आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:काेराेनाच्या वाढत्या चिंतेतून मुक्त हाेण्याची खरी गरज

Aurangabad3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीबीमुळे दरवर्षी ४.३५ लाख लाेकांचा बळी जाताे, मात्र काेविड-१९ इतके भय वाटत नाही

चेतन भगत 

काेणत्याही नव्या ‘क्ष’ नावाच्या अाजाराविषयी कल्पना करा, ताे हवेच्या संसर्गातून फैलावणारा अाणि धाेकादायक अाहे. दरवर्षी भारतात २८ लाख लाेक अाजारी पडतात अाणि ४.३५ लाख रूग्ण दगावतात म्हणजे सरासरी १२०० लाेक दर तासाला मृत्युमुखी पडतात. जर हीच अाकडेवारी सतत तुमच्या टीव्ही स्कीनवरील काेपऱ्यात दर्शवली गेली तर काय वाटेल? तुम्ही अस्वस्थ व्हाल? घाबरून जाल? अर्थातच हा संदर्भ टीबी विषयीचा हाेता. टीव्हीवर या अाजाराविषयीची माहिती, नव्या रुग्णांचा तपशील प्रेक्षकांसमाेर मांडत नाहीत की, साेशल मिडीयाच्या काेणत्याही प्लॅटफाॅर्मवर मेसेज फिरत नाहीत. त्यामुळे कैक वर्षात लाॅकडाऊनचा प्रसंग उद्भवला नाही. परंतु टीबी तर अस्तित्वात अाहे. भारतात दरवर्षी ज्या टाॅप टेन कारणांमुळे मृत्यू हाेतात त्यात टीबीचा समावेश अाहे. मात्र टीबीची कधी भीती वाटली नाही. एखाद्या अनाेळखी, अनपेक्षित बाबीची अापणास अधिक भीती वाटते. नाेवेल/काेविड-१९ असाच असून त्याच्या नाेवेल्टी (नवेपणा)मुळे साऱ्या जगात चिंता अाणि भयाचे काहूर उठले अाहे. तुम्ही म्हणाल, टीबीवर उपाय अाहे; खरे तर टीबीच्या अनेक प्रकरणांत अाैषधे परिणामकारक ठरत नाहीत अाणि त्यामुळे दरवर्षी लाखाे लाेकांचा मृत्यू हाेताे. काेणी म्हणेल टीबीवर लस उपलब्ध अाहे. तरीही रूग्णांची संख्या अाणि मृतांची अाकडेवारी वाढतच अाहे. जर टीबीची घातकता कमी असेल, तर दरराेज १ हजाराहून अधिक लाेक का दगावतात? तरीही काेराेनाप्रमाणे अापल्याला टीबीची भीती का वाटत नाही? कारण टीबी ही गरीबांशी निगडीत अाजार अाहे, ताे मध्यमवर्गियांपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता तशी कमी असावी, त्यामुळे कदाचित काेराेना इतकी त्याची भीती वाटत नसेल.

काेविड-१९ अतिशय निराळा अाहे. गाैरवर्णिय, जगातील दिग्गज नेते अाणि अांतरराष्ट्रीय विमान प्रवास करणारे धनाढ्य लाेकांना त्याने लक्ष्य बनवले अाहे. म्हणजे त्याचा संसर्ग काेणालाही हाेऊ शकताे. मात्र टीबी केवळ खास वर्गातल्या लाेकांना हाेताे. काेराेना मला देखील हाेऊ शकताे इतकी त्याची व्याप्ती अाहे म्हणूनच प्रसारमाध्यमे त्यास प्राधान्य देत अाहेत. अाता वेगळ्या पद्धतीने हा विषय समजून घेऊ. अारूषी हत्याकांड अाठवा, जाे अनेक महिने प्रसार माध्यमात चर्चेत हाेता. त्यावर चित्रपट, डाॅक्युमेंट्री अाली. इथे फरक लक्षात घ्या, एखाद्या अादिवासी किंवा दुर्गम गावातील मुलीचे अपहरण झाले असते तर काय प्रसारमाध्यमांनी अारूषी प्रमाणे कव्हरेज दिले असते? जर याच देशातील उच्च वर्गातील अारूषी सुरक्षित नाही तर अन्य काेणतीही मुलगी-मुलगा सुरक्षित नाही. जर बाेरीस जाॅन्सन किंवा लाखाे अमेरिकनांना काेविड-१९ चा संसर्ग हाेऊ शकताे तर भारतात काेणालाही ताे हाेऊ शकताे. म्हणूनच काेविड-१९ ला प्रसारमाध्यमांतून कव्हरेज मिळत अाहे, परिणामी त्यामुळे चिंता अधिकच वाढत चालली अाहे.

