आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नोत्तरांमध्ये CBSE चे नवे धोरण:सीबीएसई करणार 12 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पास! तरीही या 15 मुद्द्यांवर आहे शंका, सोप्या पद्धतीने येथे करा दूर

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नव्या फॉर्मुल्यावर परीक्षा न घेताच लागणार आहेत. यावर पुन्हा सुनावणी होत आहे. CBSE ने 17 जून रोजी Tabulation Policy Class 12th 2021 असे नवीन डॉक्यूमेंट जारी केले आहे. 17 पानांच्या या कागदांमध्ये बारावीच्या जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांना प्रोमोट करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. यात 33 मुद्दे नमूद करण्यात आले. पण, यावर विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम आहेत.

त्यामुळे आम्ही नव्या गाइडलाइन समजून सांगण्यासाठी CBSE च्या समिती सदस्यांसोबत बातचीत केली. सीबीएससी सदस्य संयम भारद्वाज आणि CBSE चे माजी संचालक डायरेक्टर अशोक गांगुली यांनी 15 प्रश्नोत्तरांमध्ये विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.

 1. आतापर्यंत बोर्डाकडूनच निकाल तयार केले जात होते, आता शाळांवर जबाबदारी आहे. हे कसे होणार? प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली जाणार आहे. दोन वरिष्ठ शिक्षक, दोन जवळच्या शाळांचे शिक्षक देखील असतील. मूल्यमापनाच्या वेळी विषयांचे शिक्षक सुद्धा समितीमध्ये असतील. यामध्ये एका आयटी एक्सपर्ट शिक्षकाचा देखील समावेश राहील. सीबीएसई सुद्धा शाळांना तांत्रिक मदत करणार आहेत.
 2. शाळा मनात आल्यासारखे गुण देतील का? नाही. शाळेचा मागच्या वर्षीचा सर्वात चांगल्या निकालाचा विचार केला जाईल. रेफरन्स ईयरमध्ये शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये कमाल 90 गुण मिळाले असतील तर यावेळी 85 किंवा 95 (+ किंवा -5) गुण मिळू शकतात. रेफरन्स ईयरमध्ये शाळेतील गणित विषयात 1% विद्यार्थ्यांचे गुण 33% पेक्षा कमी आले असतील तर यावेळी 33% पेक्षा कमी गुण आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी सुद्धा 1% एवढीच राहील. याचप्रमाणे, 75% ते 95% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20% राहिली असेल तर यावेळी सुद्धा त्या कोट्यात 20% विद्यार्थीच असतील. अर्थात संपूर्ण शाळेचा एकूण निकाल हा रेफरन्स ईयरच्या आधारे तयार केला जाईल.
 3. जर का शाळेने गाइ़डलाइनचे पालन केलेच नाही तर काय होईल? एखाद्या शाळेने असे केल्याचे निदर्शनास आल्यास त्या शाळेवर कारवाई होईल. सीबीएसई बोर्डाकडून त्या शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते. आर्थिक दंड लावला जाऊ शकतो किंवा त्या शाळेतून येणारे निकाल थांबवले जाऊ शकतात.
 4. कॉपी री-चेक सारखे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत, तर मग विकालांचे व्हेरिफिकेशन कसे होईल? सद्यस्थितीला तरी शाळांनी अपलोड केलेले निकाल हेच वैध मानले जातील. परंतु, निकालांची संपूर्ण प्रक्रिया योग्य पद्धतीने करून घेण्यासाठी सीबीएसईकडून आपला एक सदस्य शाळेच्या समितीवर नेमला जाऊ शकतो.
 5. पोर्टलवर एकदा अपलोड झालेल्या निकालात काही बदल शक्य आहे का? नाही. असे संशोधन किंवा दुरुस्ती शक्य होणार नाही.
