आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बचाव:ट्रम्प यांचे ‘आवडते औषध’ खरेच गेमचेंजर ठरेल का?

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मलेरिया प्रभावित देशांमध्ये कोरोना पीडितांची संख्या इतर देशांच्या तुलनेने अत्यंत कमी आहे

राघव चंद्रा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-१९ च्या उपचारांसाठी मलेरियाविरोधी औषधांच्या खरेदीसाठी दबाव निर्माण करत निर्यातीवरील बंदी शिथील करायला भाग पाडले व निर्यातीवरील बंदी उठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, हे आपल्या तर्काच्या पलीकडे आहे. कोरोनाच्या रुग्णांवर मलेरियाविरोधी औषध प्रभावी ठरतात हे काेणत्याही वैद्यकीय निकषावर सिध्द झालेले नाही.

खरंतर ट्रम्प यांचे निकटवर्तीय सल्लागार आणि मेडिकल विशेषज्ञ फॉसींनी पण याचे समर्थन केलेले नाही. तरी पण मलेरियाविरोधी औषधांना घेऊन ट्रम्प इतके काळजीत का आहेत? बऱ्याच दशकांपासून मलेरिया विरोधात लढणाऱ्या भारतापेक्षा अधिक या औषधांना कोण समजू शकेल? भारतात मलेरियासाठी वापरले जाणारे औषध हे कुनैन आहे, जे दक्षिण अमेरिकेत सापडणाऱ्या चिंचोना या झाडाच्या खोडापासून मिळते.

ज्या क्लोरोक्वीनची मागणी अमेरिका करत आहे ते याच्यावरच केमिकल प्रक्रिया करुन तयार केले जाते. जे १९३४ साली जर्मनीने तयार केले आणि नंतर अनेक भारतीय कंपन्या याची निर्मीती करू लागल्या. १८ व्या आणि १९ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी डासांचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात भारतीय राजे-महाराजांबरोबर युद्ध करत होती त्यावेळी पहिल्यांदा आपल्या सैनिकांना कुनैनचे टॉनिक वॉटर पिण्याचा सल्ला द्यायची. हे जिन आणि टॉनिक इतकं लोकप्रिय झालं होत की सर्वच व्यायामशाळेत आणि जगभरातलं महत्त्वाचं ड्रिंक म्हणून याची ओळख निर्माण झाली. आता ही बाजारात कुनैन मिश्रित अनेक पेय उपलब्ध आहेत. त्यामुळे हा संशोधनाचा विषय आहे की मलेरिया आणि कोविड-१९मध्ये परिस्थितीजन्य काही साम्य आहे का नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये जगभरात २२.८० कोटी मलेरियाच्या केसेस समोर आल्या आहेत, जे त्यापूर्वी २३.१० कोटी होत्या. मलेरियाच्या सर्वात अधिक केसेस या अाफ्रिका त्यानंतर दक्षिण पुर्व आशियामध्ये आहेत. खासकरुन अाफ्रिका आणि भारतासारख्या देशात मलेरियाचा ८५ टक्के भार आहे. जगात सहा सर्वाधिक प्रभावित देश आहेत त्यात नायझेरिया, कॉन्गो, युगांडा. आइवरी कोस्ट, मोजाम्बिक आणि नायजेरिया यांचा समावेश आहे. जगातील एकुण केसेसपैकी भारतात २.५ टक्के आढळतात. अफ्रिकन देश आणि भारताशिवाय व्हियतनाम, म्यानमार, थायलंड, अर्जेंटिना, ब्राझील आणि बांग्लादेशातही मलेरियाचे प्रमाण आहे. या सर्व देशात कुनैन या औषधानेच उपचार केले जातात. जर आता आपण कोरोना संक्रमणाचे प्रमाण पाहिले तर जागतिक सरासरी ही दहा लाख लोकसंख्येमागे २४७ व्यक्ती इतकी आहे. पण मलेरिया मुक्त देशांमध्ये कोविड-19 रुग्णाच्या संख्येचे प्रमाण हे अधिक आहे. स्पेनमध्ये ३६३८, इटलीत २६३८, स्विझरलॅडमध्ये २९६८, बेल्जियममध्ये २६३९, फ्रांसमध्ये २०९, जर्मनीत १५५२, अमेरिकेत १७७३, नेदरलॅडमध्ये १५५० तर ब्रिटेनमध्ये १३०५ इतके प्रमाण आहे. पण मलेरिया प्रभावित देशात याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे प्रमाण मोजाम्बिकमध्ये ०.७, म्यानमारमध्ये १.०, व्हियतनाममध्ये ३.०,बांग्लादेशमध्ये ५.०, भारतात ८.० पाकिस्तानात २५, थायलंडमध्ये ३५ तर दक्षिण आफ्रिकेत ३८ आहे. शिवाय मलेरियाचा प्रादुर्भाव असणाऱ्या दक्षिण अमेरिकेत कोविड-१९ च्या केसेस तुलनेन कमी आहेत.

असं नाही की मलेरिया प्रभावित देशांचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक संबंध नाहीत. अाफ्रिकेचा चीनसोबत २०० अब्ज डॉलर व यूरोपीय यूनियन सोबत ३०० अब्ज डॉलर इतका व्यापार आहे. व्हिएतनाम १२२ अब्ज डॉलरचा व्यापार करत चीनच्या टॉप १० व्यापारी भागीदारांमध्ये समाविष्ट आहे. भारत, थायलंड, बांग्लादेश यांचेही चीन सोबत दृढ व्यापारी संबध आहेत. पण हे स्पष्ट आहे की ट्रम्पकडून मलेरियाचे औषध आणि कोविड-19 चे उपचार याचा संबंध लावणे याचा अर्थ आपण समजू शकतो. पण भारताने मलेरिया औषधांच्या निर्यातीवरील बंदी उठवणे म्हणजे संकटाच्याकाळी आंतरराष्ट्रीय सहाय्य करणे असे मानले जाऊ शकते. पण इथं एक गंभीर विचार उपस्थित होतो की भारतीय वैद्यक संशाेधन परिषद कुनैनसारखे रोगप्रतिकारक औषध तयार करु शकत नाही काय? जे कमी किंमतीत सामान्य लोकांना उपलब्ध करुन दिले जाईल. आणि त्यामुळे मलेरिया आणि कोरोना विरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवता येईल. भारतात कधीच कुनैन टॉनिक वॉटरच्या वापरावर आक्षेप घेण्यात आला नाही. पण एक अडचण अशी आहे की हे महाग आहे. योग्य वेळेतच या दिशेने आपण विचार करुन काहीतरी पावले उचलणे गरजेचे आहे म्हणजेच हे औषध फक्त अमेरिकेसाठी नाही तर कोरोनाच्या लढाईत भारतासाठीही गेमचेंजर ठरेल.

बातम्या आणखी आहेत...