आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • 100% Marks For Practicals And Internal Assessment Will Be Added, Theory Marking Is Different, There Are 1 Not 5 Formulas To Give 12th Marks

CBSE चा फॉर्मुला 100 गुणांसाठी नाही:प्रॅक्टिकल आणि इंटर्नल असेसमेंटचे 100% गुण जोडले जातील, थिअरचे मार्किंग वेगळे, बारावीत गुण देण्यासाठी एक नव्हे तर पाच फॉर्मुले

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी -

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थातच CBSE ने बारावीच्या सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांना 30:30:40 फॉर्मुल्याने गुण देण्यासाठी हा टेबल जारी केला आहे. विद्यार्थी आणि पालक व्हॉट्सअ‍ॅपसह इतर प्लॅटफॉर्मवर हा टेबल समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही हा टेबल तयार करणा-या 13 लोकांच्या समितीचे सदस्य संयम भारद्वाज यांच्याशी बातचीत केली आणि सोप्या भाषेत हा फॉर्मुला समजून घेतला.

30:30:40 फॉर्मुलानुसार आपल्या गुणांचा अंदाज बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी -

 • पहिले: अकरावीच विषय बदलणा-या विद्यार्थांच्या मार्किंगसाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या एकूण गुणांची गणना करण्यासाठी कोणताही थेट फॉर्मुला नाही. सध्या तुम्ही कोणत्याही विषयातील एकुण गुण काढू शकणार नाहीत.
 • दुसरे: 30:30:40 चा हा फॉर्मुला केवळ थिअरीवर लागू केला जाईल. बारावीच्या प्रॅक्टिकल आणि इंटर्नल असेसमेंटचे गुणही 100% जोडले जातील. हे गुण अद्याप बहुतेक विद्यार्थ्यांना माहित नाही. मात्र सीबीएसईचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना इंटर्नल असेसमेंटचे तेच गुण मिळतील, जे यापूर्वीच सीबीएसई पोर्टलवर शाळेने अपलोड केले आहेत.
 • तिसरे : प्रॅक्टिकल असलेल्या विषयांचे कॉम्बिनेशनदेखील प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगवेगळे आहे. त्यामुळे सीबीएसईने पाच फॉर्मुले दिले आहेत.

फॉर्मुला 1: दहावी - अकरावीतून ते 24-24 आणि बारावीतून 52 गुण
हा फॉर्मुला आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सीबीएसईत बारावीच्या आर्ट्सच्या विषयात 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांचे प्रॅक्टिकल्स असतात. थिअरच्या 80 गुणांच्या मार्किंगसाठी दहावी - अकरावीत 30% -30% म्हणजेच 24-24 गुण आणि बारावीतून 40% म्हणजे 32 गुणांचा फॉर्मुला लागू केला जाईल. यामध्ये बारावीच्या असेसमेंटमधून 52 आणि दहावी, अकरावीतून 48 गुणांची मार्किंग असेल.

फॉर्मुला 2: दहावी -अकरावीतून 21-21 आणि बारावीतून 58 गुण
यामध्ये सायन्स विषयाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची मार्किंग होईल. कारण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयात 30 गुण प्रॅक्टिलचे असतात. उर्वरित थिअरच्या 70 गुणांमध्ये दहावी-अकरावीतील 21-21 आणि बारावीतून 28 वर मार्किंग केली जाईल. जर तुम्ही 12 वीच्या प्रॅक्टिलचे 30 गुणांची भर घातली तर 58 गुण आणि मागील दोन वर्गातील 42 गुणांची मार्किंग होईल.

फॉर्मुला 3: दहावी - अकरावीतून 18-18 आणि बारावीतील 64 गुण
होम सायन्ससह आर्ट्स विषयांचे असे कॉम्बिनेशन असते, ज्यात प्रॅक्टिकलचे गुण 40 पर्यंत पोहोचतात. यात दहावी - अकरावीतून एकूण 36 आणि बारावीतील 64 गुणांसाठी मार्किंग केली जाईल.

फॉर्मुला 4: दहावी -अकरावीतील 15-15 आणि बारावीमधील 70 गुण
शारीरिक शिक्षण हे कॉम्बिनेशन असलेल्या विषयाचे प्रॅक्टिकलचे गुण 50 पर्यंत असू शकतात. याचे संपूर्ण असेसमेंट केवळ 12 वीच्या आधारे केले जाईल. दहावी व अकरावीतून 30 आणि 12 वीच्या थिअरीतील 20 गुणांवर मार्किंग केले जाईल.

