आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोपनीयतेबाबत व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा चर्चेत आहे. तपास वेबसाइट ProPublica ने एका अहवालात खुलासा केला आहे की व्हॉट्सअॅपने सुमारे 1,000 कंटेंट रिव्ह्यूअर नियुक्त केले आहेत. हे कंटेंट रिव्ह्यूअर व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे कंटेंट पाहतात. म्हणजेच, व्हॉट्सअॅपवरील तुमचा कंटेंट पूर्णपणे खासगी नाही.
ProPublicaच्या या अहवालामुळे वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक, व्हॉट्सअॅप दावा करतो की त्यांच्या यूजरचा कंटेंट एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहे. म्हणजेच, व्हॉट्सअॅप यूजर्स काय शेअर करत आहेत हे कंपनीलाही माहीत नाही, पण व्हॉट्सअॅपचे कर्मचारी यूजर्सचा कंटेंट वाचत, पाहत आणि ऐकत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
ProPublicaचा अहवाल काय सांगतो? याबद्दल काय वाद आहे? व्हॉट्सअॅपने या विषयावर काय म्हटले आहे? आणि व्हॉट्सअॅपवरील तुमचा कंटेंट सुरक्षित आहे का?, हे जाणून घ्या सविस्तर...
सर्वप्रथम हे संपूर्ण प्रकरण काय आहे? ते जाणून घ्या
ProPublica ने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअॅपने अशा सुमारे 1000 लोकांना नियुक्त केले आहे, जे यूजर्सचा कंटेंट तपासतात. यासाठी कर्मचाऱ्यांना एक विशेष सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. हे कर्मचारी ऑस्टिन, टेक्सास, डब्लिन आणि सिंगापूर येथील कार्यालयांमधून काम करतात.
त्यांची नियुक्ती टेक कंपनी एक्सेंचरद्वारे केली जाते. नियुक्तीच्या वेळी त्यांना 'कंटेंट रिव्ह्यूअर' हे पद दिले जाते. या कामासाठी, या नियंत्रकांना एका तासासाठी सुमारे 1200 रुपये मिळतात.
ही टीम कशी काम करते?
व्हॉट्सअॅपने या टीमला एक खास सॉफ्टवेअर दिले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे ही टीम व्हॉट्सअॅपच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) द्वारे हेट स्पीच किंवा इतर कोणत्याही श्रेणीसाठी ओळखलेले संदेश वाचू शकते. टीम कंटेंटवर बंदी घालू शकते, नंतर तपासासाठी टॅग करू शकते किंवा कोणतीही कारवाई न करता सोडू शकते.
या विषयावर व्हॉट्सअॅपचे काय म्हणणे आहे?
व्हॉट्सअॅपचे डायरेक्टर ऑफ कम्युनिकेशन्स कार्ल वूघ यांनी कबूल केले की, ऑस्टिन आणि इतरत्र कंत्राटदारांची एक टीम आहे जी संदेश वाचनाचे काम करते, परंतु ही टीम केवळ रिपोर्ट करण्यात आलेला कंटेंट वाचू शकते. ते म्हणतात की, या टीमचे काम फक्त असा कंटेंट वाचणे आहे जे यूजर फसवणूक, बाल अश्लीलता, द्वेषयुक्त भाषण, दहशतवादी षड्यंत्र आणि इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदवतात.
तर तुमचे मेसेजेस पण दिसू शकतात का?
सायबर तज्ज्ञ सनी वाधवानी आणि अविनाश जैन यांच्या मते तसे नाही. व्हॉट्सअॅप केवळ तोच कंटेंट बघतो जो रिपोर्ट केला गेला आहे. जर कंपनीकडे जर कोणत्याही आशय अहवालाबद्दल तक्रार केली तर त्याच्या रिव्ह्यूसाठी कंटेंट पहावा लागतो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्हॉट्सअॅप मेसेजची पोर्नोग्राफी कंटेंट म्हणून तक्रार केली तर तुमची तक्रार कंपनीकडे जाईल. आता आशय न पाहता कंपनी तुमच्या तक्रारीवर कसे कार्य करू शकते? आपल्या रिपोर्टवर कारवाई करण्यासाठी, कंटेंट बघणे आवश्यक आहे. त्यानंतरच कंटेंट अश्लील आहे की नाही यावर निर्णय घेतला जाईल.
व्हॉट्सअॅपने माझा कंटेंट बघितल्यास माझे काय नुकसान आहे?
तुम्ही जर असा विचार करत असाल की मी फक्त व्हॉट्सअॅपवर मित्रांशी बोलतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपने माझा कंटेंट पाहिला तरी माझे काही नुकसान होणार नाही. पण तसे नाही. व्हॉट्सअॅप जाहिरातींसाठी तुमच्या संभाषणाचा वापर करू शकते.
बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की, गूगलवर काही सर्च केल्यानंतर तुमच्या सोशल मीडियावर त्याच संबंधित जाहिराती दिसू लागतात. त्याच प्रकारे, व्हॉट्सअॅप देखील तुमचा डेटा वापरू शकतो. समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याबद्दल बोललात. व्हॉट्सअॅप हे संभाषण ट्रॅव्हल कंपन्यांसोबत शेअर करू शकते आणि तुम्हाला प्रवासाशी संबंधित जाहिराती दाखवू शकते. त्या बदल्यात व्हॉट्सअॅप कंपन्यांकडून पैसे घेईल.
तर व्हॉट्सअॅपचे एंड-टू-एंड इनक्रिप्शन फक्त पब्लिसिटी स्टंट आहे का?
व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्सना एंड-टू-एंड इनक्रिप्शन सुरक्षा प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे. व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटनुसार, एंड-टू-एंड इनक्रिप्शन म्हणजे तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे पाठवत असलेला कंटेंट तुम्ही आणि रिसिव्हर वगळता इतर कोणीही वाचू शकत नाही. अगदी व्हॉट्सअॅप सुद्धा नाही.
सनी वाधवानीच्या मते, तुमचा कंटेंट एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपवर जे शेअर करत आहात ते पूर्णपणे सुरक्षित आहे. पण कंपनीकडे तुमचा आशय डिक्रिप्ट करण्याचा पर्याय देखील आहे, परंतु तुमचा कंटेंट रिपोर्ट केला गेला किंवा एखादी लॉ एजन्सीने व्हॉट्सअॅपकडून कंटेटविषयी माहिती मागितली तरच ते असे करू शकतात.
व्हॉट्सअॅप गोपनीयतेबाबत कधीकधी वादात सापडले आहे
मग वाद काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.