आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्त्व निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून बुधवारी २० व्या वर्षात प्रवेश करत आहेत. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ ७ ऑक्टोबर २००१ रोजी सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी राजकोटमधून निवडणूक लढवली. गुजरातच्या जनतेने त्यांना २००१ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर सलग चार वेळा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मे २०१४ पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. चार वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळताना एक कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यांनी राज्यात अनेक नवे प्रयोग केले व गुजरातला आघाडीचे राज्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. राज्यात त्यांनी भाजपला नवी ओळख दिली. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले. यानंतर पक्षाने विक्रमी २८२ जागा जिंकल्या. पंतप्रधानपदी पहिला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा विक्रमी जागा मिळवून मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यापूर्वी ज्योती बसू १९७७ ते २००० पर्यंत २२ वर्षे प. बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नावे हा विक्रम नोंद आहे.
मोदी यांच्या वैयक्तिक स्टाफमध्ये केवळ तीन जणांचा समावेश
> पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना राजकीय वर्तुळात आपल्या विशिष्ट कार्यशैलीसाठी ओळखले जाते. मोदी यांच्या वैयक्तिक कर्मचारी वृंदात केवळ तीनच जणांचा समावेश आहे.
> माेदी हे पहिलेच असे नेते आहेत, ज्यांनी ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम सुरू केला. नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेत राहणे हे त्यांचे आगळे वैशिष्ट्य आहे.
उपलब्धी... आणि टीका
> टाइम नियतकालिकाने २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांना ‘पर्सन ऑफ द इअर’ घोषित केले होते.
> पीएमपदाच्या कार्यकाळात माेदी आंतरराष्ट्रीय नेते म्हणून समोर आले. त्यांना अनेक देशांनी पुरस्कार दिले. यात मुस्लिम देशांचाही समावेश आहे.
> मोदींनी स्वच्छता मोहीम सुरू केली.
> २०१६ मधील नोटाबंदीवर विरोधकांनी टीका केली.
पाच मोठी कामे...
> भाजपच्या २ वचनपूर्ती केल्या. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले, राम मंदिराचे बांधकाम सुरू.
> ‘मेक इन इंडिया’ मोहीम सुरू केली. २०१७ मध्ये जीएसटी लागू केला.
> २०१९ मध्ये तीन तलाक कायदा आणला.
> उरी हल्ल्यानंतर पाकवर सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामानंतर बालाकाेट एअर स्ट्राइक.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.