आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तुपाठ:सारे जग चीनवर अवलंबून, कोविड-19 ने घडवला प्रत्यय

Aurangabad3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाने स्पष्ट केले की, साऱ्या जगातील जीवनमान बदलेल; ते अाता पूर्ववत हाेणार नाही

अॅना सोफिया सॉलिस

काेराेना विषाणूने केवळ जगाचे वर्तमान स्वरूप बदलले असेच नव्हे, तर अापल्या भविष्याची दिशा बदलणार अाहे. ज्या पद्धतीच्या जीवनशैलीचा पुरस्कार अापण केला हाेता, त्यात खूप माेठे परिवर्तन हाेऊ जाणार अाहे. कदाचित ते अनंतकाळपर्यंत असेल. साेमवारपर्यंत या विषाणूमुळे जगभरात ७३,६०४ लाेकांचा बळी गेला. अजून १३,२३,००० लाेक संसर्गबाधित अाहेत. सामाजिक अाणि अार्थिकदृष्ट्या काेविड-१९ माेठा समानतावादी अाहे. भावनात्मक अाणि मानसिक पातळीवर या विषाणूने हे दाखवून दिले की, या जगात कुणीही सुरक्षित नाही अाणि अाम्ही सारेच सारखे अाहाेत. समाजातही माेठा बदल जाणवताे अाहे, ताे पैशाच्या समृद्धीएेवजी जीवनाला अधिक प्राधान्य देऊ लागला अाहे. विशेषत: देखभाल अाणि संवेदनांना महत्त्व देऊ लागला अाहे. फायनान्स, मार्केटिंग अाणि जाहिरात क्षेत्रातील प्राेफेशनलएेवजी अाता डाॅक्टर, नर्स, डिलिव्हरी ड्रायव्हर अाणि सुपर मार्केटचे कर्मचारी खरे हीराे ठरत अाहेत. जगभरातील लाेकांना जीवदान देणाऱ्या अाराेग्य कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवणे, त्यांचा उत्साह वाढवणे या उपक्रमांतून पैशाच्या प्रतिष्ठेला अाव्हान दिले जात असल्याचे अाणि जीवनमूल्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येते.

या महामारीच्या काळात चीनवर सारे जग अवलंबून असल्याचे दिसून अाले. साऱ्या जगाला चीनने स्वस्तात माल पुरवला अाणि लाभाच्या माेहाने सारे जग त्यावर विसंबले. परिणामी अापली सारी यंत्रणा, संसाधने अडगळीत टाकली अाणि चिनी कारखाने, कामगार अाणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर डाेळे लावून बसलाे. जेव्हा वुहानमध्ये काेविड-१९चा उद्रेक झाला तेव्हा चीनची उत्पादक साखळी माेडून पडली त्यासरशी साऱ्या जगातील बाजारपेठेवर माेठे संकट काेसळले. या घटनेस पुरता महिना हाेण्यापूर्वीच डाऊ जाेन्सच्या सरासरी ३० प्रमुख कंपन्यांचे शेअर्स २०% गडगडले. पाउंडदेखील गेल्या ३५ वर्षांच्या तुलनेत न्यूनतम स्तरावर येऊन ठेपला. मात्र अाश्चर्यकारक बाब ही ठरली की, अाैषध, तेल, डिलिव्हरी कंपन्या अाणि सुपर मार्केटमध्ये हळूहळू परंतु सतत वाढ हाेत राहिली.

स्कूल अाॅफ अाेरिएंटल अँड अाफ्रिकन स्टडीज या पुस्तकामध्ये लाॅरेन्स सायज यांनी २०११ मध्ये म्हटले हाेते की, २० वर्षांत चीन महाशक्तीच्या रूपात अमेरिकेला मागे टाकेल. अाज अापण २०२० मध्ये अाहाेत अाणि हा दावा खरा ठरेल असे वाटते अाहे. काेविड-१९ ने महासत्तांमधील दरी अधिक रुंद केली अाहे. विशेषत: अमेरिका एक विभाजित अाणि दुबळा देश बनला अाहे. अमेरिकेत विकली जाणारी ९७% अँटिबायाेटिक्स चीनकडून पुरवण्यात येतात. हेल्थ केअर हीच ताकद असल्याचे चीनने अाेळखले. जेव्हा सारे जग काेराेना विषाणूच्या अनुषंगाने चीनवर दाेषाराेप करीत हाेते त्या वेळी चीननेच अांतरराष्ट्रीय पातळीवर मदत अाणि सहकार्य केले. जेव्हा सैन्य दल, शस्त्रास्त्रे अाणि पैसा अापल्याला वाचवू शकत नाहीत तेव्हा एकता कामाला येते. बेल्जियमला चीनने ३ लाख मास्क माेफत पुरवले अाणि त्यावर इंग्रजी, फ्लेमिश अाणि चिनी भाषेत ‘एकता हीच शक्ती’ असे लिहिले हाेते. साऱ्या युराेपीय समुदायाने इटलीकडे डाेळेझाक केली तेव्हा त्यास मदत करणारा हाच चीन हाेता. चीन अाता साऱ्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असून त्यास फायदाही हाेत अाहे.

मानवाने कितीही प्रयत्न केले तरी विजय नेहमीच निसर्गाचा हाेत अाला. काेराेना विषाणूने हेच पुन्हा दाखवून दिले. चीनमध्ये काेविड-१९चा उद्रेक झाल्यानंतर कारखाने बंद पडले अाणि कार्बन डायअाॅक्साइडचे उत्सर्जन २५%ने कमी झाले. उत्तर इटलीतील वाहतूक कमी झाल्याने कार्बन डायअाॅक्साइडची पातळी ५-१०% कमी झाली. जगभरातील विमान, रस्ते, रेल्वे, सागरी वाहतूक बंद असल्यामुळेही हे उत्सर्जन कमी झाले अाहे. वन्य जीवांनी शहरे, पाणी अाणि जंगलांवर अापला दावा सांगण्यास सुरुवात केली अाहे. अाेडिशात सुमारे साडेचार लाख सागरी कासवांनी किनारपट्टीवर अंडी दिली अाहेत. व्हेनिस नदीचे कालवे स्वच्छ झाले असून त्यातील मासे दिसत अाहेत. जगभरातील लाेक फळे अाणि भाज्यांकडे वळत अाहेत. हा काेविड-१९ चा परिणाम म्हणावा लागेल. या विषाणूचा प्रकाेप अाेसरल्यानंतर पुन्हा अापणा साऱ्यांची धावपळ सुरू हाेईल. मात्र काही ठाेस वस्तुपाठ, अादर्श अापल्याकडे असतील. अाजवरच्यापेक्षाही निराळ्या पद्धतीने कसे जीवन कंठता येते, वेगळी जीवनशैली कशी अंगीकारता येऊ शकते ही काेराेनामुळे मिळालेली शिकवण अापणा साऱ्यांसाठी अतिशय माैल्यवान ठरेल.

बातम्या आणखी आहेत...