आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लाॅकडाऊनमुळे 150 कोटी मुलांची शाळा बंद, अभ्यास मागे पडला, भरपाई कशी होणार?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोराेनाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे तज्ञांचे म्हणणे
  • देशात 33 कोटी विद्यार्थ्यांमध्ये केवळ 10%च ऑनलाइन

भारतात शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या सुमारे ३३ कोटी आहे. यात केवळ १०% ऑनलाइन शिकू शकतात. केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याबाबत संस्थांना अनेक दिशानिर्देश दिले आहेत. यात फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशनचे नियम आहेत. तसेच शाळेत केवळ ३०-४०% विद्यार्थी संख्या असावी, असे बजावले आहे.

जगभरात शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिकेसह अनेक देशांतील सरकारे आता शाळा सुरू कराव्यात यासाठी दबाव टाकत आहेत. यात सरकारांसमोर दोन गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. पहिले हे की, विद्यार्थ्यांचे आतापर्यंत अभ्यासात झालेले नुकसान भरून कसे काढायचे व दुसरे हे की, शाळा सुरू केल्या तर पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील का? लॉकडाऊनमुळे जगभरातील १५० कोटी मुले घरीच आहेत. यातील ७० कोटी मुले भारत, बांगलादेशसारख्या देशांत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वाधिक परिणाम गरीब मुले व विशेषत: मुलींवर होत आहे. फ्रान्स, डेन्मार्क व न्यूझीलंडमध्ये नियमात सूट दिल्याने शाळांमध्ये मुले येऊ लागली आहेत. इंग्लंडमध्ये सप्टेंबरपासून शाळा सुरू होतील. ब्रिटिश सरकारने ३२२० कोटी रुपयांचा राष्ट्रीय शिकवणी कार्यक्रम सुरू केला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शाळा सुरू केल्या नाहीत तर अनुदान थांबवण्याचा इशारा दिला आहे. युनेस्को व मॅकेंझीने शिक्षणातील नुकसानीच्या भरपाईसाठी तीन प्रकारची धोरणे स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. १. शाळांना अभ्यासासाठी विद्यार्थ्यांवर जास्त वेळ द्यावा लागेल. २. अभ्यासक्रम नव्याने तयार करावा लागेल. ३. शाळा व शिक्षकांना शिकवण्याच्या पद्धती अधिक प्रभावी व दर्जेदार कराव्या लागतील.

बातम्या आणखी आहेत...