प्रत्येकाकडे इंटरनेट उपलब्ध झाले अाणि काेविड-१९ चे अागमन झाले. साऱ्या जगभर क्षणार्धात माहिती पाेहाेचणे शक्य झाले. सार्सच्या काळात लाेकांकडे स्मार्ट फाेन नव्हता. त्या वेळी मी हांॅगकांॅगमध्ये हाेताे, जे सार्सचे केंद्रबिंदू हाेते. मास्क वापरणे, सतत हात धुरे अशा बाबी काटेकाेर पाळल्या जात हाेत्या परंतु लाॅकडाऊन नव्हता. अाज काेविड-१९ ने जगातील लाेकांच्या मेंदूचा माेठा भाग व्यापला असून सतत तणाव वाढत चालला अाहे. शटडाऊनमुळे व्यापार, अर्थव्यवस्था अाणि नाेकरीचे काय हाेणार? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला अाहे. सीएमअायईच्या मते गेल्या दाेन अाठवड्यांच्या तुलनेत बेराेजगारीचे प्रमाण सात टक्के वाढून २३% वर पाेहाेचले अाहे. ही चिंता याेग्य नव्हे, यामुळे अापले मनाेबल खचते अाणि गंभीर मानसिक अाजार हाेऊ शकताे.

यापासून बचाव करण्याचे काही उपाय असे- काेराेना विषयीच्या बातम्या सतत पाहू नका, लाॅकडाऊन अाणि साेशल डिस्टन्सिंगच्या निमित्ताने टाेकाचे पाऊल उचललेले अाहेच, यापेक्षा अधिक काय करू शकता? काय अाता स्वत:ला साखळीने बांधून घेता? त्यामुळे बातम्यांचा स्वत:वर परिणाम करवून घेऊ नका. केवळ तुमच्या प्रकृतीवर, मनस्वास्थ्यावर परिणाम हाेईल. हा विषाणू देखील नाहीसा हाेईल, अनेक देशांमध्ये त्याचा प्रकाेप उच्च पातळीला पाेहाेचल्यानंतर अाता त्याचा परिणाम कमी हाेत चालला अाहे. लाॅकडाऊनच्या काळात तुम्ही काही निराळे प्राेडक्टिव्ह काम करू शकता का, याचा विचार करा. स्थिती सामान्य झाल्यानंतर तुम्ही काय करू शकाल याचे नियाेजन करा. अापल्या क्षमतेनुरूप सारी सावधगिरी बाळगा अाणि ईश्वरावर विश्वास ठेवा, अाशा बाळगा की सारे ठीक हाेईल. जे व्हायचे ते हाेणारच अाहे, चिंता केल्याने काही साध्य हाेणार नाही. भगवद्गीतेत म्हटले अाहे, अभय हा ईश्वरीय अात्म्याचा सर्वात माेठा गुण अाहे. म्हणूनच सर्वांना चिंतामुक्त लाॅकडाऊनच्या किंबहुना चिंतामुक्त अायुष्याच्या शुभेच्छा! 

बातम्या आणखी आहेत...