फॉर्मुला 5: दहावी-अकरावीतील 9-9 आणि बारावीतील 82 गुण
गेल्या काही वर्षांत सीबीएसईने बारावीत काही प्रॅक्टिकल बेस्ड कोर्सेस सुरू केले आहेत. यामध्ये प्रॅक्टिकलचे गुण 70 पर्यंत असू शकतात. म्हणून 30:30:40 फॉर्म्युला केवळ 30 नंबरसाठी मार्किंग होईल. त्यापैकी दहावी-अकरावीतील केवळ 18 आणि उर्वरित 82 गुणांसाठी बारावीच्या असेसमेंटमधून दिले जातील

प्रॅक्टिलच्या गुणांचा कोणताही फॉर्मुला नाही, जेवढे मिळतील तेवढे सगळे जोडले जातील
आता बारावीच्या निकालात प्रॅक्टिकल असलेले विषय हा सर्वात मोठा घटक ठरणार आहे. CBSE च्या बाराव्या वर्गात 5 प्रकारचे विषय आहेत. यामध्ये, प्रक्टिकल्सचे गुण 20 गुणांपासून सुरु होऊन 70 गुणांपर्यंत जातात. फॉर्मुला केवळ थिअरीवर लागू आहे, त्यामुळे काही असे विषय असतील ज्यात 100 पैकी 70 गुणांची मार्किंग केवळ बारावीच्या प्रॅक्टिकलच्या आधारे केली जाईल. उर्वरित 30 गुणांपैकी दहावीतून 9 गुण , अकरावीतून 9 गुण आणि बारावीतून 12 गुणांच्या मार्किंग थिअरच्या निकालावर आधारित असेल.

100 गुणांपैकी किती गुण कसे मिळतील, हे आहे त्याचे कॅलक्युलेशन
दहावी, अकरावी, बारावीच्या मिड टर्म, प्री-बोर्ड, युनिट टेस्ट आणि 12 वी प्रॅक्टिकलच्या मार्कशीट घेऊन बसा. मग हा चार्ट पहा, यामध्ये आम्ही भोपाळच्या 12 वीच्या एका विद्यार्थिनीचे फिजिक्सचे गुण कॅलक्युलेट केले आहेत.

 • इयत्ता दहावीच्या फिजिक्सच्या थिअरी पेपरमध्ये या विद्यार्थिनीला 70 पैकी 66 गुण मिळाले आहेत. 30% नुसार तिला दहावीमध्ये फिजिक्समध्ये 19.8 गुण मिळतील.
 • अकरावीमध्ये तिला फिजिक्समध्ये 70 पैकी 62 गुण मिळाले. 30% नुसार, 11 वी मध्ये तिचा फिजिक्सचा स्कोअर 18.6 असेल.
 • बारावीच्या मिड टर्म, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्डमध्ये फिजिक्समध्ये सरासरीने तिला 70 पैकी 67 गुण मिळाले. 40% नुसार, तिचा 12 वी मध्ये फिजिक्सचा स्कोअर 26.8 असेल.
 • इतकेच नाही तर फिजिक्सच्या गुणांवरही, 30:30:40 सूत्राद्वारे 70 गुणांचे मूल्यांकन केले गेले. यामध्ये तिला 65.2 गुण मिळाले.
 • आता बारावीच्या प्रॅक्टिकलबद्दल सांगायचे तर हे विद्यार्थिनीच्या एकूण स्कोअरमध्ये प्रॅक्टिकलचे एकुण गुण जोडायचे आहेत. विद्यार्थिनीने सांगितले की, एकुण किती गुण मिळाले आहेत हे तिला स्पष्टपणे माहिती नाही. कारण बाहेरून आलेल्या परीक्षकांनी गुण सांगितलेले नाहीत. परंतु मित्रांमधून आणि काही शिक्षकांकडून तिला 30 पैकी 26 गुण मिळाले असल्याचे समजले आहे.
 • अशा परिस्थितीत फिजिक्सचा तिचा अंतिम निकाल 100 पैकी 91.2 असेल. अशाप्रकारे आपण प्रत्येक विषयाचे मार्किंग करु शकता.
बातम्या आणखी आहेत...