आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्न:रेल्वेखाली मजुरांचा बळी हे सरकारी धाेरणांचे अपयश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामध्ये कितवा क्रमांक असेल याचा अंदाज नाही, पण ५० दिवसांपासून आपला रोज मृत्यू होत आहे काय?

ज्यांनी रेल्वेत बसून जायचे तेच जेव्हा रेल्वेखाली चिरडले जातात तेव्हा त्या बिचाऱ्यांचा नव्हे, तर आपलाच मृत्यू हाेत असताे. आपला मृत्यू तेव्हादेखील हाेताे, जेव्हा आपण ही केवळ एक दुर्घटना मानताे. उदा. रस्त्यावर एखाद्या कार-ट्रकचा अपघात. (कदाचित हे मजूर रेल्वेसमाेर उभे राहून धडकले असते, जसे चीनच्या तियानमेन चाैकासमाेर एक सामान्य व्यक्ती रणगाड्याला धडकली हाेती - किमान शहीद तरी ठरले असते!) रेल्वेचे रूळ ही काही झाेपण्याची जागा आहे का? असे आपण बडबडताे तेव्हा आपण हत्येत सामील हाेताे आणि आपला मृत्यू तेव्हा हाेताे, जेव्हा आपण मान्यवर लाेकांचे शाेकसंदेश वाचून आनंद लुटताे. विचार करा की अजून काय म्हणू शकलाे असताे? असेही म्हणू शकलाे असताे की, मजूरच तर हाेते, ते मृत्यू पावले तर काय झाले? इतके लाेक मरतात, काेणा-काेणाकडे लक्ष द्यायचे? त्यांचा मृत्यू हा त्यांच्याच भूमिकेचा परिणाम आहे?

जेव्हा आपण सरकारी चाैकशीच्या निष्कर्षाची वाट पाहत असताे तेव्हाही आपला जीव गेलेला असताे. काेणाची चाैकशी हाेणार? बिचाऱ्या रेल्वेचालकाच्या डाेक्यावर सारे खापर फुटेल का, ज्याला भल्या पहाटेच्या वेळी रेल्वे रुळावर काही लाेक झाेपले आहेत हे दिसले नाही? ज्याने एवढी माेठी रेल्वे थांबवण्याचा आटाेकाट प्रयत्न केला, परंतु ती थांबवू शकला नाही?  जे थकल्यामुळे काही वेळासाठी रेल्वे रुळावर डाेके टेकवून पहुडले असतील ते बेशिस्त मजूर दाेषी ठरतील का? रुळाशेजारी विखुरलेल्या भाकरींची चाैकशी हाेईल का? ज्या भाकरीच्या लालसेने हे मजूर शहर साेडून आपल्या गावी परत निघाले हाेते त्या रेल्वे रुळावर चुरगळून पडलेल्या नाेटांच्या तुकड्यांची चाैकशी हाेणार का? ज्यांच्या आदेशावरून हे मजूर पायी चालत जाण्यासाठी मजबूर झाले त्या बड्या अधिकाऱ्यांची चाैकशी हाेईल का?

आपला मृत्यू तेव्हा हाेताे, जेव्हा आपण राेज लाॅकडाऊन असतानाही हाेणाऱ्या मृत्यूंकडे डाेळेझाक करताे. आैरंगाबादजवळच्या अपघातापूर्वी लाॅकडाऊनमुळे ३५६ जण दगावले (याचा सारा तपशील thejeshgn.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.) यापैकी सर्वाधिक संख्या काेराेना पाॅझिटिव्ह असल्याच्या शंकेने आत्महत्या करणाऱ्यांची आहे, जे उपासमारीने आणि पैशाअभावी मृत्यू पावले किंवा रस्ते अपघातात दगावले. काेराेनाच्या प्रत्येक घटनेची माेजदाद ठेवणाऱ्या माध्यमांनी कधी या आकडेवारीचा विचार केला का? त्यांच्याकडील आकडेवारीत रुग्णालयात पाेहाेचू न शकल्यामुळे किंवा उदरभरणाची सामग्री संपल्याने उपासमारीमुळे मृत्यू पावलेल्या लाेकांचा समावेश नाही. 

आपला मृत्यू तेव्हाही झालेला असताे, जेव्हा मृत्यूची वाट पाहत असताे. देशभरात लाॅकडाऊन लागू करताना आपण अजिबात विचार करत नाही की, स्थलांतरित आणि राेजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे काय हाेईल?  अर्थमंत्री मदतीचे पॅकेज जाहीर करतात तेव्हा आपण विचारतही नाही की, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांचे काय हाेणार? माध्यान्ह भाेजन बंद करून सरकारने ‘लंगर’ सुरू करावे, अशी मागणीही आपण करत नाहीत. अशा संकटसमयीही सरकार गहू-तांदळाच्या भावात ताेल-माेल का करीत आहे? घरात बंद कुटुंबाला भाकरीसाेबतच पैशाचीही गरज असू शकते याचा विचार देशातील सर्वाेच्च न्यायालयही करीत नाही.आपला मृत्यू तेव्हा हाेताे, जेव्हा गाठाेडे उचलून रस्त्यावर चालणाऱ्या मजुरांचे तांडे टीव्हीवर पाहत असताे. जेव्हा बातमी टीव्हीच्या स्क्रीनवरून निघून जाते तेव्हा आपण समजताे की, हा प्रश्न सुटला. जेव्हा राेज मजूर शेकडाे किलाेमीटर अंतर चालून जात असल्याच्या बातम्या थरारकथेप्रमाणे वाचताे, जेव्हा यात्रेकरू आणि भाविकांना लक्झरी बसमधून आणले जाते आणि गरीब मजुरांना रस्त्यावर फरपटत जाण्यासाठी साेडून दिले जाते आणि आपण गप्प राहताे. विदेशातून भारतीय नागरिकांना माेफत विमान प्रवासाद्वारे आणले जाते आणि स्थलांतरित मजुरांना प्रवास भाडे मागितले जाते. जेव्हा सत्ताधारी म्हणतात की, आम्ही तर प्रवास भाड्यापैकी ८५% खर्च उचलत आहाेत आणि आपण त्यावर विश्वास ठेवताे.

आपला मृत्यू तेव्हा हाेताे, जेव्हा देशभरातील कामगार कायदा एका रात्रीत बदलून टाकला जाताे आणि आपण लक्ष देत नाही. जेव्हा सरकारे देशी-विदेशी कंपन्यांना खुले आमंत्रण देतात की, ‘तुम्ही गुंतवणूक करा, कामगारांची काळजी करू नका’ आणि आपण गुंतवणुकीचे आकडे माेजण्यात व्यग्र हाेताे. गेल्या ५० दिवसांत काेराेनामुळे देशात १८९० जणांचा मृत्यू झाला. यापुढे अधिक लाेक दगावणार नाहीत अशी आशा करूया. सध्या काेट्यवधी लाेकांचा चरितार्थ हिरावला आहे. हे दिवस लवकर बदलू शकतील अशी आशा करूया. परंतु आपली सामाजिकता आणि संवेदनांचा जाे मृत्यू झाला त्याचे काय?

योगेंद्र यादव, सॅफॉलॉजिस्ट आणि स्वराज इंडियाचे अध्यक्ष

Twitter :@_YogendraYadav

बातम्या आणखी आहेत...