आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:सलग 22 तास 644 किमी सायकलिंग करीत मजुरांसाठी जमवले 2 लाख रुपये

नाशिक2 वर्षांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • #iForMyPeople मोहिमेतून सायकलपटू सुमीत पाटीलचा अनोखा विक्रम

 भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे, अशी प्रतिज्ञा आपण घेतो, पण लाखो देशबंधू रणरणत्या उन्हात शेकडो मैलांची पायपीट करीत घराकडे निघालेले....त्यांना आपण दिलासा देऊ शकत नाही. या भावनेने व्याकूळ झालेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू सुमीत पाटीलने सलग २२ तास सायकलिंग करीत ‘आय फॉर माय पीपल’ ही मोहीम राबवून मजुरांना अन्न व औषधे पुरवणाऱ्या धुळे येथील प्रबोधन या स्वयंसेवी संस्थेला २ लाख रुपयांचा निधी जमवून दिला. अलिबागच्या दमट वातावरणात घामाच्या धारांनी चिंब होत सुमीत सोशल मीडियावर लाइव्ह २२ तास सायकलिंग करीत असताना त्याचे मित्र निधीसाठी दिल्ली-जयपूर-आग्रा-दिल्ली या ७०१ किलोमीटरच्या सायकलिंगचा विक्रम तोडण्याचा सराव करण्यासाठी सुमीत अलिबागला आपल्या घरी गेला आणि लॉकडाऊनमध्ये अडकला. 

नारळी फोफळीच्या हिरव्यागार परिसरात गच्चीवर त्याचा सायकलिंगचा सराव सुरू होता, पण लॉकडाऊनमुळे फरपट झालेल्या स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टा त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. आपण आपल्याच लोकांना थांबवण्यास अपयशी ठरलो ही हुरहूर त्याचं मन खात होती. त्याच वेळी मुंबई-आग्रा महामार्गावरून जाणाऱ्या मजुरांसाठी धुळ्याचे डॉ. अभिनय दरवडे प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमांसाठी अन्न व औषधांची मदत देत असल्याचे कळले आणि सुमीतच्या मनात ‘आय फॉर माय पीपल’ या मोहिमेचे बीज पडले. ‘आय फॉर माय पीपल’ यासाठी सुमीतने २४ तास सलग सायकलिंगचा संकल्प जाहीर केला. त्यातील प्रत्येक किलोमीटरसाठी १०० रुपये प्रबोधन ट्रस्टला देणगी देण्याचे आवाहन सोशल मीडियातून लोकांना केले. २२ तासांत ६४४ किलोमीटरचे सायकलिंग झाले. वास्तविक प्रति १०० रुपयेप्रमाणे ६४४ किमी सायकलिंगसाठी ६४ हजार ४०० रुपये अपेक्षित असताना २ लाख रुपयांचा निधी जमा झाला. ३ हजार मैलांच्या सायकल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व : मुंबईत प्रभादेवीला राहणाऱ्या सुमीतसाठी सायकलिंग हेच पॅशन आहे आणि हेच प्रोफेशन. लडाखच्या पहाडांपासून कन्याकुमारीच्या किनाऱ्यापर्यंत सुमीतच्या सायकलने कैक स्वाऱ्या केल्या आहेत. सन २०१४ मध्ये रेस ऑफ अमेरिका या ३ हजार मैलांच्या सायकल स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वी रत्ननिधी ट्रस्ट स्थापन करून सायकलिंगच्या माध्यमातून ३ हजार जयपूर फूट्ससाठी निधी जमवला आहे.

बातम्या आणखी आहेत...