आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • 18+ Is Getting Vaccinated, There Is No Better Protective Shield From Corona Than This, Don't Miss This Opportunity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर नॉलेज सीरीज:18+ ना लस मिळतेय, कोरोनापासून यापेक्षा चांगले सुरक्षा कवच नाही, ही संधी सोडू नका

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसींच्या दुष्परिणामांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही : तज्ज्ञ

लस घेण्याचे फायदे अाणि ताेटे काय अाहेत ?
डाॅ. अजय परीख | फायदा : काेराेना संसर्ग झाला तरीही ९९ % रुग्णांवर घरीच उपचार हाेऊ शकतील हा लस घेण्याचा फायदा. रुग्णालयांवर भार पडणार नाही. व्हेंटिलेटर व अाॅक्सिजनची गरज भासणार नाही. काेराेना संसर्ग केवळ फ्लू म्हणून राहील. अमेरिकेच्या अाकडेवारीनुसार लस दिलेेल्या २४ काेटी लाेकांपैकी काही शंभर लाेकांनाच समस्यांना ताेंड द्यावे लागले अाहे.

ताेटा : खरं तर याच्या फायद्याच्या तुलनेत ताेटा काहीच नाही. काही लाेकांना गंभीर दुष्परिणाम झाले पण ती संख्या खूप कमी असून टक्क्यांमध्ये जवळपास शून्य अाहे. त्यामुळे जास्तीत लोकांना लस दिली पाहिजे.

डाॅ.व्ही.पी. पांडे | फायदा : ७० % लाेकांना लस देण्यात अाली व बाकीच्यांना कोराेना झाला असेल तर हर्ड प्रतिकारशक्ती निर्माण हाेईल. यामुळे ज्यांना संसर्ग झालेला नाही व ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनाही एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळेल असे अाम्ही गृहित धरून चाललाे अाहाेत. दाेन डाेसनंतर ४०-४५ दिवसांत शरीरात इतक्या अँटीबाॅडी तयार हाेतील की त्या विषाणू नष्ट करतील अाणि त्याला वाढू देणार नाही.

ताेटा : काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारची अॅलर्जी असते. लसीमुळे पुरळही येऊ शकते. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. परंतु अशा दुष्परिणामांचे प्रमाण फारच कमी आहे. थ्रोम्बोसिस होण्याची शक्यता आहे, एक काेटीपैकी ६ लोकांना त्रास झाल्याचे अमेरिकेची अाकडेवारी सांगते. गर्भनिरोधक गाेळ्या घेणाऱ्या स्त्रिया, दीर्घकाळ प्रवास करणारे लोक, लठ्ठ लोकांमध्येही ही समस्या येऊ शकते. परंतु त्यांची संख्या इतकी कमी आहे.आम्ही कोणालाही लस देण्यास नकार देऊ शकत नाही. चांगली गोष्ट म्हणजे भारतात काेणत्याही लसीचे अशा प्रकारचे गंभीर दुष्परिणाम दिसून अालेले नाहीत.

१८+ वरील प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी का ?
डॉ. अजय परीख | नक्कीच घेतली अाहे. १ मे पासून ही सुविधा सुरू करणाऱ्या निवडक देशांत भारत अाहे. अमेरिकेने अलिकडेच सर्व वयाेगटांच्या लाेकसंख्येचे लसीकरण सुरू केले अाहे. अापल्याला ही संधी मिळाली हे अापले भाग्य अाहे. अापण ही लस जरूर घेतली पाहिजे.

डाॅ.व्ही. पी. पांडे | आम्ही जानेवारीपासूनच सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज असल्याची मागणी करत आहोत. तरुण सर्वात सक्रिय असतात. बाहेर जाऊन लाेकांना भेटतात. त्यांना संरक्षण मिळाले तर संसर्ग रोखण्यास मदत हाेईल. इंग्लंडने ४५ % आणि इस्रायलने ५८ % लाेकसंख्येचे लसीकरण केले अाहे. हे देश अाता खुले हाेत अाहेत. त्यांनी काेराेनावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले अाहे. त्यांनी हर्ड इम्युनिटी विकसित केली अाहे. आपल्या देशात ज्याला संधी मिळेल त्याने लसी नक्कीच घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...