 6. नवीन फॉर्मुल्यानुसार एखादा विद्यार्थी नापास झाला असेल तर? अशा विद्यार्थ्यांना इंसेन्‍शल रिपीट किंवा कम्पार्टमेंट श्रेणीत ठेवले जाईल. ते परीक्षा देऊ शकतील.
 7. विद्यार्थी या गुणांच्या फॉर्मुल्यावर समाधानी नसतील तर? अशात परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये मिळालेले गुण अंतिम मानले जातील.
 8. जे विद्यार्थी या वर्षी काही कारणास्तव असेसमेंटमध्ये सहभागी होऊ शकले नाही त्यांचे काय होईल? निकाल समितीकडून त्यांची तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यावरून मूल्यमापनाचा तर्क लावला जाईल.
 9. बारावीनंतर काही विद्यार्थी परदेशात प्रवेशासाठी प्रयत्न करतात, त्यांना काही समस्या येतील का? परदेशी विद्यापीठांमध्ये होणारे प्रवेश बारावीच्या मार्कांच्या आधारे होत नाहीत. परदेशात अकरावीचे मार्कच बारावीतील भावी मार्क म्हणून पाठवले जातात.
 10. एखाद्या शाळेत बारावीची पहिलीच बॅच असेल तर त्या ठिकाणी काय होईल? अशा शाळांना केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, स्वतंत्र, सरकारी ग्रँटेड अशा ज्या ग्रुपमध्ये असतील त्या ग्रुपनुसार आणि त्यांच्या जिल्हा, राज्य व देशाच्या तीन वर्षांच्या सरासरी परफॉर्मन्सच्या आधारे डेटा मिळेल. आणि ज्या शाळा दुसऱ्या बोर्डात समाविष्ट झाले असतील त्यांचे जुने परफॉर्मनन्स पाहून निकाल लावला जाऊ शकेल.
 11. काही शाळांमध्ये उच्च माध्यमिक विभागात 5 पेक्षा अधिक विषय शिकवले जातात, त्यांच्या गुणांचे गणित कसे लावले जाईल? अशा परिस्थितीत ज्या 3 विषयांमध्ये सर्वाधिक गुण असतील, ते मोजले जातील. यातील एखाद्या विषयांचा पूर्णांक 80 पेक्षा अधिक असला तरी 80 पूर्णांकाच्या हिशेबानेच गणित लावले जाईल.
 12. बारावीत आल्यानंतर कुणी विषय बदलले असेल तर काय? CBSE च्या परवानगीने विषय बदलले असतील तर 3 विषयांच्या गुणांच्या आधारे मूल्यमापन केले जाईल.
 13. अनेक शाळा अंतर्गत परीक्षांमध्ये मुद्दाम कठोर तपासणी करून कमी मार्क देतात, जेणकरून विद्यार्थी अंतिम परीक्षेत अधिक मेहनत घेतील. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही का? बोर्डाकडे बारावीच्या परीक्षांचे निकाल जारी करण्यासाठी ठराविकच पर्याय होते. त्या विकल्पांपैकी जो विकल्प सर्वात चांगला वाटला तोच घेण्यात आला आहे. तरीही शाळांना 5 मार्क वाढवणे किंवा 5 मार्क कमी करण्याचे अधिकार दिले आहेत.
 14. फॉर्मूल्यानंतरही समाधानी नसल्यास परीक्षा देण्याचा पर्याय आहे. पण अनेक मुले-मुली एक-एका मार्कासाठी मेहनत घेतात. अशात नेमक्या किती विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय निवडता येईल? बारावीच्या परीक्षेनंतर पुढील प्रवेशांसाठी एक-एक मार्क महत्वाचा असतो. अशात बहुसंख्य विद्यार्थी परीक्षा देतील अशी शक्यता आहे.
 15. अशा पद्धतीने तयार केलेल्या निकालांवरून महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये प्रवेशांचा गोंधळ उडणार नाही का? प्रत्यक्षात सहसा बारावीत कुणीही नापास होणार नाही. त्यामुळे, बहुतांश महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रवेशासाठी परीक्षा आयोजित करतील. दरवर्षी सरासरी 85% विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्च प्रवेश घेतात. यावेळी त्यांची संख्या 15% अधिक राहील. अशात सरकारला उच्च शिक्षणातील जागा वाढवाव्या लागतील.
बातम्या आणखी आहेत...