आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात आतापर्यंत एकूण 27 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये राजस्थानातील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. राजस्थानातील 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र काही संक्रमित होम आयसोलेट आहेत. या 11 जिल्ह्यांनी सुमारे 200 दिवसांत कोविड-19 शी युद्ध जिंकले. देशातील उर्वरित 16 कोरोनामुक्त जिल्ह्यांमध्ये अरुणाचलप्रदेशातील 10, मेघालय-नागालँडमधील प्रत्येकी 2 आणि गुजरात व मिझोरमच्या 1-1 जिल्ह्यांचा समावेश आहे.
सरकार कोविडमुक्त जिल्हा का घोषित करत नाही
लॉकडाउनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिला होता की, जर 14 दिवसांत संक्रमित रुग्ण आढळला नाही तर ते जिल्ह्याला कोरोनामुक्त घोषित करू शकतील. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतर हा नियम रद्द करण्यात आला आहे.
हे आहेत 11 कोरोनामुक्त जिल्हे
दौसा, बूंदी, चूरू, झुंझुनूं, करौली, प्रतापगड, सवाई माधोपुर, सिरोही, टोंक, धौलपुर आणि भरतपूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण रुग्णालयात नाही. धौलपुर आणि भरतपुर मध्ये प्रत्येकी दोन रुग्ण OPD मध्ये तपासणीसाठी आले होते.
12 जिल्हे विजया जवळ
अलवर -5, झालावाड़ - 3, डूंगरपूर - 7, जालोर - 2, बीकानेर - 6, राजसमंद - 7, पाली - 6, सीकर - 6 आणि बांसवाडा, चित्तौडगड, श्रीगंगानगर, जैसलमेर - 12 रुग्ण बाकी आहेत. हे जिल्हेही लवकरच कोरोना मुक्त होतील अशी अपेक्षा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.