आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्या गतीने काेरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, ते लक्षात घेता लाॅकडाऊनला मुदतवाढ अपेक्षित हाेती. अाता ३ मेपर्यंत लाॅकडाऊन असेल. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेशी चौथ्यांदा संवाद साधला. लाॅकडाऊनचा कालावधी वाढेल, मात्र त्यातून काही क्षेत्रांना सूट मिळेल, असा अंदाज होता. उद्योग क्षेत्राकडून सरकारवर याबाबतीत फार मोठा दबाव येत होता. मात्र आरोग्य व्यवस्था की अर्थव्यवस्था यामध्ये पंतप्रधानांनी आरोग्यालाच अधिक प्राधान्य दिले. म्हणूनच त्यांनी अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान आणि सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना या लॉकडाऊनमुळे चुकवायला लागलेली किंमत ही भारतीयांच्या जिवापेक्षा मोठी नाही, असे उद्गार काढले. १९ दिवसांची ही नवीन टाळेबंदी हा काही फक्त मोदींचा निर्णय नाही तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेऊन टाकला होता. सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच पंतप्रधानांनी टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळेत टाळेबंदी लागू करणे, तिचा कालावधी वाढवणे यामुळेच भारत काेरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर थांबला, हेही लक्षआत घेतले पाहिजे. पंतप्रधानांनी जनतेला कोणतेही नवीन “टास्क’ न देता अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जगातील सामर्थ्यशाली देशांमध्ये काेरोनाचे आकडे पाहिले तर त्या तुलनेत भारतात चांगली स्थिती आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा ा मोठा फायदा झाला, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मात्र तरीही त्यांच्या भाषणात उणीव होती ती आकडेवारीची. देशात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची योजना, पीपीई किट्सची कमतरता, स्थलांतर केलेल्या कोट्यवधी असंघटित कामगारांच्या रोजीरोटीच्या उपाययोजना, बेरोजगारीचा वाढणारा दर यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर यावळीही पंतप्रधांनांनी मौन बाळगणे पसंत केले. आता प्रश्न टाळेबंदीचा नाही, त्यानंतर उद्भवणाऱ्या भयावह परिस्थितीचा असून पंतप्रधानांनी चारही भाषणांत त्यावर चकार शब्दही काढलेला नाही. दिवसागणिक नव्हे, तर तासागणिक अर्थव्यवस्था खचत चालली आहे. सुखवस्तू घरांतील रहिवाशांना चार भिंतीत डांबावे लागल्याने फार काही बिघडेल असे नाही. पण रोजगाराअभावी घरात राहावे लागलेल्यांचे काय, हा मुद्दा आहे. या वर्गाच्या हातास काम मिळेल अशी धोरणे तातडीने आखावी लागतील. “जगामधील काेरोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने काेरोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहाेत. काेरोनाचे बाधित १०० होण्याच्या आधीच भारताने विदेशी नागरिकांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण सक्तीचे केले. काेरोनाचे फक्त ५५० बाधित भारतात होते, तेव्हाच भारताने २१ दिवसांचा लॉकडाऊन केला. समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. जगातल्या बड्या देशांचे आकडे पाहता भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे,’ असे पंतप्रधानांनी अावर्जून स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.