आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख : सरकारी सक्तीचे स्वागत करा

Aurangabad6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारी सक्तीचे स्वागत करा

भारत सध्या कोरोना साथरोगाच्या संकटाला तोंड देत अाहे. त्या पृष्ठभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अर्थात कुठे-कुठे पोलिस लाठीमार करताना दिसले. विशेषत: शहरात लोकांनी स्वत:ला आपल्या घरात कोंडून घेतले. पण महत्त्वाचे म्हणजे या आवाहनाने संपूर्ण देशाला आगामी अडचणींप्रति चैतन्य आणि मानसिक रूपात तयार केले.  या व्हायरसशी लढण्याचे मुख्य हत्यार म्हणजे ‘सामाजिक-व्यक्तिगत स्तरावर एकांत.’ या एकांतामुळे हजारो प्रकारच्या अडचणी येतील आणि कोट्यवधी लोक त्याला विरोध करतील हे निश्चित होते. त्यामुळेच सरकारची भूमिका अनिवार्य होते. रेल्वे वाहतुकीसह प्रत्येक प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालणे, रोगाच्या संशयितांचे बळजबरीने विलगीकरण करून त्यांना उपचारासाठी बाध्य करणे, खासगी रुग्णालयांतून या रोगासाठी वेगळ्या बेडचा बंदोबस्त करणे आणि बाजारावर अंकुश ठेवणे इत्यादी उपाय करणे आजच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारची अनिवार्यता झाली आहे. लोकांनी त्याकडे सकारात्मकदृष्ट्या पाहावे. एका सुशिक्षित गायिकेलाही ते समजत नाही, शेकडो लोकांची ती जाहीर कार्यक्रमांत भेट घेते किंवा एक खासदार-खेळाडू क्वाॅरंटाइनमधून बाहेर पडून राष्ट्रपतींच्या चहापान कार्यक्रमात सहभागी होत असेल तर त्याला काय म्हणावे? त्याचा विचार करणे गरजेचे आहे. कोट्यवधींच्या संख्येत मजूर जनावरांप्रमाणे भरून दोन दिवसांचा प्रवास करून आपल्या गावी जात आहेत. किती लोक या आजाराचे बळी ठरले आहेत याची माहिती न घेता आणि आपल्या मूळ राज्यात जाऊन तेथे संपूर्ण गावाला संकटात आपण लोटत आहोत याचा विचार न करताच हा प्रकार होत आहे. अशिक्षितपणामुळे काही लोक या आजाराची लक्षणे समोर आणण्याएेवजी ती लपवण्याचा गुन्हा करत आहे. त्यामुळे रोगाची लक्षणे लपवण्याएेवजी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगावी आणि स्वत:ही ‘क्वाॅरंटाइन’साठी तयार राहावे यासाठी प्रत्येकाला शिक्षित करण्याची जबाबदारी कुटुंब आणि व्यक्तीची आहे, हे संपूर्ण समाजाने लक्षात घ्यावे. आपले स्वत:चे कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी हे करावे. कुठल्याही सदस्यात रोगाची लक्षणे दिसली तर त्याची माहिती आरोग्य विभागाला अवश्य देण्यासाठी कुटुंबानेही सतर्क राहावे. देशाला या संकटातून वाचवण्याचा मार्ग स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नांतून सुरू होतो, शहामृगासारखी भूमिका घेऊन नव्हे हे लक्षात ठेवावे.

0