आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या काळात हे जाणून घेणे आवश्यक:रेमडेसिविर कधी घ्यावे? माश्यांनीही संक्रमण पसरते का? तुमच्या मनात येणारे 12 प्रश्न आणि त्याची उत्तरे

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योग्य वेळी उपचार केल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते.

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने सामान्य जनतेसोबतच डॉक्टरांनाही घाबरवले आहे. वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, आता संक्रमण हवेत आहे, यामुळे स्वतःचा बचाव करणे अजुनही अवघड झाले आहे. अशा वेळी कोरोनाविषयी अनेक प्रश्न आहेत जे लोक रोजच आपले मित्र, कुटुंबीय किंवा गूगलला विचारण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे आज आम्ही अशाच 12 प्रश्न आणि त्यांचे उत्तर घेऊन आले आहेत. जे सामान्य लोकांच्या मनात निर्माण होत आहेत.

1. कोरोना एक घातक आणि असाध्य आजार आहे?
वास्तविक कोरोना धोकादायक नाही, परंतु शरीरावर त्याचा काय परिणाम होतो ते घातक आहे. योग्य वेळी उपचार केल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते. सरकारी आकडेवारीनुसार भारतात सर्वाइव्हल रेट 98.6 टक्के आहे.

2. कोरोनाचा जास्त धोका वयस्करांना आहे, कमी वयाच्या लोकांना कोरोना संक्रमण धोकादायक नाही का?
आपण तंदुरुस्त नसल्यास किंवा वेळेवर उपचार न घेतल्यास हे कोणत्याही वयाच्या व्यक्तीस हानी पोहोचवू शकते. लठ्ठपणा, मधुमेह, दमा, कर्करोग किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त अशा रूग्णांमध्ये जास्त धोका असतो ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.

3. मला एक महिन्यापूर्वी कोविड झाला होता, मला पुन्हा कोरोना होऊ शकतो का? माझ्या शरीरात तर पुढचे 3-4 महिन्यांपर्यंत अँटिबॉडी असतील?
हो, होऊ शकतो. भारतासह इतर देशांमध्येही असे रुग्ण सापडले आहेत, जे एका महिन्याच्या आत पुन्हा एकदा संक्रमित झाले आहेत. तसेच त्यांचे ब्लड टेस्टमध्ये अँटीबॉडी आढळलेल्या नाहीत. यामुळे मास्क घाला, हात धुवा आणि सोशल डिस्टेंसिंग ठेवा.

4.एसपीओ2 म्हणजेच ऑक्सिजन लेव्हल किती असावी, कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पाहिजे?
एका नॉर्मल व्यक्तीचे ऑक्सिजन लेव्हल 95 - 99 दरम्यान असते. जर तुमचे Spo2 95 च्या खाली आले तर सतर्क व्हा, घरी एमरजेंसी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करु शकता. तर जर Spo2 92 च्या खाली आले तर तत्काळ डॉक्टरांसोबत संपर्क करुन सल्ला घ्या आणि अॅडमिट व्हा.

5. कोरोना रुग्णांना रेमडेसिविर कोणत्या परिस्थितीमध्ये दिले जाते?
हमीदिया रुग्णालयाचे अधिक्षक आणि राज्य सरकारचे कोविड सल्लागार डॉक्टर लोकेंद्र दवे यांनी सांगितले की, रेमडेसिविर अशा रुग्णांना दिले जाते ज्यांना लंग इन्वॉल्वमेंट वाढले असेल. किंवा ताप उतरत नसेल. गरज नसूनही हे घेणे हानिकारक ठरु शकते कारण यामुळे लंग आणि हार्टवर सूज येऊ शकते.

6. कोणते औषध जास्त फायदेशीर आहे Hydroxychloroquine की Ivermectin?
हायड्रोक्सीक्लोरीक्वीन किंवा इतर कोणतेही औषध कोविड संक्रमण थांबवू शकत नाही. तसेच हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या दुरुपयोगाने अनेक जीवघेणे दुष्परिणाम होऊ शकतात. डॉक्टर दवेंनुसार या दोन्हीही औषधांचा कोविड पेशेंट्सवर जास्त प्रभाव दिसलेला नाही. यामुळे WHO ने या दो्हीही औषधांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. लक्षात ठेवा की, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. केवळ तुमच्या शरीराची क्षमताच तुमची मदत करु शकते.

7. दारु प्यायल्याने कोरोना संपतो?
नाही. दारु प्यायल्याने कोविड-19 संक्रमणापासून तुमची सुरक्षा होऊ शकत नाही, हे हानिकारक ठरु शकते.

8. माश्या आणि डासांनी COVID-19 पसरते का?
आजपर्यंत याचा कोणताही पुरावा किंवा माहिती नाही की, COVID-19 व्हायरस माश्या किंवा डासांमुळे पसरु शकतो. COVID-19 व्हायरस प्रमुखरित्या संक्रमित व्यक्तीच्या शिंकल्याने किंवा खोकल्याने किंवा तुम्ही संक्रमित पृष्टभागाला स्पर्श करुन डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्याने पसरतो.

9. उन्हात उभे राहिल्याने आणि 25 डिग्रीपेक्षआ अधिक तापमानात कोरोना होऊ शकत नाही?
तुम्हाला COVID-19 होऊ शकतो, विसरु नका की, भारतात कोरोनाच्या दोन्हीही लाटा या उन्हाळ्यातच आल्या होत्या. यासोबतच उष्ण देशांमध्येही COVID-19 ची प्रकरणे समोर आली आहे. तुमचे संरक्षण वातावरण नाही तर मास्क करेल.

10. जर 10 सेकंद श्वास थांबवू शकत आहे तर मला कोविड नाही का?
COVID-19 चे सर्वात मान्य लक्षण कोरडा खोकला, थकवा आणि ताप आहे आणि याच्या पुष्टीसाठी सर्वात चांगली पध्दत ही RT-PCR टेस्ट करणे आहे. तुम्ही श्वास रोखून याची पुष्टी करु शकत नाही.

11. लस घेतल्यानंतर मी एकदम सुरक्षित आहे? आता कोरोना झाला तरी मला नुकसान होऊ शकत नाही
कोरोना एक खूप नवीन आणि जटिल आजार आहे. डॉक्टर आणि वैज्ञानिक आपले बेस्ट देऊन औषधे आणि लस बनवत आहेत. पण तेवढ्याच झपाट्याने हा व्हायरसही नवीन स्ट्रेन बनवत आहे. व्हॅक्सीन एक प्रयत्न आहे की, पण तरीही हे समजून घेतले पाहिजे की, हा व्हायरस आता जगभरातील लोकांचा जीव घेत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण सुरक्षित राहणे आणि सुरक्षेत आपले बेस्ट देणे गरजेचे आहे.

12. कोरोनासंबंधीत सर्वात सामान्य मिथक काय आहे?
कोरोनासंबंधीत सर्वात मोठा मिथक आहे की, मला कोरोना होऊ शकत नाही. लक्षण आल्यानंतरही लोक विचार करतात की, व्हायरल असेल, किंवा खोकला आणि साधी सर्दी झाली आहे. खूप उशीरा उपचार सुरू होण्यामागे हे कारण आहे. यामुळे जर तुम्हाला लक्षण दिसत असतील तर तुम्ही तत्काळ टेस्ट करुन घ्या.

बातम्या आणखी आहेत...