत यापूर्वीच मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनिवार्य व्यवसाय संस्था आणि मल्टिप्लेक्स बंद केल्याने अनेक क्षेत्रांवर परिणाम झालाय. ग्राहक वस्तू, करमणूक, खेळ, घाऊक व्यापार, वाहतूक, पर्यटन, आतिथ्य इत्यादी वस्तूंची मागणी कमी झाली आहे. यामुळे विजेच्या मागणीतही घट झाली आहे.

एक म्हण आहे की, प्रत्येक संकट नवीन संधी असते. कोविड-१९ नेही तेच केले आहे. अनेक जागतिक उत्पादन कंपन्या स्वत:चा धोका कमी करण्यासाठी चीनबाहेरून उत्पादन सुरू करू इच्छितात. त्याशिवाय ऑटोमोबाइल, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायनांमधील पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्राला या पुरवठा साखळीचा भाग होण्याची संधी आहे. शिवाय यासाठी सरकारचा व्यापक आणि धोरणात्मक पाठिंबा आवश्यक आहे. याचा फायदा भारताला किती प्रमाणात होईल याचा अर्थव्यवस्थेत सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्याच्या गतीवर तसेच या संधीचा फायदा घेण्याच्या भारतीय व्यवसायाच्या क्षमतेवर अवलंबून असेल. याचा फायदा उठवणे सोपे नाही, कारण भारतीय अर्थव्यवस्था उत्पादन आणि विक्रीत घट याच्याशी झगडत आहे आणि आर्थिक व्यवस्थेतही अडचणी आहेत. तेलाचे कमी दर कायम राहिल्यास भारताची जागतिक स्पर्धात्मकता आणि निर्यातीत सुधारणा होऊ शकते. परंतु वाढता संरक्षणवाद आणि अत्यल्प बाह्य मागणी यामुळे या चॅनलवरील फायद्यांमुळे शटडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई होऊ शकेल असे नाही.

कोविड-१९ आणि लॉकडाऊनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोघांनी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि अनुपालनासह सरकारने आतापर्यंत समाजातील सर्वात प्रभावित घटकांसाठी घोषणा केल्या आहेत. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने वित्तीय यंत्रणेत त्वरित येणाऱ्या अडचणी टाळल्या आहेत आणि अनेक नियम शिथिल करून आपला ताण कमी केला आहे. ही सर्व महत्त्वपूर्ण पावले आहेत, परंतु संकटाचे परिमाण लक्षात घेता अजून बरेच काही करणे आवश्यक आहे आणि जर याचा अर्थ विवेकी नियम व मर्यादेच्या पलीकडे जाणे असा असेल तर सध्या हेच योग्य आहे.

बातम्या आणखी आहेत...